Jump to content

खावली (वाई)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(खवळी (वाई) या पानावरून पुनर्निर्देशित)

  ?खवळी

महाराष्ट्र  भारत
  गाव  
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर वाई
जिल्हा सातारा जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/११

खावली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एक गाव आहे.

मौजे. खावली हे पश्चिम महाराष्ट्रातील 'सातारा'जिल्ह्यातील 'वाई'तालुक्यातील शे -दीडशे उंबरठ्याचे गाव सुमारे तीन विभागात हे गाव विभागले गेले असून त्याला वाड्या म्हणून संबोधले जाते. मुख्य वडवाडी, बागवाडी आणि पुढची वाडी, गावात मुख्य लोकं संख्या शेलार यांची, त्यानंतर चौधरी, आमले, नवघणे यांची काही घरे आहेत.  गावची ग्रामदैवत ही श्री. नवलाई देवी व श्री. रामवरदायनी देवी असून. मार्गशिष पुष्य नक्षत्राला म्हणजेच डिसेंबर महिन्यात देवीची यात्रा भरते. खावली गावाची ओळख म्हटले तर श्री. नवलाई देवीचे गाव असेच आहे.

शिवाय छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची जिथे शपथ घेतली त्या रायरेश्वराच्या पायथ्याशी आणि केंजळगडाच्या  पायथ्याशी हे गाव वसले आहे.

नायक, गंगाजल, स्वदेश, ओमकारा,  तसेच अनेक मराठी आणि हिंदी, इंग्रजी अशा वेब सिरीज चे चित्रीकरण देखील खावली गावात आणि आजूबाजूच्या परिसरात झाले आहे. त्यामुळे पर्यटन, ट्रेकिंग च्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे.

भौगोलिक स्थान

[संपादन]

हवामान

[संपादन]

हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे.येथील वातावरण उष्णकटिबंधीय प्रकारचे आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ८९० मिलीमीटर आहे. हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २३ अंश सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १५ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३५ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते.

लोकजीवन

[संपादन]

श्री. नवलाई देवी जुने मंदिर जे पावसाळ्यात पाण्याखाली जाते. परंतु उन्हाळ्यात पाहू शकतो. काही वर्षांपूर्वी आलेल्या अनिल कपूरच्या नायक चित्रपटाची शूटिंग याच मंदिरावर झाली.

[संपादन]

2) रायरेश्वर मंदिर -छत्रपती शिवरायांनी ज्या मंदिरात हिंदवी -स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली ते मंदिर खावली गावापासून जवळ आहे.


नागरी सुविधा

[संपादन]

जवळपासची गावे

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate Archived 2021-01-23 at the वेबॅक मशीन.