खडीकोळवण
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
| ?खडीकोळवण महाराष्ट्र • भारत | |
| — गाव, पर्यटन स्थळ — | |
| |
| प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
| क्षेत्रफळ • उंची |
५.७२ चौ. किमी2.5 किमी² • ३७ मी४१ मीटर |
| हवामान • वर्षाव तापमान • उन्हाळा • हिवाळा |
दमट, उष्णकटिबंधीय (Köppen) • ३,८०० मिमी (१५० इंच) २७ °C (८१ °F) • ३५ °C (९५ °F) • २० °C (६८ °F) |
| मुख्यालय | रत्नागिरी |
| मोठे शहर | रत्नागिरी |
| मोठे मेट्रो | देवरुख |
| जवळचे शहर | साखरपा |
| प्रांत | कोकण |
| विभाग | संगमेश्वर |
| जिल्हा | रत्नागिरी |
| लोकसंख्या • घनता लिंग गुणोत्तर • पुरूष • स्त्री |
३४४ (२०११) • ४८०/किमी२ १,२०५ ♂/♀ • ६३ % • ४७ % |
| भाषा | बाणकोटी, मराठी |
| खासदार | विनायक राऊत |
| आमदार | शेखर गोविंदराव निकम |
| सरपंच | संतोष घोलम |
| संसदीय मतदारसंघ | रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ |
| विधानसभा मतदारसंघ | चिपळूण विधानसभा मतदारसंघ |
| जिल्हा न्यायालय | रत्नागिरी |
| तहसिल कार्यालय | देवरुख |
| तलाठी | देवरुख |
| कोकण रेल्वे | संगमेश्वर |
| कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• 415802 • +०२३५४ • MH 08 |

खडीकोळवण हे गाव महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकण भागातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील छोटे गाव आहे.[१]
भौगोलिक स्थान व भूविवरण
[संपादन]खडीकोळवण हे गाव १६.७५७८° उत्तर अक्षांश आणि ७३.६०४४° पूर्व रेखांश या निर्देशांकांवर, भारताच्या उत्तर गोलार्धातील पश्चिम किनाऱ्यावर वसलेले आहे. महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील कोकण पट्ट्यात हे गाव येते. भारताच्या दक्षिण-पश्चिम भागात हे गाव स्थित आहे.
गावाचे एकूण क्षेत्रफळ अंदाजे १७३४.९८ हेक्टर (सुमारे १७.३५ चौ. किमी) आहे. गावाची स्थापना सुमारे ३५० वर्षांपूर्वी झाल्याचे स्थानिक परंपरेनुसार मानले जाते.
सह्याद्री पर्वतरांगा पर्वतरांगातील चांदोली अभयारण्याजवळून उद्भवणारी बाव नदी खडीकोळवण गावातून वाहते. त्यामुळे हे गाव बाव नदीच्या तटावर वसलेले आहे.
लोकसंख्या व सामाजिक रचना
[संपादन]२०११ च्या भारत सरकारच्या जनगणना अहवालानुसार, खडीकोळवण गावाची एकूण लोकसंख्या ३४४ असून, गावात ११८ घरे आहेत. साक्षरतेचा दर ६३.२४% इतका आहे.[२]
गावात प्रामुख्याने कुणबी आणि बौद्ध समाजाचे लोक वास्तव्यास आहेत. गावात एकूण सहा वाड्या/वस्त्या आहेत. यापैकी काही भाग सध्या पर्यावरणीय दृष्टिकोनातून पश्चिम घाट इको-संवेदनशील क्षेत्रात समाविष्ट झाले आहेत.कोकण परिसर जैवविविधतेने समृद्ध असून येथील पारंपरिक जमिनीचा उपयोग पद्धती नैसर्गिक समतोल टिकवते, असे Centre for Environment Education च्या अहवालात नमूद आहे.[३]
गावाच्या सीमा
[संपादन]- पश्चिमेस – बामणोली
- दक्षिणेस – निवदे
- पूर्वेस – ओझरे
- उत्तर व ईशान्येस – उदगीर, कोल्हापूर जिल्हा
हवामान
[संपादन]पावसाळ्यात येथे सरासरी ४०० ते ५०० सें.मी. पावसाचे प्रमाण असते आणि हवामान समशीतोष्ण राहते. पावसात बाव नदी धोक्याची पातळी गाठते.
हिवाळ्यात हवामान थंड असून, सकाळच्या वेळेस अनेकदा धुके पडते. उन्हाळ्यात मात्र हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भात आणि नाचणी (नागली) शेती केली जाते.
दळणवळण व परिवहन
[संपादन]खडीकोळवण गाव चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेले असून, येथे प्रवेशासाठी दोन प्रमुख मार्ग आहेत:
रत्नागिरी–कोल्हापूर महामार्गावर साखरपा हे महत्त्वाचे बाजारपेठ केंद्र आहे. प्रारंभी प्रतिदिन तीन वेळा एस.टी. सेवा साखरपा–खडीकोळवण मार्गावर चालवली जात होती. सध्या ही सेवा साखरपा–बामणोली–खडीकोळवण मार्गावर चालू आहे.[४]
कोकण रेल्वेवरील संगमेश्वर रोड स्थानक हे खडीकोळवणपासून सुमारे २३ किमी अंतरावर आहे. येथून देवरुख बसस्थानकापर्यंत पोहोचल्यावर, खडीकोळवण गावासाठी आणखी २३ किमी प्रवास करावा लागतो. या प्रवासास साधारणतः ४५ मिनिटे ते १ तास लागतो.
साखरपा ते खडीकोळवण हे अंतर देखील सुमारे २३ किमी असून प्रवासाचा कालावधी ४५ मिनिटांच्या आसपास असतो.
