Jump to content

क्वांटास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(क्वांटास फ्रेट या पानावरून पुनर्निर्देशित)
क्वांटास
आय.ए.टी.ए.
QF
आय.सी.ए.ओ.
QFA
कॉलसाईन
QANTAS
स्थापना १६ नोव्हेंबर १९२०
हब मेलबर्न विमानतळ (मेलबर्न)
सिडनी विमानतळ (सिडनी)
ब्रिस्बेन
ॲडलेड
पर्थ
दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (दुबई)
मुख्य शहरे केर्न्स
लॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ (लॉस एंजेल्स)
अलायन्स वनवर्ल्ड
उपकंपन्या जेटस्टार एअरवेज
विमान संख्या १३१
ब्रीदवाक्य The Spirit of Australia
मुख्यालय सिडनी, न्यू साउथ वेल्स
संकेतस्थळ qantas.com.au
लंडन हीथ्रो विमानतळावर थांबलेले क्वांटासचे बोइंग ७४७ विमान

क्वांटास एअरवेज लिमिटेड ही ऑस्ट्रेलिया देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. हवाई वाहतूक सेवा पुरवणारी क्वांटास ही ऑस्ट्रेलियामधील सर्वात मोठी व जगातील दुसरी सर्वात जुनी कंपनी आहे.[][] क्वांटासचे मुख्यालय व मुख्य वाहतूक केंद्र सिडनीच्या मॅस्कॉट उपनगरात आहे. एका अहवालानुसार २०१० साली क्वांटास ही जगातील सातवी सर्वोत्तम हवाई कंपनी होती. सध्या क्वांटासमार्फत ऑस्ट्रेलियामधील २२ तर इतर १४ देशांमधील एकूण २१ शहरांमध्ये प्रवासी विमानसेवा पुरवली जाते.

२९ सप्टेंबर २०१४ पासून एअरबसचे ए३८० विमान वापरून सिडनी ते डॅलस ही जगातील सर्वात लांब पल्ल्याची विनाथांबा विमानसेवा चालू करण्याचा मान क्वांटासला मिळाला आहे.

इतिहास

[संपादन]

क्वांटासची स्थापना १६ नोव्हेंबर, इ.स. १९२० रोजी क्वीन्सलॅंडच्या विन्टन शहरात क्वीन्सलॅंड अँड नॉर्दर्न टेरिटोरी एरियल सर्व्हिसेस लिमिटेड या नावाने झाली.[] या कंपनीचे पहिले विमान ॲव्हरो ५०४के प्रकारचे होते. मे, इ.स. १९३५ मध्ये डार्विन ते सिंगापूर हे पहिले आंतरराष्ट्रीय उड्डाण होते. जून, इ.स. १९५९मध्ये क्वांटासने बोईंग ७०७-१३८ प्रकारच्या जेट विमानाचा आपल्या ताफ्यात समावेश केला.[]

मुख्यालय

[संपादन]

