खूबसूरत (१९८० चित्रपट)
1980 film by Hrishikesh Mukherjee | |||
| माध्यमे अपभारण करा | |||
| प्रकार | चलचित्र | ||
|---|---|---|---|
| ह्याचा भाग | Middle Cinema Films | ||
| गट-प्रकार |
| ||
| मूळ देश | |||
| संगीतकार | |||
| पटकथा | |||
| निर्माता | |||
| दिग्दर्शक | |||
| प्रमुख कलाकार | |||
| प्रकाशन तारीख |
| ||
| कालावधी |
| ||
| |||
खूबसूरत हा १९८० चा भारतीय हिंदी भाषेतील विनोदी नाट्य चित्रपट आहे, जो हृषिकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित आणि निर्मित केला आहे आणि गुलजार, शानू बॅनर्जी, अशोक रावत आणि डीएन मुखर्जी यांनी लिहिले आहे. या चित्रपटात अशोक कुमार, रेखा, राकेश रोशन आणि दिना पाठक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तो बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला. १९८१ मध्ये हा चित्रपट तेलुगूमध्ये स्वर्गम म्हणून रिमेक करण्यात आला,तमिळमध्ये लक्ष्मी वंधाचू, [१] आणि मल्याळममध्ये वन्नू कांडू कीझाडक्की म्हणून. [२] २०१४ मध्ये याच नावाचा चित्रपट त्यावर आधारित होता.[३] २०२३ मध्ये करण जोहर दिग्दर्शित रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपटही या चित्रपटातून खूप प्रेरित आहे.[४][५]
१९८१ मध्ये हृषिकेश मुखर्जी यांना सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा फिल्मफेर पुरस्कार मिळाला आणि रेखाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेर पुरस्कार मिळाला. दीना पाठक यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या फिल्मफेर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले व मुखर्जीयांना सर्वोत्तम दिग्दर्शकाचे नामांकन मिळाले.
गीत
[संपादन]चित्रपटातील गीतांचे बोल गुलजार यांचे होते व स्वर आर.डी. बर्मन यांनी दिले होते.
| गाणे | गायक |
|---|---|
| "सून सून सून दीदी" | आशा भोसले |
| "सारे नियम तोड दो" | आशा भोसले |
| "पिया बावरी, पिया बावरी" | आशा भोसले, अशोक कुमार |
| "सारे नियम तोड दो" - २ | उषा, कल्याणी |
| "कायदा कायदा" | सपन चक्रवर्ती, रेखा |
पुरस्कार
[संपादन]- २८ वे फिल्मफेर पुरस्कार :
- जिंकले
- सर्वोत्कृष्ट चित्रपट - हृषिकेश मुखर्जी
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - रेखा
- सर्वोत्कृष्ट कॉमेडियन - केश्तो मुखर्जी
- नामांकन
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - हृषिकेश मुखर्जी
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - दिना पाठक
- सर्वोत्कृष्ट कथा - डी.एन. मुखर्जी
संदर्भ
[संपादन]- ^ Hari, T. S. V. (14 November 1986). "Sivaji excels". द इंडियन एक्सप्रेस. p. 16. 20 February 2023 रोजी पाहिले.
- ^ "Throwback Thursday: Nadiya Moidu recalls filming for 'Vannu Kandu Keezhadakki'". The Times of India. 24 September 2020. 20 February 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 February 2023 रोजी पाहिले.
- ^ Keshri, Shweta (19 September 2022). "How Fawad Khan charmed his way into everyone's hearts with Khoobsurat. On Monday Masala". India Today. 25 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 February 2023 रोजी पाहिले.
- ^ "Rocky, Rani & the power of Kahaani". The Times of India. 2023-08-08. 11 August 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2023-10-04 रोजी पाहिले.
- ^ Sharma, Suparna (2023-07-28). "'Rocky Aur Rani Kii Prem Kahaani' Review: Karan Johar's Funniest, Joyful and Most Political Film in a While". Rolling Stone India. 28 July 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2023-10-04 रोजी पाहिले.