सन १९८५ मध्ये खडीकोळवण गावात थेट एस.टी. सेवा सुरू करण्यात आली, ज्यामुळे गावाच्या संपर्क सुविधेत लक्षणीय सुधारणा झाली.[५]
लोकजीवन
[संपादन]सामाजिक
[संपादन]- खडीकोळवण गावाचा इतिहास १६व्या शतकात सुरू होतो. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या भागात कृषिप्रधान आणि अध्यात्मप्रधान जीवनशैली रुजली. गावात एका तपस्वी संताच्या माध्यमातून आध्यात्मिक चळवळीची सुरुवात झाली. त्यांनी भक्तीमार्ग, भजन, कीर्तन आणि व्रत परंपरेची पायाभरणी केली. या परंपरेतून ‘प्रभू श्रीराम’ मंदिराची स्थापना झाली. यानंतर वारी, महाशिवरात्र, श्रावणमासातील ग्रंथवाचन इ. उपक्रम नियमितपणे होऊ लागले.
- ब्रिटीश कालखंडात गावातील काही व्यक्तींनी ग्रामस्वराज्य आणि ग्रामीण न्यायव्यवस्थेचा पाया घातला. त्यांनी प्रशासनात शिस्त, व्यायामप्रेमी वृत्ती आणि सामाजिक सहभाग वाढवून गावगाड्याचे सुयोग्य संचालन केले. पाटीलपद आणि महालकरी जबाबदाऱ्यांमधून त्यांनी प्रभावी भूमिका पार पाडली.
- १९व्या व २०व्या शतकात गावातील नागरिकांनी शेती, वनव्यवसाय आणि ग्रामपंचायतीच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले. लाकूड, कडिपत्ता, करवंद, वेत यांचे संकलन व विक्री करताना शेतकऱ्यांना योग्य दर मिळवून देण्यासाठी प्रयत्न झाले. पूल, नळपाणी योजना, सार्वजनिक विहिरी या सुविधा निर्माण करण्यातही सहभाग होता.
- गावाच्या सांस्कृतिक जीवनात नमन, झांजगी, कीर्तन, तमाशा, अभंगगायन या पारंपरिक लोककलांचा समावेश आहे. स्त्रीवेशातील अभिनय, झांजगीत सादरीकरण आणि लोककलांचे प्रशिक्षण ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. गोंधळ, भजन, सत्यनारायण पूजा अशा धार्मिक कार्यक्रमांत गावकऱ्यांचा सहभाग उल्लेखनीय आहे[६]
- गावामध्ये पारंपरिक सर्पदंश उपचारपद्धती, रानऔषधी ज्ञान आणि मंत्रोपचार यांचा पिढ्यानपिढ्या चालत आलेला वारसा आहे. हे ज्ञान आजी-आजोबांकडून अरण्यातील अनुभवांच्या माध्यमातून हस्तांतरित झाले आहे. काही गावकऱ्यांनी या उपचारांनी अनेकांचे प्राण वाचवले आहेत.[७]
- स्वातंत्र्योत्तर काळात गावातील युवकांनी भारतीय सैन्य दलात भरती होऊन देशसेवेसाठी योगदान दिले. त्यांनी १९७१ मधील भारत–पाकिस्तान युद्धात सहभाग घेऊन सेवा पदके मिळवली.[८] [९]
सांस्कृतिक
[संपादन]- हे गाव कोकणातील समृद्ध लोकसंगीत आणि पारंपरिक कलांच्या जतनासाठी ओळखले जाते.[११]
- येथे पारंपरिक नमन, झांजगी, ताशा वादन, जाखडी नृत्य, भजन आणि लावणी यांचा दीर्घ वारसा आहे.
- गावात शिवजयंती, बौद्ध पौर्णिमा, आंबेडकर जयंती यासारख्या सणांची साजरी करण्याची परंपरा आहे. गावातील महिलांचा विविध सामाजिक समारंभांमधील सक्रिय सहभाग सांस्कृतिक परंपरांचा घटक आहे. झांजगी व ताशा वादन यांना गावात विशेष महत्त्व आहे. वाड्यावाड्यांमध्ये स्वतंत्र वाजंत्री पथके असून, ताशा वादनातील विशिष्ट ताल, काठी नृत्य, आणि सामूहिक सादरीकरणातून पारंपरिक सांस्कृतिक दर्शन होते.
- या कला धार्मिक उत्सव, विवाह समारंभ, शिमगा, गणेशोत्सव, महालवस (पितृपक्ष) आणि दसरा अशा प्रसंगी विशेषत्वाने सादर केल्या जातात. 'कलगी/शक्तीवाले' परंपरा ही गावातील भक्तिपर उपासनेचा भाग असून, ती दशकानुदशके टिकून आहे.
- गावात वारकरी संप्रदायाचा प्रभाव आहे. प्रवचन, भजन, ग्रंथवाचन, वारी, आणि कीर्तन यांची परंपरा आजही दृढ आहे. श्रावण महिन्यातील भजन सप्ताह, महाशिवरात्र उत्सव, अभंग गायन, साप्ताहिक कीर्तन यांमुळे गावात आध्यात्मिक वातावरण निर्माण होते. ढोलकी, झांज आणि तालवाद्यांच्या सहाय्याने नृत्य आणि गीते सादर केली जातात.
