Jump to content

ख्वाजा अब्दुल हमीद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डॉ ख्वाजा अब्दुल हमीद (३१ ऑक्टोबर, १८९८ - २३ जून, १९७२), हे एक भारतीय उद्योगपती होते. त्यांनी सिपला कंपनीची स्थापना केली. १९३५ मध्ये स्थापन झालेली सिपला ही भारतातील सर्वात जुनी औषध कंपनी आहे. ५२ वर्षांपासून त्यांचा मुलगा युसुफ हमीद हा सध्या ही कंपनी चालवत आहे. []

प्रारंभिक जीवन आणि पार्श्वभूमी

[संपादन]

हमीदचा जन्म अलीगढ, उत्तर प्रदेश मध्ये झाला होता. आईचे नाव मसूद जहां बेगम होते आणि वडिलांचे नाव ख्वाजा अब्दुल अली होते. [] त्यांनी अलाहाबाद विद्यापीठ, अलाहाबाद, उत्तर प्रदेश मधून पदवी घेतली. जर्मनी मधील हम्बोल्ट विद्यापीठातून एमए आणि पीएचडीची पदवी घेतली. ते एम. के. गांधीचे शिष्य होते. अलीगढमध्ये जामिआ मिलिया इस्लामियाची स्थापना त्यांनी जाकिर हुसैन बरोबर मिळून केली.

कारकीर्द

[संपादन]

हमीद यांनी महात्मा गांधीच्या भारतीय राष्ट्रवादाचे अनुसरण केले. हमीदच्या कुटुंबाने १९२४ मध्ये पैसे जमा करून रसायनशास्त्र शिकण्यासाठी इंग्लंडला पाठवले. प्रवासामध्ये त्याने जहाजे बदलली आणि जर्मनीला जाउन पोहचला. त्यावळी रसायनशास्त्रात जर्मनी प्रथम क्रमांकावर होते. बर्लिन तलावावर, त्याला एक लिथुआनियन ज्यूज भेटली, जिच्याशी त्याने विवाह केला. जर्मनीत नाझी सत्ता उदयास आल्यानंतर ते दोघे तिथून पळून गेले.

केमिकल ईंडस्ट्रियल अँड फारमासुटीकल लॅबोरटरीज् (सी आय पी एल ए)ची स्थापना १९३५ मध्ये केली. यावेळी २ लाख रुपयांच्या आरंभीच्या भांडवलाने कंपनीची सुरुवात करण्यात आली. कंपनीने १९३७ मध्ये उत्पादन सुरू केले आणि ती भारतातील सर्वात जुनी औषध कंपनी बनली. [] त्याचा सर्वात मोठा मुलगा युसुफ हामिदने इंग्लंडमध्ये रसायनशास्त्राचा अभ्यास केला आणि आता सिपला कंपनीचा अध्यक्ष आहे. युसुफ आजही कॅंब्रिज विद्यापीठातील त्याच्या रसायनशास्त्राच्या नोटबुकचा आधार घेतो. [][]

डॉ. ख्वाजा हामिद यांनी नॅशनल केमिकल लॅबोरेटरीची कल्पना मांडली आणि त्यास सत्यात उतरवण्यासाठी वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर)ची स्थापना केली. सीएसआयआरच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत ते सीएसआयआरच्या गव्हर्निंग बॉडीचे सदस्य राहिले [].

त्याच्या आयुष्यातील शेवटच्या चार दशकात त्यांनी भारत मधील फार्मास्युटिकल आणि केमिकल इंडस्ट्रीच्या मानकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. हे सर्व करण्यामध्ये सिपला कंपनीचा असाधारण वाटा आहे.

डॉ. हामिद हे अलीगढ मुस्लिम विद्यापीठातील कार्यकारी समितीचे मानद प्राध्यापक आणि सदस्य होते. तसेच ते मुंबई विद्यापीठत सीनेट सदस्य आणि यूकेमधील रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ केमिस्ट्रीचे सहकारी होते. १९३७ ते १९६२ पर्यंत बॉम्बे लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचेही सदस्य होते. यासाठी त्यांनी मुंबईतील कॅबिनेटमध्ये मुस्लिम मंत्री बनण्याची संधी नाकारली होती. हामिदने मुंबईचे शेरीफ म्हणून देखील काम केले होते.

२३ जून १९७२ रोजी डॉ. ख्वाजा अब्दुल हामिद यांचे लहान आजारपणात निधन झाले. []

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b "Grand old man of Cipla Yusuf K Hamied hangs his boots". Economic Times. Feb 7, 2013. 2013-11-08 रोजी पाहिले.
  2. ^ Hamied, Khwaja Abdul (1972). K. A. Hamied: An Autobiography; a Life to Remember. Lalvani Publishing House.
  3. ^ Selling Cheap 'Generic' Drugs, India's Copycats Irk Industry, By DONALD G. McNEIL Jr, Published: 1 December 2000
  4. ^ New List of Safe AIDS Drugs, Despite Industry Lobby By DONALD G. McNEIL Jr, 21 March 2002
  5. ^ "Khwaja Abdul Hamied". 6 October 2014 रोजी पाहिले.
  6. ^ "The Hamieds of Cipla" (PDF). 2015-09-23 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 6 October 2014 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)