Jump to content

खंडू रांगणेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(खंडेराव मोरेश्वर रांगणेकर या पानावरून पुनर्निर्देशित)

खंडेराव मोरेश्वर रांगणेकर (जन्म : २७ जून १९१७; - ११ ऑक्टोबर १९८४) हे एक भारतीय क्रिकेट खेळाडू होते. ते डाव्या हाताने फलंदाजी व उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करीत. त्यांना दोन्ही हाताने क्षेत्ररक्षण व चेडूफेक करता येत होती आणि झेल घेता येत होते. रांगणेकर हे एक उत्तम बॅडमिंटनपटूही होते. त्यांचे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतचे आयुष्य महाराष्ट्राच्या ठाणे शहरात गेले. वयाच्या ४२ पर्यंत खंडू रांगणेकरांनी ४६०२ धावा जमवल्या. रांगणेकर आस्ट्रेलियात १९४७ च्या सुमारास तीन कसोटी सामने खेळले होते.

खंडू रांगणेकर
भारत
व्यक्तिगत माहिती
जन्म २७ जून, १९१७ (1917-06-27) (वय: १०८)
ठाणे,भारत
विशेषता फलंदाजी
फलंदाजीची पद्धत डाव्या हाताने
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने
आंतरराष्ट्रीय माहिती
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.प्र.श्रे.लि.अ.
सामने
धावा
फलंदाजीची सरासरी
शतके/अर्धशतके
सर्वोच्च धावसंख्या
चेंडू
बळी
गोलंदाजीची सरासरी -
एका डावात ५ बळी - - - -
एका सामन्यात १० बळी - - - -
सर्वोत्तम गोलंदाजी - -
झेल/यष्टीचीत

[[]], इ.स.
दुवा: [१] (इंग्लिश मजकूर)


[]

कारकीर्द

[संपादन]

त्यांच्या कारकिर्दीत खालील प्रमाणे बदल झाले.

  1. इसवी सन १९३९-४० - रणजी पदार्पण.शतकी खेळी.
  2. इसवी सन १९५८-५९ -रणजी निवृत्ती. शतकी खेळी.
  3. सर्वोत्तम डावखुरा फलंदाज व सर्वोत्कृष्ट बँडमिंटन खेळाडू एकाचवेळी सन्मान.
  4. २० वर्षे प्रथमश्रेणी क्रिकेट.
  5. प्रथमश्रेणी क्रिकेट - ८५ सामने,४६०२ धावा.
  6. रणजी - ८ शतके.
  7. राष्ट्रीय स्तरावर बँडमिंटन दुहेरी विजेतेपदक, एकेरी उपविजेतेपदक.
  8. इसवी सन १९६० ठाणे नगरपालिका - नगरसेवक.
  9. इसवी सन १९६०-६५ बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट - उपाध्यक्ष.
  10. त्यांच्या स्मरणार्थ ठाणे येथे त्यांच्या बंगल्यासमोर असलेल्या चौकाला क्रिकेट खेळाडू खंडू रांगणेकर चौक असे नाव दिलेले आहे.
  11. दादोजी कोंडदेव स्टेडियम मधील बँडमिंटन हॉलला त्यांचे नाव दिलेले आहे.

[]

खंडू रांगणेकरांना मिळालेले सन्मान

[संपादन]
  • ठाणे नगरपालिकेचे नगराध्यक्षपद
  • ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष व बोर्ड ऑफ कंट्रोल फाॅर क्रिकेट इन इंडिया (BCCI)चे उपाध्यक्ष होते.
  • ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये रांगणेकरांच्या नावाचा हाॅल आहे. तेथे बॅडमिंटन खेळायची सोय आहे.
  • ठाण्याच्या सुधाकर प्रधान मार्गावर खंडू रांगणेकर यांच्या नावाचे सभागृह आहे. सामाजिक समारंभांना तो हाॅल भाड्याने मिळू शकतो.

ठाण्यातील एका चौकाला क्रिकेट खेळाडू खंडू रांगणेकर चौक असे नाव दिलेले आहे.[]

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. ^ महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, गुरुवार,७ ऑगस्ट २०२५ लेख-मकरंद जोशी-ठाणे शहराच्या इतिहासाचे अभ्यासक
  2. ^ महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, गुरुवार,७ ऑगस्ट २०२५
  3. ^ महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, गुरुवार,७ ऑगस्ट २०२५