- गावात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात १९९९ साली झाली. स्थानिक तरुणांनी पुढाकार घेऊन "गर्जना मित्र मंडळ" स्थापन केले.ही संस्था गावातील पहिली सार्वजनिक सांस्कृतिक संघटना ठरली. मंडळाच्या वतीने पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला, जो तालुक्यातील पहिल्या काही सार्वजनिक गणेशोत्सवांपैकी एक होता. या उत्सवात सत्यनारायण पूजा, अभिषेक, आरती, भजन, अभंगवाणी, फुगडी आणि नृत्य सादरीकरण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
- मंडळाच्या माध्यमातून गावात सामाजिक ऐक्य, संस्कृती संवर्धन आणि युवकांचा सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी अनेक उपक्रम राबवले गेले. हे मंडळ आजही गावातील एक महत्त्वाची सामाजिक-सांस्कृतिक संस्था म्हणून कार्यरत आहे. गावातील सांस्कृतिक जीवनात नमन, जाखडी, भजन, फुगडी, पालखी नृत्य यांसारखे मनोरंजनपर कार्यक्रम महत्त्वाचे मानले जातात. गावात वारकरी संप्रदाय मंडळ, भजन मंडळ आणि विविध युवा मंडळे कार्यरत आहेत.
जीवनपद्धती
[संपादन]- घरे – खडीकोळवण गावात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे येथे उतरत्या छपराची, जांभ्या दगडाची कौलारू घरे आढळतात. प्रारंभी येथे कुडाची, शेणमातीने सारवलेली घरे, शेतीपूरक वाडे, आणि ओढ्यांजवळील निवास आढळत होते.
- व्यवसाय – गावातील मुख्य व्यवसाय शेती असून, पशुपालन आणि कुक्कुटपालन हे जोडधंदे म्हणून प्रचलित आहेत.
- पिके – शेतीमध्ये भात हे मुख्य पीक आहे. त्यासोबत नाचणी, वरी, तीळ यांसारखी जोडपीके घेतली जातात. याशिवाय पालेभाज्याची लागवड देखील केली जाते.
- आहार – तांदूळ हे प्रमुख पीक असल्यामुळे येथील आहारात भात आणि तांदळाची भाकरी प्रमुख आहे. याशिवाय डाळ, भाजी आणि मांसाहारी पदार्थ यांचाही समावेश आहारात आढळतो.
- पोशाख – गावातील पुरुष व मुले शर्ट व पँट परिधान करतात, तर स्त्रिया साडी, चोळी आणि मुली पंजाबी ड्रेस परिधान करतात.
- वाड्या/वस्त्या – गावात प्रमुख वाड्यांमध्ये वरची रिंगण घोलम वाडी, खालची घोलम वाडी, खाडेवाडी, रामवाडी, आणि बौद्धवाडी यांचा समावेश होतो.[१२]
- गावचे प्रशासन – प्रत्येक वाडीतील प्रमुख व्यक्ती धार्मिक विधींचे आयोजन, खाजगी कार्यक्रम (उदा. विवाह, [[मंगलकार्य, अंत्यसंस्कार) व्यवस्थित पार पाडणे, आणि गावातील लहान-मोठ्या वादविवादांचे सामूहिक निर्णयाने निराकरण करण्याचे कार्य पार पाडतात.
नैसर्गिक संपत्ती
[संपादन]खडीकोळवण हे गाव सह्याद्रीच्या कडेकपारीत वसलेले असून, त्याचा बहुतांश भाग घनदाट जंगलांनी व्यापलेला आहे. त्यामुळे येथे दुर्मिळ औषधी वनस्पती, पाने, फळे व फुले आढळतात. गावाच्या परिसरातून बाव नदीचा उगम होत असल्यामुळे भूर्पुष्ठाखाली जलपातळी तुलनेने उंच आहे आणि पाण्याचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. गावात कधीही पाण्याच्या दुष्काळाची समस्या निर्माण झालेली नाही.[१३] गावात पारंपरिक जलस्रोत व जलव्यवस्थाचा मोठा वारसा आहे. यामध्ये:
- "बावोचा गोवंड" – शेतीसाठी महत्त्वाचा पाणीमार्ग, जिथून रहाट व कोळबाच्या साहाय्याने पाणी काढले जात असे.
- "बुडवणूकीची बाव" – महिलांसाठी खास रचना असलेली तिरकी विहीर, जी रोपलावणीपूर्वी पाण्यासाठी उपयोगात आणली जात असे.
- वहाळे – म्हणजे नैसर्गिक ओहोळ; जसे की लेवाडी, बुचाची, रागरे, केळीची, झारीची वळव. हे ओहोळ शेती व पिण्याच्या पाण्यासाठी उपयुक्त ठरत.
ही पारंपरिक जलव्यवस्था शाश्वत शेती व ग्रामजीवनाचा मुख्य आधार होती. तथापि, आज हळूहळू ही व्यवस्था विस्मृतीत जात आहे, व तिच्या संवर्धनची गरज प्रकर्षाने जाणवते.
विपुल वन संपत्ती
[संपादन]खडीकोळवण गावात विपुल जैवविविधता असून, येथे आढळणाऱ्या वनसंपत्तीचे अनेक प्रकार आहेत:
- मोठे वृक्ष – आंबा, फणस, वड, पिंपळ, सागवान, शिसव, कळंब, साधनेर, जांबा, सातीवन, भेला, ऐन, किंजल, चीर, पायर, आमन, हरड, करंबेला, म्होवट, कुंबया इत्यादी.
- बेटे (झुडुपे) – असोल, धावसड, निगड, कुडा, चितरंगा, बांबू, वाकेरी, बगोली इत्यादी.
- औषधी वनस्पती – सापधनी, वाकेरी, ओवी, घनसरी, मुरुडशेंग, देवनल, हळद, तांबडा, काजरा, निवडुंग, पांगला, अडुळसा इत्यादी.
- रानभाज्या – टाकळा, कवला, कुर्डू, भारंग, थरंबरे, फोडशी, काटले, कुडा, अळू, शेवरी, घोरकण, चायनीज घोरकण, सुरण, करंडा, रताळी, नागरी फळे, काकडी, भोपळा, पावटा, शेवगा पाला, चवळी, रताळी पानं, पडवळ, दोडका, कारली, वांगी, मिरची, भेंडी, टोमॅटो इत्यादी.