क्वांटासचे क्वान्टास सेंटर या नावाचे मुख्यालय बॉटनी बेजवळ आहे.[] सन १९२० मध्ये क्वीन्सलॅंड अँड नॉर्दर्न टेरिटरी एरियल सर्व्हिसेसचे लिमिटेडचे मुख्यालय क्वीन्सलॅंडमध्ये होते. सन १९२१ मध्ये लोंगरिच क्वीन्सलॅंडचे मुख्यालय सन १९३० मध्ये ब्रिस्बेन येथे स्थानांतरित झाले. सन १९५७ मध्ये सिडनीच्या हंटर स्ट्रीटवर कोन्ट्रास हाऊस उघडले. क्वांटासने ऑस्ट्रेलियाचे मूळचे आदिवासी तसेच टॉरस राज्याच्या बेटावरील रहिवासी यांच्याशी नेहमीच सुसंवाद साधलेला आहे. क्वान्टास एअरवेजने सन २००७ पासून जवळजवळ १० वर्षे या समाजातील १ ते २ % जनतेला एअरवेजच्या कामासाठी सामावून घेतलेले आहे. त्यासाठी एक त्रयस्थ व्यक्ती नियुक्त केली आहे आणि त्याच्यावर ही संपूर्ण जबाबदारी टाकली आहे. क्वान्टास एअरवेजने आदिवासींचे कलागुण जोपासले आहेत. तसेच त्यासाठी मदतही केली आहे. सन १९९३ मध्ये क्वान्टास एअरवेजने 'हनी, ॲन्ट अँड ग्रासहॉपर' नावाचे पेंटिंग मध्य ऑस्ट्रेलियाच्या जंगलात खरेदी केले. क्वान्टास एअरवेजने हे पेंटिंग न्यू साऊथ वेल्सच्या आर्ट गॅलरीला थोड्या दिवसासाठी दिले आहे. क्वान्टास एअरवेजने सन १९९६ मध्ये या आर्ट गॅलरीला आणखी ५ पेंटिगे दिली. क्वान्टास एअरवेजने या पूर्वीही या आदिवासी कलावंतांना प्रोत्साहित करून समर्थनही दिले आहे. क्वान्टास एअरवेजने फार पूर्वी म्हणजे सन १९६७ मध्ये अमेरिकेच्या प्रेक्षकांसाठी दूरचित्रवाणीनवर एक जाहिरातवाजा कार्यक्रम चालू केला होता, तो अनेक दशके चालला. त्यात एका कावळ्याला दाखविले होते. अनेक अमेरिकन ऑस्ट्रेलियात येतात पण ते क्वान्टास एअरवेजची घृणा करतात असे तक्रारीचे सूर या जाहिरातीत उमटले होते.[][][][]. क्वान्टास एअरवेज ही ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय रग्बी टीमची मुख्य प्रायोजक आहे. क्वान्टास एअरवेज ऑस्ट्रेलियाच्या ससेक्स फुटबॉल टीमलाही प्रायोजित करते. दि. 26-12-2011 रोजी क्वान्टास एअरवेज ने आस्ट्रेलिया क्रिकेट खेळाडूंच्या प्रवासी वाहतुकीसाठीचा ४ वर्षाचा करार केलेला आहे.

क्वांटासच्या उपकंपन्या

[संपादन]
क्वान्टास एम्पायर एअरवेज इंटरनॅशनलचे रोज बे येथे येत असलेले विमान (सी .१९३९)
  1. ऑस्ट्रेलिया एशिया एर
  2. इंपल्स
  3. ऑस्ट्रेलियाई
  4. क्वान्टास लिंक
  5. जेट स्टार
  6. नेटवर्क
  7. जेट कनेक्ट

नवीन पोषाख

[संपादन]

पॅरिसमध्ये राहणाऱ्या मार्टिन ग्रँट या ऑस्ट्रेलियन डिझाईनरने क्वान्टास एअरवेजच्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन पोषाख तयार केला होता. क्वान्टासने हा जनतेला दाखविला असता, पोषाख शरीरावर अतिशय घट्ट बसत असल्या कारणाने कर्मचारी नाराज झाले. अंगावर असे घट्ट कपडे असले तर काम करताना त्रास होतो हा त्यांचा मुद्दा होता.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "क्वांटास ने लवकर कर्ज परतफेडची योजना आखली" (इंग्लिश भाषेत). रोजी मूळ पानापासून संग्रहित2014-06-12. 2015-04-15 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link) CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "क्वांटासच्या नियमित ग्राहकांना मिळणार मायक्रोचिप" (इंग्लिश भाषेत). रोजी मूळ पानापासून संग्रहित2012-08-04. 2016-02-14 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link) CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  3. ^ "छोटी सुरुवात आमच्या कंपनी" (इंग्लिश भाषेत). रोजी मूळ पानापासून संग्रहित2012-08-04. 2016-02-14 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link) CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  4. ^ "क्वांटास एरवेझ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ "क्वान्टासचे दुसरे सबंध" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  6. ^ "प्राथमिक अहवाल २०११" (PDF) (इंग्लिश भाषेत). 2015-01-26 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2015-04-15 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य); Unknown parameter |पाहिले= ignored (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  7. ^ "सुरुवातीचा मुख्य अहवाल २०१२" (PDF) (इंग्लिश भाषेत). 2015-01-26 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2015-04-15 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य); Unknown parameter |पाहिले= ignored (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  8. ^ "अंतिम अहवाल २०१३" (PDF) (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  9. ^ "अंतिम अहवाल २०१४" (PDF) (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: