क्रायोनिक्स
Vitrification of bodies with the intent of future revival | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
प्रकार | branch of physics | ||
---|---|---|---|
पासून वेगळे आहे |
| ||
| |||
![]() |

क्रायोनिक्स (ग्रीक भाषेत क्रायोस, म्हणजे "थंड") हे कमी-तापमानावर अवयव किंवा पूर्ण शरीर गोठवण्याच्या प्रक्रियेला म्हणतात. ह्यात सामान्यत: −१९६ °से (−३२०.८ °फॅ; ७७.१ के) वर शरीर गोठवतात आणि भविष्यात पुनरुत्थान शक्य होईल या आशेवर मनुष्याचे अवशेष ठेवले जातात.[१][२] मुख्य प्रवाहातील वैज्ञानिक समुदायाद्वारे क्रायोनिक्सला संशयास्पद मानले जाते. हे सामान्यतः छद्म विज्ञान म्हणून पाहिले जाते,[३] आणि त्याची प्रथा फसवेगिरी म्हणून ओळखली जाते.[४][५]
क्रायोनिक्स प्रक्रिया "रुग्ण" वैद्यकीय आणि कायदेशीररित्या मृत झाल्यानंतरच सुरू होऊ शकते. प्रक्रिया मृत्यूच्या काही मिनिटांत सुरू होऊ शकते, [६] आणि गोठवतांना बर्फ तयार होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करण्यासाठी क्रायोप्रोटेक्टंट्स वापरतात.[७] विट्रिफिकेशन झालेल्या प्रेताचे पुनरुज्जीवन करणे शक्य नाही, कारण यामुळे मेंदूला नुकसान होते, त्याच्या न्यूरल सर्किट्ससह.[८][९]
क्रायोनिक्स संरक्षणाचे प्रारंभिक प्रयत्न १९६० आणि १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला केले गेले. १२ जानेवारी १९६७ मध्ये गोठवलेले पहिले प्रेत जेम्स बेडफोर्डचे होते.[१०] २०१४ पर्यंत, अमेरिकेची संयुक्त संस्थानांमध्ये सुमारे २५० मृतदेह गोठवली गेली होते, आणि १५०० लोकांनी त्यांच्या अवशेषांच्या गोठवण्याची व्यवस्था केली होती.[११]
आर्थिक दृष्ट्या क्रायोनिक्स कंपन्यांना हे परवडण्याजोगे नाही कारण[१२] "रुग्ण" स्वतः मृत असल्याने तो स्वतःचे अवशेष राखून ठेवण्यासाठी पैसे देऊ शकत नाही.[१३]
पुनरुत्थानासाठी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे होणारे नुकसान, क्रायोप्रोटेक्टंटचा विषारीपणा, थर्मल स्ट्रेस (फ्रॅक्चर) आणि काही अवयव जर नीट गोठले नाही; हे सर्व महत्त्वाचे घटक होतात. आणि त्यानंतर मुळ मृत्यूचे कारण पण दुरूस्त करणे आवश्यक आहे. बऱ्याच प्रकरणांमध्ये, विस्तृत ऊतक पुनरुत्पादन आवश्यक असेल.[१४] ह्या मुळे हे पुनरुज्जीवन तंत्रज्ञान संशयास्पद मानले जाते.[१]
संदर्भ
[संपादन]- ^ a b McKie, Robin (13 July 2002). "Cold facts about cryonics". The Observer. 8 July 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 December 2013 रोजी पाहिले.
Cryonics, which began in the Sixties, is the freezing – usually in liquid nitrogen – of human beings who have been legally declared dead. The aim of this process is to keep such individuals in a state of refrigerated limbo so that it may become possible in the future to resuscitate them, cure them of the condition that killed them, and then restore them to functioning life in an era when medical science has triumphed over the activities of the Grim Reaper.
- ^ "Dying is the last thing anyone wants to do – so keep cool and carry on". The Guardian. 10 October 2015. 3 July 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 21 February 2016 रोजी पाहिले.
- ^ Steinbeck RL (29 September 2002). "Mainstream science is frosty over keeping the dead on ice". Chicago Tribune. 2019-07-17 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2019-07-17 रोजी पाहिले.
- ^ Butler K (1992). A Consumer's Guide to "Alternative" Medicine. Prometheus Books. p. 173.
- ^ Carroll, Robert Todd (5 December 2013). "Cryonics". The Skeptics Dictionary: A Collection of Strange Beliefs, Amusing Deceptions, and Dangerous Delusions.
A business based on little more than hope for developments that can be imagined by science is quackery. There is little reason to believe that the promises of cryonics will ever be fulfilled
- ^ Hendry, Robert; Crippen, David (2014). "Brain Failure and Brain Death". ACS Surgery: Principles and Practice critical care. Decker Intellectual Properties Inc. pp. 1–10. 2021-01-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-03-03 रोजी पाहिले.
A physician will pronounce a patient using the usual cardiorespiratory criteria, whereupon the patient is legally dead. Following this pronouncement, the rules pertaining to procedures that can be performed change radically because the individual is no longer a living patient but a corpse. In the initial cryopreservation protocol, the subject is intubated and mechanically ventilated, and a highly efficient mechanical cardiopulmonary resuscitation device reestablishes circulation.
- ^ Best BP (April 2008). "Scientific justification of cryonics practice" (PDF). Rejuvenation Research. 11 (2): 493–503. doi:10.1089/rej.2008.0661. PMC 4733321. PMID 18321197. 2018-07-21 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2013-12-26 रोजी पाहिले.
- ^ Miller K (2004). "Cryonics redux: is vitrification a viable alternative to immortality as a popsicle?". Skeptic. 11 (1): 24.
- ^ Devlin, Hannah (18 November 2016). "The cryonics dilemma: will deep-frozen bodies be fit for new life?". The Guardian. 24 January 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 21 January 2019 रोजी पाहिले.
- ^ "Death To Dust: What Happens To Dead Bodies? 2nd Edition, Chapter 7: Souls On Ice". 2019-03-27 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2016-03-21 रोजी पाहिले.
- ^ Moen, OM (August 2015). "The case for cryonics". Journal of Medical Ethics. 41 (18): 493–503. doi:10.1136/medethics-2015-102715. PMID 25717141.
- ^ Stodolsky DS (2016). "The growth and decline of cryonics". Cogent Social Sciences. 2 (1): 1167576. doi:10.1080/23311886.2016.1167576.
- ^ "The law on cryonics". Human Tissue Authority. 26 September 2018. 30 September 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 October 2019 रोजी पाहिले.
- ^ Karow, Armand; Webb, Watts (1965). "Tissue Freezing: A theory for injury and survival". Cryobiology. 2 (3): 99–108. doi:10.1016/s0011-2240(65)80094-3. PMID 5860601.