- मासे – मलाया, पिचकी, वांग, रत्तू, डोकरू, गंडलास, चिगल्या
- जंगली प्राणी – वाघ, बिबट्या, भेकरे, रानडुक्कर, हरीण, कोल्हा, गवारेडा, सांबर, साळिंदर, पिसोरी, माकड, ससा, घोरपड, खवल्यामांजर इत्यादी.
- पक्षी – मोर, पोपट, कबुतर, कवडा, लाव्हा, धनेश, सुतारपक्षी, घार, रानकोंबडी, सुगरण, किकेर्डी, चिमणी इत्यादी. या गावाच्या जंगलात अजूनही अनेक दुर्मिळ वनस्पती व प्राणी आढळतात, ज्यांची नावेही स्थानिकांना अपरिचित आहेत.
मिरगाची राखण – पारंपरिक शेतीरक्षण विधी
[संपादन]खडीकोळवण गावात मृग नक्षत्रात शेतीस प्रारंभ करताना ग्रामदेवतेला नैवेद्य अर्पण करून 'मिरगाची राखण' केली जाते. यामध्ये पाण्याचा अखंड प्रवाह सुरू झाल्यावर देवतेला पहिली राखण अर्पण केली जाते. शेतकरी देवाकडे गाऱ्हाणं घालून पिकांची रक्षा व्हावी, अशी प्रार्थना करतो. राखण म्हणजे उभ्या पिकांची दिवसरात्र माणूस झोपडी करून निगराणी ठेवतो. महिलाही बी पेरण्यापूर्वी माती समतल करून दीपळ फोडतात. हा विधी शेती, श्रद्धा आणि देवाशी जोडलेला असून ग्रामपरंपरेत महत्त्वाचा मानला जातो.[१४]
पश्चिम घाट इको-संवेदनशील क्षेत्रात समावेश
[संपादन]खडीकोळवण हे महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात वसलेले एक निसर्गसंपन्न व जैवविविधतेने समृद्ध गाव आहे. भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने २०१४ साली प्रसिद्ध केलेल्या मसुदा अधिसूचनेनुसार, खडीकोळवण गावाचा समावेश पश्चिम घाट इको-संवेदनशील क्षेत्रात (Western Ghats Ecologically Sensitive Area – ESA) करण्यात आला आहे. या अधिसूचनेनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर, चिपळूण आणि राजापूर या तालुक्यांतील एकूण २२१ गावे इको-संवेदनशील क्षेत्रात समाविष्ट करण्यात आली आहेत. यामध्ये संगमेश्वर तालुक्यातील ८२ गावे, ज्यात खडीकोळवणही आहे, यांचा समावेश आहे. या क्षेत्रात जैवविविधता रक्षण व पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी खालील बाबींवर निर्बंध आहेत:[१५]
- नव्या खाणींसाठी परवानगी नाही
- थर्मल पॉवर प्रकल्प उभारण्यास मनाई
- २०,००० चौ.मी. पेक्षा मोठ्या इमारतींना मंजुरी नाही
- जंगलतोड व पर्यावरणाला धोका निर्माण करणाऱ्या प्रकल्पांवर बंदी
या क्षेत्रात पर्यावरणपूरक शेती, स्थानिक जीवनशैलीचे संवर्धन, जैवविविधता-अनुकूल पर्यटन आणि शाश्वत विकास प्रोत्साहित केला जातो.[१६]
तथापि, या अधिसूचनेला स्थानिक ग्रामस्थांचा काही प्रमाणात विरोध आहे. त्यांच्यामते, या निर्बंधांमुळे पारंपरिक शेती, घरबांधणी व विकास योजना अडचणीत येतात आणि उपजीविकेवर परिणाम होतो. ग्रामस्थांची तक्रार आहे की त्यांना विश्वासात न घेता निर्णय घेण्यात आला आहे.[१७]
दरम्यान, पर्यावरण अभ्यासकांचे मत आहे की पर्यावरण रक्षण व विकास यामधील संतुलन राखणे ही काळाची गरज आहे, आणि स्थानिकांसोबत सुसंवाद साधून टिकाऊ धोरणे राबवणे आवश्यक आहे.
रस्ते विकास - चौपदरीकरण
[संपादन]खडीकोळवण गावातून पुढे मार्लेश्वर (तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी) येथे जाणाऱ्या मुख्य जिल्हा रस्त्याचे चारपदरी रुंदीकरण काम प्रस्तावित असून त्यास जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांची प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या (सुसंयोजन समन्वय शाखा) दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजीच्या अधिकृत पत्रानुसार, निवावे – ओझरे बुद्रुक – खडीकोळवण – बामणोली – निवे – मार्लेश्वर या मार्गाचे चौपदरीकरण करून आधुनिक रस्ते पायाभूत सुविधा विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या प्रकल्पामुळे स्थानिक शेतकरी, विद्यार्थी तसेच भाविक नागरिकांना मोठा लाभ होणार असून परिसरातील वाहतूक व्यवस्था सुलभ होईल. तसेच पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या मार्लेश्वर मंदिरापर्यंत पोहोचणे अधिक सोयीचे होईल.
जिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती कार्यवाही करून रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम एकाच टप्प्यात पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.[१८]
२०१४ मध्ये खडीकोळवण गावात भू-वैज्ञानिक उत्खननादरम्यान सुमारे १००० मीटर खोलवर गंधकयुक्त गरम पाण्याचा झरा सापडला.[१९] या झऱ्यातील पाणी तापमानाने अधिक असल्यामुळे ते पिण्यायोग्य अथवा शेतीसाठी उपयुक्त नसले तरी स्थानिकांच्या मते, त्वचारोगांवर उपयुक्त असल्याचे अनुभवले गेले आहे. उत्खननादरम्यान पिवळ्या गंधकाचे हजारो टन साठेही या भागात आढळून आले. या घटनेमुळे गावातील भूजल पातळीतही सकारात्मक वाढ झाल्याचे स्थानिक निरीक्षण आहे.[२०]
हा झरा भविष्यात पर्यटन व वैद्यकीय (wellness tourism) दृष्टिकोनातून विकसित करण्यास उपयुक्त असा नैसर्गिक स्रोत मानला जातो. गंधकयुक्त गरम पाण्याचे झरे संपूर्ण भारतात दुर्मिळ आहेत, आणि त्यांचा वापर नैसर्गिक उपचार केंद्रांमध्ये केला जातो. त्यामुळे खडीकोळवणचा झरा भविष्यातील पर्यावरणपूरक आणि आरोग्यकेंद्रित पर्यटन विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतो.
स्थानिक प्रतिक्रिया
[संपादन]या अधिसूचनेनंतर खडीकोळवणसह अनेक गावांतील ग्रामस्थांनी इको-संवेदनशील क्षेत्राच्या घोषणेला विरोध दर्शवला. त्यांचे म्हणणे होते की:
- या क्षेत्रातील पारंपरिक शेती व घरबांधणीवर मर्यादा आल्यामुळे स्थानिक उपजीविकेवर विपरीत परिणाम होतो.
- पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली सरकारने ग्रामस्थांना विश्वासात न घेता निर्णय घेतला.
- काही गावांमध्ये या अधिसूचनेविरोधात निवेदने देणे, बैठका घेणे व माध्यमांतून आवाज उठवण्याचे प्रयत्नही झाले.[२१]
तथापि, काही पर्यावरणप्रेमी आणि अभ्यासकांनी या अधिसूचनेचे समर्थन करताना सांगितले की:
- पश्चिम घाटातील निसर्ग, जैवविविधता आणि जलस्त्रोतांचे रक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे.
- अशा संवेदनशील क्षेत्रांमुळे जंगलतोड, खाणकाम व इमारतींचा अनियंत्रित विस्तार टाळता येतो.
- स्थानिकांसोबत समन्वय साधून **पर्यावरणपूरक विकास** शक्य आहे, हे शासनाने दाखवून द्यायला हवे.[२२]
या पार्श्वभूमीवर सरकारने स्थानिकांचा विश्वास संपादन करून शाश्वत विकासाचे पर्यावरणस्नेही मार्ग निवडावेत, अशी शिफारस अनेक तज्ज्ञांकडून केली गेली आहे.
स्थानिक विरोध आणि समर्थन
[संपादन]पश्चिम घाट इको-संवेदनशील क्षेत्राच्या (ESA) प्रस्तावित अधिसूचनेविरोधात स्थानिक पातळीवर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
स्थानिक विरोध
[संपादन]2014 साली भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने पश्चिम घाटातील काही भागांना ‘पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र’ (Ecologically Sensitive Area - ESA) म्हणून अधिसूचित करण्याचा प्रस्ताव मांडला. या अधिसूचनेनुसार विविध विकासकामांवर निर्बंध येण्याची शक्यता होती. याला स्थानिक नागरिक, ग्रामपंचायती, शेतकरी आणि लोकप्रतिनिधींनी तीव्र विरोध केला.
- आंदोलकांनी असा दावा केला की, ESA लागू झाल्यास अंदाजे २५,००० कुटुंबांना विस्थापनाला सामोरे जावे लागेल.[२३]
- स्थानिक लोकप्रतिनिधींनी ESA अधिसूचनेमुळे परंपरागत शेती, घरबांधणी आणि अन्य विकास कामांवर मर्यादा येतील असे सांगत विरोध दर्शवला.[२४]
- महाराष्ट्रातील अंदाजे ८५२ गावांनी ESA प्रस्तावास विरोध दर्शवून लेखी आक्षेप नोंदवले होते.[२५]
पर्यावरणीय समर्थन
[संपादन]- पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगिल यांच्या मते, "पश्चिम घाटाचे संवर्धन ही दक्षिण भारताच्या भवितव्याशी निगडीत आहे."
- गोवा फाउंडेशनचे क्लॉड अल्वारेस यांनी म्हटले, "स्थानिक संसाधनांचे रक्षण केल्याशिवाय भविष्यात उपजीविकेचा प्रश्न निर्माण होईल."
- काही ग्रामस्थांनी ‘जैवविविधता-अनुकूल पर्यटन आणि सेंद्रिय शेती’ला पाठिंबा दर्शवला आहे.
जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक मराठी शाळा
[संपादन]स्थापनेचा इतिहास व शैक्षणिक वाटचाल
[संपादन]खडीकोळवण येथील जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक मराठी शाळेची स्थापना १२ नोव्हेंबर १९४६ रोजी झाली. शाळेने गावातील प्राथमिक शिक्षणाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
२०२१ मध्ये शाळेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७५ वर्षांचा समारंभ शासन नियमांचे पालन करून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी स्वागतगीत, लेझीम आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विविध सामाजिक संस्थांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
कार्यक्रमादरम्यान शाळेच्या कार्यकिर्दीचा आढावा घेणारी एक स्मरणिका प्रकाशित करण्यात आली.[२६]
उपक्रम, वैशिष्ट्ये आणि अडचणी
[संपादन]- कोविड लॉकडाऊन कालावधीत, शिक्षकांनी भिंतींवर शैक्षणिक भित्तीचित्रे रेखाटली.
- स्मरणिकेत माजी विद्यार्थ्यांचे अनुभव, लेख आणि शाळेचा इतिहास समाविष्ट केला गेला.
- शाळेच्या शिक्षकांचे योगदान व नेतृत्व उल्लेखनीय आहे.
अडचण गावात माध्यमिक शिक्षणाची सोय नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शेजारील गावांत जावे लागते, जे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अडथळा ठरतो.
तंटामुक्त गाव अभियान
[संपादन]खडीकोळवण ग्रामपंचायत महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान (Mahatma Gandhi Dispute-Free Village Mission) राबवते. महाराष्ट्र शासनाने १५ ऑगस्ट २००७ रोजी ही योजना सुरू केली; उद्देश गावांतील किरकोळ वाद स्थानिक पातळीवरच संवाद आणि सामोपचारातून सोडवणे, न्यायालयीन खर्च व वेळ वाचवणे, तसेच सामाजिक सलोखा वाढवणे हा आहे.
समितीची रचना आणि कार्यपद्धती
[संपादन]- गावात तंटामुक्त समिती स्थापन करण्यात आली असून, यात ग्रामपंचायत सदस्य, मान्यवर नागरिक आणि पोलीस प्रतिनिधी यांचा समावेश असतो.
- समिती विविध प्रकारचे वाद सामोपचाराने सोडवते, जसे की:
- जमीन‑मालमत्ता संबंधी वाद
- नैसर्गिक स्रोत (पाणी, चरणभूमी) संबंधित वाद
- कौटुंबिक किंवा शेजारी वाद
- धार्मिक किंवा सामाजिक गैरसमजांमुळे होणारे वाद
समिती समोरा‑समोर बैठक घेते, संवाद साधते आणि दस्तऐवजीकरण करून निर्णय घेते.
परिणाम आणि यशोगाथा
[संपादन]- न्यायालयीन वादांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.
- गावात शांतता, ऐक्य, आणि सामाजिक सलोखा वाढीस लागला आहे.
- “स्वयंपूर्ण न्याय” व सामाजिक उत्तरदायित्व या मूल्यांची भावना दृढ झाली आहे.
स्थानिक उदाहरण (उदाहरणार्थ)
[संपादन]खडीकोळवण ग्रामपंचायतीने सामाजिक तंटामुक्तीसाठी प्रभावी उपाययोजना राबवून गावाचा "तंटामुक्त गाव" म्हणून गौरव प्राप्त केला आहे [२७]
प्रमुख देवस्थाने
[संपादन]गावात अनेक पारंपरिक आणि श्रद्धास्थानी देवस्थाने आहेत:
- श्री देव गांगेश्वर मंदिर – ग्रामदैवत; येथे स्वयंभू शिवलिंग असून महाशिवरात्रीला विशेष पूजन व उत्सव साजरे होतात.
- अत्रल देवी मंदिर – गावाच्या वेशीवर वसलेले; नवसाला पावणारी स्थानिक देवी.
- ठोंगळ देवी मंदिर – गावाच्या सीमारेषेवर; सीमासंरक्षणाचे प्रतीक मानले जाते.
- श्रीराम मंदिर – गावाच्या मध्यवर्ती भागात वसलेले; धार्मिक सणांचे केंद्रस्थान.
धार्मिक उत्सव
[संपादन]खडीकोळवण गावात विविध सण व उत्सव पारंपरिक, धार्मिक व सामाजिक एकात्मतेचे प्रतीक म्हणून साजरे केले जातात:
- रामनवमी, हनुमान जयंती, अत्रल देवी उत्सव, गोंधळ, वटपौर्णिमा, नागपंचमी
- गोकुळाष्टमी, नवरात्र, दसरा, दिवाळी, तुळशी विवाह
- गणेशोत्सव (गौर गणपती), शिमगा, बैलपोळा, मकर संक्रांत
- महाशिवरात्र, देव दिवाळी, जागर इत्यादी
या सणांदरम्यान गावातील विविध वाड्यांतर्फे एकत्र पूजन, गोंधळ, भजन, पारंपरिक वादन-नृत्य अशा कार्यक्रमांचे आयोजन होते. या परंपरा गावातील धार्मिक श्रद्धा, सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक वारसा यांचे संरक्षण करतात. गावात ग्रामदेवतेची पूजा, वार्षिक जत्रा आणि पारंपरिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. देवस्थान परिसरात विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम होतात[२८]
सण व उत्सव
[संपादन]खडीकोळवण गावात पारंपरिक पद्धतीने विविध सण आणि उत्सव साजरे केले जातात. हे उत्सव धार्मिक आस्था, सामाजिक एकत्रता आणि स्थानिक परंपरांचा भाग आहेत.
- होळी – फाल्गुन महिन्याच्या शुद्ध पंचमीपासून एकादशीपर्यंत 'फाग' साजरा केला जातो. द्वादशीला 'जांगलं होळी' व पौर्णिमेला 'होम' विधी होतो. खडीकोळवणसारख्या कोकणातील गावांमध्ये पालखी नृत्याची पारंपरिक परंपरा आजही जपली गेली आहे. ग्रामदेवतेची पालखी गावात घराघरांत जाते, आणि संपूर्ण गावात उत्सवाचा माहोल निर्माण होतो.[२९]
- शिमगा – खडीकोळवण गावात आजही कोकणातील पारंपरिक गावगाडा व्यवस्थेत मानपान चालीरीतींचे पालन केले जाते, विशेषतः शेतीसंबंधी समारंभ व सामाजिक निर्णयप्रक्रियांमध्ये. फाल्गुन पौर्णिमेला गावदेवतांना रूपे लावून पालखी गावातील प्रत्येक घराच्या भेटीला जाते. या परंपरेत भक्ती, श्रद्धा आणि कलात्मकता यांचा संगम पाहायला मिळतो.[३०]
- जागर – श्रावण शुद्ध त्रयोदशीला देवांना 'पोवते' (रक्षासूत्र) घालून जागरण केले जाते. यात धार्मिक गाणी, गोंधळ आणि लोकनाट्य स्वरूपाचे सादरीकरण होते.
- देव दिवाळी – या दिवशी देवाच्या कळसावर सजावट केली जाते. तांदळाच्या पिठाचे दिवे प्रज्वलित केले जातात आणि पारंपरिक प्रार्थना केली जाते – "इडा पिडा टळो, बळीचं राज्य चांगभलं".
