Jump to content

खान सर (भारतीय शिक्षक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
खान सर (hi); ᱠᱷᱟᱱ ᱥᱟᱨ (sat); খান ছাৰ (as); খান স্যার (bn); खान सर (mr); Khan Sir (en) Indian Educator (en); भारतीय शिक्षक और यूट्यूबर (जन्म: 1993) (hi); Indian Educator (en)
खान सर 
Indian Educator
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखइ.स. १९९३
देवरिया
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
व्यवसाय
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

फैजल खान उर्फ खान सर (जन्म १९९३) हे बिहार राज्यातील पाटणा येथे राहणारे एक भारतीय शिक्षक आणि यूट्यूबर आहेत. खान सर हे विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक प्रशिक्षण वर्ग (शिकवणी) चालवतात.[]

प्रारंभिक आयुष्य

[संपादन]

खान यांचा जन्म १९९३ मध्ये उत्तर प्रदेशातील देवरिया येथील एका मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंबात झाला. त्यांचे वडील कंत्राटदार म्हणून काम करायचे आणि आई गृहिणी होती.[] [] त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण देवरियाच्या भाटपार राणी येथील परमार मिशन स्कूलमधून पूर्ण केले. त्यानंतर, त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातून विज्ञान शाखेतील पदवी (बी.एससी.) आणि त्यानंतर विज्ञान शाखेतील पदव्युत्तर पदवी (एम.एससी.) प्राप्त केली. याव्यतिरिक्त, त्यांनी भूगोलात कला शाखेतील पव्युत्तर पदवी (एमए) मिळवली.

२०२५ मध्ये, खान सरांनी एएस खानशी लग्न केल्याची घोषणा केली.[]

कारकिर्द

[संपादन]

युट्यूब

[संपादन]

२०१९ मध्ये, कोविड-१९ मुळे पाटण्यातील प्रशिक्षण वर्ग बंद झाले. त्यावेळी त्यांनी खान जीएस रिसर्च सेंटर नावाचे एक यूट्यूब चॅनल सुरू केले आणि ऑनलाइन शिकवण्यास सुरुवात केली. त्यांनी २०२१ मध्ये एक मोबाइल ॲप्लिकेशन किंवा मोबाइल अनुप्रयोग देखील लाँच केले. याद्वारे जे विद्यार्थी प्रत्यक्ष शिक्षण घेण्यासाठी शहरात येऊ शकत नव्हते त्यांना ऑनलाइन अभ्यासक्रम देण्यास सुरुवात केली.[]

वादविवाद

[संपादन]

२४ एप्रिल २०२१ रोजी खान यांनी फ्रान्स-पाकिस्तान संबंधांवर एक चित्रफित प्रसारित केली, जी मोठ्या प्रमाणावर सवंग प्रसिद्ध झाली. अनेक मुस्लिम मूलतत्ववादी एक्स (ट्विटर) वापरकर्त्यांनी या चित्रफितीवर टीका केली आणि खान सरांना इस्लामोफोबिक म्हटले. अनेक जननी त्यांचे रक्षाबंधन साजरे करतानाचे काही फोटो प्रसारित केले आणि खान सरांना हिंदू घोषित केले. यावर त्यांना YouTube वर एका चित्रफिती स्पष्टीकरण द्यावे लागले.[]

रेल्वे भरती मंडळाच्या एनटीपीसी परीक्षेवरील हिंसक निदर्शनांच्या संदर्भात २७ जानेवारी २०२२ रोजी पत्रकार नगर पोलिस ठाण्यात खान यांच्यासह विविध खाजगी शिकवणी केंद्रातील सहा शिक्षक आणि इतर १६ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. राजेंद्र नगर टर्मिनलवर झालेल्या हिंसक निदर्शनांमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या काही निदर्शकांच्या जबाबाच्या आधारे एफआयआर नोंदवण्यात आला.[][]

७ डिसेंबर २०२४ रोजी खान यांनी बीपीएससी पूर्व परीक्षेत केलेल्या बदलांविरुद्धच्या निषेधात भाग घेतला.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Meet Khan Sir, Everyone's Favourite Online 'Guru' Who Has Impacted Lives of 21 Million". News18 (इंग्रजी भाषेत). 4 August 2023. 4 August 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 4 August 2023 रोजी पाहिले.
  2. ^ a b "'ख़ान सर' क्यों बन गए हैं विवादों और आपत्तिजनक टिप्पणियों की खान". BBC News हिंदी (हिंदी भाषेत). 27 March 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 27 March 2023 रोजी पाहिले.
  3. ^ "यूट्यूबर 'खान सर' विवाद: देवरिया के भाटपाररानी के रहने वाले 'खान सर' का पूरा नाम फैज़ल खान है...अमित सिंह के नाम से किया जा रहा दुष्प्रचार". Dainik Bhaskar (हिंदी भाषेत). 2021-05-30. 2022-08-11 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2025-01-29 रोजी पाहिले.
  4. ^ "Bihar's educator Khan Sir gets married, cites India-Pakistan tensions for keeping it private". द इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). 2025-05-27. 2025-05-28 रोजी पाहिले.
  5. ^ "No Money For A Pencil To Rs 12 Lakh Salary, A Look At Khan Sir's Journey". News18 (इंग्रजी भाषेत). 23 October 2023. 11 July 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 23 October 2023 रोजी पाहिले.
  6. ^ "RRB-NTPC Protest: जानें पटना में हुए बवाल में कैसे फंसे खान सर, किन धाराओं में दर्ज हुआ FIR". News18 हिंदी (हिंदी भाषेत). 27 January 2022. 27 January 2022 रोजी पाहिले.
  7. ^ "Who is Khan Sir? The man who allegedly incited violence in Bihar against RRB NTPC exam". DNA India (इंग्रजी भाषेत). 27 January 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 27 January 2022 रोजी पाहिले.
  8. ^ Tewary, Amarnath (2024-12-07). "YouTuber Faizal Khan not arrested, case against coaching institute's social media account for spreading false news: Bihar Police". द हिंदू (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2024-12-07 रोजी पाहिले.