क्लॉडिया ऑक्टाव्हिया
Appearance
क्लॉडिया ऑक्टाव्हिया (इ.स. ३९/४०:रोम, इटली - ८ जून, ६२:पांडाटेरिया, इटली) ही रोमन साम्राज्ञी होती. ही रोमन सम्राट नीरोची पत्नी आणि सम्राट क्लॉडियसची मुलगी होती तसेच सम्राट कॅलिगुलाची चुलतबहीण तर तायबेरियसची चुलतनात होती.
तिला मूल न झाल्याने नीरोने तिच्यापासून घटस्फोट घेतला आणि व्यभिचाराचा आरोफ ठेवून तिला हद्दपार केले. रोमच्या जनतेमध्ये लोकप्रिय असलेल्या क्लॉडियाला परत आणण्यासाठी तेथे निदर्शने झाली. नीरोने तिच्याशी पुन्हा लग्न करण्याचे कबूल केले परंतु तसे न करता तिच्या हत्येचा आदेश दिला. काही दिवसांनी हा आदेश पार पाडण्यात आला.