- कौली जत्रा – पौष पौर्णिमेपूर्वीच्या शुक्रवारी गावदेवीकडून शेतीस प्रारंभ करण्याचा 'कौल' घेतला जातो. देवीला "राखण" दिली जाते आणि त्यानंतरच 'कवळ' तोडण्यास सुरुवात होते.
- पालिक सोमवार – प्रत्येक मराठी महिन्याचा पहिला सोमवार गावदेवतांच्या नावाने पाळला जातो. या दिवशी कोणतीही शेतीकामे केली जात नाहीत, हा दिवस श्रद्धा व विश्रांतीसाठी राखीव असतो.
एस.टी. मार्ग व परिवहन
[संपादन]खडीकोळवण गाव कोकण रेल्वे मार्गाशी थेट जोडलेले नसून, प्रवासासाठी जवळील रेल्वे स्थानके खालीलप्रमाणे आहेत:
- संगमेश्वर रोड रेल्वे स्थानक – गावापासून सुमारे ३० किमी अंतरावर
- रत्नागिरी रेल्वे स्थानक – सुमारे ४५ किमी अंतरावर
गावापर्यंत पोहोचण्यासाठी सार्वजनिक परिवहन (एस.टी. बस) मार्ग खालीलप्रमाणे आहेत:
- रत्नागिरी ⇌ देवरुख – अंदाजे ३८ किमी; प्रवास वेळ ~४५ मिनिटे [३२]
- देवरुख ⇌ खडीकोळवण – खडीकोळवण गाव देवृखपासून अंदाजे १५ किमी अंतरावर असून संगमेश्वर तालुक्याच्या पश्चिम भागात वसलेले आहे. [३३]
गावासाठी प्रमुख आगार – देवरुख एस.टी. आगार असून येथून खडीकोळवणसाठी मर्यादित पण नियमित बस सेवा उपलब्ध आहे.
नागरी सुविधा
[संपादन]खडीकोळवण गावात राष्ट्रीयीकृत बँक ऑफ इंडिया ची शाखा कार्यरत आहे. ही शाखा रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी शाखा असून, किसान, दुग्धव्यवसाय, विहीर खोदणे, शेळ्या–मेंढ्यांचे पालन, किराणा दुकान आणि विविध सेवा उद्योगांना कर्ज व वित्तपुरवठा करते.गावाजवळील बँक व्यवहार रत्नागिरी येथील Bank of India शाखेद्वारे पार पडतात, जिचा IFSC कोड BKID0001400 आहे[३५]
- ग्रामपंचायत खडीकोळवण ग्रामपंचायत ही महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या अधिपत्याखाली कार्यरत आहे.[३६]
- तलाठी कार्यालय – खडीकोळवण व ओझरे गाव मिळून एक तलाठी कार्यालय आहे. तलाठी सजा हे कार्यालयाचे काम पाहतात.
- टपाल कार्यालय – गावाचे टपाल कार्यालय ओझरे गावात आहे.
- पोलीस ठाणे – खडीकोळवण गाव मुर्शी व साखरपा पोलीस दूरक्षेत्राअंतर्गत येतो. पोलीस पाटील गावपातळीवर काम पाहतात.
- पंचायत समिती – खडीकोळवण गाव संगमेश्वर पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात येतो. कार्यालय देवरुख येथे आहे.
- जिल्हा परिषद – हा गाव रत्नागिरी जिल्हा परिषदच्या संगमेश्वर गटांतर्गत येतो.
- विधानसभा मतदारसंघ – खडीकोळवण चिपळूण विधानसभा मतदारसंघ अंतर्गत येतो.[३७]
- लोकसभा मतदारसंघ – हा गाव रत्नागिरी–सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येतो.
जवळची गावे
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ↑ "खडीकोळवण - लोकसंख्या आणि स्थान". Onefivenine. 2025-06-13 रोजी पाहिले.
- ↑ "Khadi Kolvan Village". MapsOfIndia (इंग्रजी भाषेत). Compare Infobase Limited. 2025-07-27 रोजी पाहिले.
- ↑ "Western Ghats Biodiversity and Land Use". Centre for Environment Education. CEE India. 2025-07-25 रोजी पाहिले.
- ↑ "Sakharpa to Arnala ST service resumes". साप्ताहिक कोकण मीडिया. 17 September 2020. रोजी मूळ पानापासून संग्रहित2020-10-05. 2025-07-25 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ↑ MSRTC स्थानिक सेवा अभिलेख (प्रादेशिक कार्यालय, रत्नागिरी)
- ↑ Joshi, G. V. (2009). कोकणातील लोकपरंपरा आणि सण-उत्सव. मुंबई: महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ.
- ↑ Deshpande, M. V. (2011). Folk Healing Traditions in Konkan (इंग्रजी भाषेत). Pune: University of Pune.
- ↑ "खडीकोळवण – शाळा – अमृत महोत्सव वर्ष – स्मरणिका (२०२१–२२)" (PDF). Wikimedia Commons. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खडीकोळवण. 2022. 2025-07-25 रोजी पाहिले.
- ↑ "1971 India–Pakistan War". Encyclopaedia Britannica. Britannica, Inc. 2025-07-25 रोजी पाहिले.
- ↑ खडीकोळवण ग्रामपंचायत कार्यालय अभिलेख (2023), संगमेश्वर तालुका, रत्नागिरी जिल्हा
- ↑ "कोकणातील पारंपरिक सण, लोककला आणि सांस्कृतिक उपक्रम". महाराष्ट्र टाइम्स. The Times Group. 2022-08-14. 2025-07-25 रोजी पाहिले.
- ↑ "खडीकोळवण – शाळा – अमृत महोत्सव वर्ष – स्मरणिका (२०२१–२२)" (PDF). Wikimedia Commons. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खडीकोळवण. 2022. 2025-07-25 रोजी पाहिले.
