क्लियर अँड प्रेझेंट डेंजर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

क्लियर अँड प्रेझेंट डेंजर हा १९९४मध्ये प्रदर्शित झालेला इंग्लिश चित्रपट आहे. हा चित्रपट टॉम क्लान्सीच्या १९८९मध्ये लिहिलेल्या कादंबरीवर आधारित आहे. जॅक रायन शृंखलेतील हा तिसरा चित्रपट द हंट फॉर द रेड ऑक्टोबर आणि पेट्रियट गेम्स नंतरचा आहे. हॅरिसन फोर्डने जॅक रायनची भूमिका केलेला आणि फिलिप नॉइसने दिग्दर्शित केलेला या शृंखलेतील शेवटचा चित्रपट आहे.

पेट्रियट गेम्सनंतरचे कथानक असलेल्या या चित्रपटात जॅक रायनची सी.आय.ए.चा उपनिदेशक (गुप्तमाहिती) या पदावर नेमणूक झाल्यावर तो कोलंबियातील अंमली पदार्थांच्या व्यापाऱ्यांशी सुरू झालेल्या गुप्तयुद्धात ओढला जातो. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना माहिती असेलेले परंतु जनतेला माहिती नसलेल्या या कारवाईमध्ये तो स्वतः गुंतला जातो.