क्रतु
क्रतु हे हिंदू धर्मात निर्माता देवता ब्रह्मा यांच्या मनाने जन्मलेल्या मानसपुत्रांपैकी एक आहे. ते एक ऋषी आहे, जे दोन वेगवेगळ्या युगात प्रकट होतो. [१]
ते पहिल्या मनूच्या काळातील सात महान ऋषींपैकी, सप्तर्षी, एक मानले जातात. ह्यांची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या मनातून झाली असे मानले जाते. दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार, ते त्याच्या वडिलांच्या डाव्या डोळ्यातून जन्माला आले असे मानले जाते.
आख्यायिका
[संपादन]स्वयंभूव मन्वंतरात, क्रतु हा ब्रह्मदेवाचा पुत्र असुन एक प्रजापती होता. तो प्रजापती कर्दमचा जावई देखील आहे. त्याच्या पत्नीचे नाव क्रिया आहे. असे म्हटले जाते की त्यांना ६०,००० मुले आहेत. त्यांचे नाव ऋग्वेदाच्या आठव्या ग्रंथात समाविष्ट आहे. क्रतुला पुण्य आणि सत्यवती या दोन बहिणी देखील आहेत.[२]
पुराणांमध्ये क्रतुचे लग्न संततीशी झाल्याचे म्हटले आहे आणि या जोडप्याला साठ हजार मुले आहेत, ज्यांना बालाखिल्य म्हणतात, जे प्रत्येकी अंगठ्याएवढे होते, परंतु इंद्रियांवर त्यांचे खूप प्रभुत्व होते. महाभारतानुसार, ऋषी कश्यपांना यज्ञात मदत करताना, त्यांनी लाकडाचे तुकडे सोबत नेले होते. देवांचा राजा इंद्र त्यांच्या लाकडाचे छोट्या तुकड्यांवर हसला. ह्या अपमानामुळे क्रतुने आपल्या तपश्चर्येच्या बळावर दुसरा इंद्र निर्माण करण्यास सुरुवात केली. घाबरून इंद्राने कश्यपाची मदत मागितली. ऋषींनी बालाखिल्यांना शांत केले आणि त्यांना सांगितले की त्यांच्या तपश्चर्येचे फळ व्यर्थ जाणार नाही; त्यांना त्या वेळी तपश्चर्या करणाऱ्या विनताला आशीर्वाद देण्यासाठी नियुक्त केले जाईल, जी इंद्रावर मात करू शकेल असा मुलगा होण्यासाठी तप करत होती. त्यानुसार, तिच्या पोटी गरुडाचा जन्म झाला, जो इंद्र आणि देवांना पराभूत करेल आणि त्याच्या आईला कद्रूच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी अमृत मिळवेल.[३] एका वेगळ्या कथेत, बालाखिल्या शिवाला प्रसन्न करू शकले, ज्याने त्यांना वरदान दिले की ते एक पक्षी निर्माण करू शकतील, जो इंद्राकडून अमृताचे भांडे चोरेल.[४]
शिवाच्या वरदानाने क्रतुचा पुन्हा वैवस्वत मन्वन्तरात (सातवा आणि सध्याचा मन्वन्तर ) जन्म झाला. या मन्वंतरात, त्याला कुटुंब नव्हते व त्याने अगस्त्यचा मुलगा इध्मवाहला दत्तक घेतले. त्याची उत्पत्तीबद्दल ब्रह्मदेवाच्या हातातून झाली असे म्हटले जाते.
संदर्भ
[संपादन]- ↑ www.wisdomlib.org (2015-12-21). "Kratu: 23 definitions". www.wisdomlib.org (इंग्रजी भाषेत). 2022-10-31 रोजी पाहिले.
- ↑ www.wisdomlib.org (2015-12-21). "Kratu: 23 definitions". www.wisdomlib.org (इंग्रजी भाषेत). 2022-10-31 रोजी पाहिले.
- ↑ www.wisdomlib.org (2015-12-21). "Kratu: 23 definitions". www.wisdomlib.org (इंग्रजी भाषेत). 2022-10-31 रोजी पाहिले.
- ↑ Sathyamayananda, Swami (2012). Ancient sages. Mylapore, Chennai: Sri Ramakrishna Math. pp. 26–28. ISBN 978-81-7505-356-4.