- ↑ "कोकणातील नद्यांची नैसर्गिक रचना बदलली!". Agrowon. Sakal Media Group. 2023-06-15. 2025-07-25 रोजी पाहिले.
- ↑ "कोकणातील मिरग राखण परंपरा". Windows of New Thoughts. Windows Media Foundation. 2024-06-07. 2025-07-25 रोजी पाहिले.
- ↑ "Western Ghats: ESA Draft Notification 2014" (PDF). Ministry of Environment, Forest and Climate Change. 2014-03-10. 2025-06-24 रोजी पाहिले.
- ↑ "Western Ghats Biodiversity and Land Use". CEE India – Eco Tales (इंग्रजी भाषेत). Centre for Environment Education. 2025-07-25 रोजी पाहिले.
- ↑ "Western Ghats ESA Opposition: Local Voices". Down To Earth (इंग्रजी भाषेत). Centre for Science and Environment. 2015-09-14. 2025-07-25 रोजी पाहिले.
- ↑ District Collector Office, Ratnagiri. "Nivave–Ozhare Budruk–Khadikolvan–Bamnoli–Nive–Marleshwar Road Four-Laning". Dated: 19 December 2025. Signed by Jivan Desai, Deputy Collector (Land Acquisition), District Collector Office, Ratnagiri. Official archived PDF.
- ↑ "कोकणात पर्यटकांसाठी गंधकयुक्त गरम पाण्याचा पर्याय". सकाळ. Sakal Media Group. 2021-06-30. 2025-07-25 रोजी पाहिले.
- ↑ "खडीकोळवण : गरम पाण्याच्या झऱ्यामुळे पर्यटकांचा ओघ". लोकमत. Lokmat Media Pvt. Ltd. 2023-12-18. 2025-07-25 रोजी पाहिले.
- ↑ "Western Ghats ESA Opposition: Local Voices". Down To Earth (इंग्रजी भाषेत). Centre for Science and Environment. 2015-09-14. 2025-07-25 रोजी पाहिले.
- ↑ "Western Ghats Biodiversity and Land Use". Centre for Environment Education (इंग्रजी भाषेत). CEE India. 2025-07-25 रोजी पाहिले.
- ↑ "Western Ghats ESA Opposition: Local Voices". Down To Earth (इंग्रजी भाषेत). Centre for Science and Environment. 2015-09-14. 2025-07-25 रोजी पाहिले.
- ↑ "Draft Notification – Western Ghats ESA 2014" (PDF) (इंग्रजी भाषेत). Ministry of Environment, Forest and Climate Change. 2014-03-10. 2025-07-25 रोजी पाहिले.
- ↑ "Western Ghats Biodiversity and Land Use". Centre for Environment Education (इंग्रजी भाषेत). CEE India. 2025-07-25 रोजी पाहिले.
- ↑ "खडीकोळवण - शाळा - अमृत महोत्सव वर्ष - स्मरणिका" (PDF). जिल्हा परिषद पू. प्रा. शाळा खडीकोळवण. 2025-06-24 रोजी पाहिले.
- ↑ "खडीकोळवण ग्रामपंचायत तंटामुक्त यशोगाथा". Example News. District Rural Development Office, Ratnagiri. 2023-12-14. 2025-07-25 रोजी पाहिले.
- ↑ "खडीकोळवण – ग्रामदेवता व उत्सव". कोकण संस्कृती वेब पोर्टल. Ratnagiri District Cultural Office. 2023-03-10. 2025-07-25 रोजी पाहिले.
- ↑ "कोकणातील अनोखी पालखी परंपरा; घराघरांत देवाचे आगमन". TV9 Marathi. TV9 नेटवर्क. 2024-04-11. 2025-07-25 रोजी पाहिले.
- ↑ "गावगाडा आणि मानपान चालीरीती". दैनिक प्रहार. Prahaar Media Group. 2022-07-24. 2025-07-25 रोजी पाहिले.
- ↑ "Distance from Sangameshwar to Devrukh". Rome2Rio (इंग्रजी भाषेत). Rome2Rio Pty Ltd. 2025-07-25 रोजी पाहिले.
- ↑ "Distance from Devrukh to Ratnagiri". Rome2Rio (इंग्रजी भाषेत). Rome2Rio Pty Ltd. 2025-07-25 रोजी पाहिले.
- ↑ "Khadi Kolvan distance from Devrukh". Nisar Gramyakonkan. Nisar Gramyakonkan Team. 2025-01-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2025-07-25 रोजी पाहिले.
- ↑ "Distance from Devrukh to Sakharpa". DistancesFrom.com (इंग्रजी भाषेत). 2025-07-25 रोजी पाहिले. खडीकोळवण गावाला पोहोचण्यासाठी महत्त्वाच्या मार्गांपैकी एक मार्ग देवृख जवळून जातो. Devrukh ते Sakharpa हे अंतर अंदाजे १६ किमी आहे, ज्यासाठी बस किंवा गाडीने सुमारे २५ मिनिटांचा प्रवास लागतो."Distance from Devrukh to Sakharpa". DistancesFrom.com (इंग्रजी भाषेत). 2025-07-25 रोजी पाहिले.
- ↑ "Bank of India Ratnagiri Branch IFSC Code BKID0001400". The Economic Times (इंग्रजी भाषेत). Times Internet. 2025-07-25 रोजी पाहिले.
- ↑ "ग्राम विकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन". rdd.maharashtra.gov.in. महाराष्ट्र शासन. 2025-07-25 रोजी पाहिले.
- ↑ "General Elections to State Legislative Assembly 2019 – Constituency Details" (इंग्रजी भाषेत). Chief Electoral Officer, Maharashtra. 2025-07-25 रोजी पाहिले.
