Jump to content

कोस्ट स्टारलाइट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कोस्ट स्टारलाइट
२०१९मध्ये सांता इनेझ नदी पार करताना कोस्ट स्टारलाइट
माहिती
सेवा प्रकार सुपरफास्ट
प्रदेश अमेरिकेचा पश्चिम किनारा
शेवटची धाव अद्याप सुरू
चालक कंपनी ॲमट्रॅक
सरासरी प्रवासी ३,५२,७२५ (२०२२)
मार्ग
सुरुवात सिॲटल रेल्वे स्थानक
थांबे २८
शेवट लॉस एंजेलस रेल्वे स्थानक
अप क्रमांक १४
डाउन क्रमांक ११
अंतर २,२१६ किमी (१,३७७ मैल)
साधारण प्रवासवेळ ३५ तास २१ मिनिट
वारंवारिता रोज
प्रवासीसेवा
प्रवासवर्ग शयनयान, कोच क्लास, बिझनेस क्लास
बसण्याची सोय विमानाप्रमाणे चार आसनांची रांग
दोन व्यक्तींसाठी खोली,
चार व्यक्तींसाठी खोली
झोपण्याची सोय नाही
खानपान डायनिंग कार, कॅफे
निरीक्षण सोय साइटसीयर लाउंज कार
सामान ठेवण्याची सोय प्रवासी कंपार्टमेंटमध्ये, वेगळा सामानाचा डबा
तांत्रिक माहिती
डबे, इंजिने, इ. दोन जीई पी४२डीसी इंजिने
गेज स्टँडर्ड गेज
विद्युतीकरण नाही
वेग ६४ किमी/तास सरासरी १२८ किमी/तास (सर्वोच्च)

कोस्ट स्टारलाइट प्रवासी रेल्वेगाडी आहे. ही अमेरिकेतील सिॲटल पासून लॉस एंजेलसपर्यंत धावते. ही गाडी पोर्टलँड आणि सान फ्रांसिस्को बे एरियातून जाते. ही गाडी १९७१मध्ये ॲमट्रॅकच्या निर्मिती झाल्यापासून सतत सुरू आहे. या गाडीला पूर्वीच्या सदर्न पॅसिफिकच्या कोस्ट डेलाइट आणि स्टारलाइट या दोन गाड्यांचे मिळून दिलेले आहे.

२०१९मध्ये ४,२६,०२९ प्रवाशांनी या गाडीतून प्रवास केला.[] २०१६ साली या गाडीने ४ कोटी डॉलरचे उत्पन्न मिळवले होते.

१९७४ मध्ये टॅकोमा येथे कोस्ट स्टारलाइट
१९८५ मध्ये सान लुइस ओबिस्पो जवळील क्वेस्ता टेकड्यांमधून धावणारी कोस्ट स्टारलाइट
२७ डिसेंबर, २०१८ रोजी मूरपार्क, कॅलिफोर्निया येथे उत्तरेकडे निघालेली कोस्ट स्टारलाइट
कोस्ट स्टारलाइटचा प्रवासमार्ग (interactive map)

मार्ग

[संपादन]

कोस्ट स्टारलाइट लॉस एंजेलस-सान होजे-पोर्टलँड-सिॲटल मार्गावर रोज एकदा धावते. २,२१६ किमी (१,३७७ मैल) अंतर पार करण्यासाठी या गाडीला ३४ तास लागतात.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Amtrak FY19 Ridership" (PDF).

बाह्य दुवे

[संपादन]
  • विकिमिडिया कॉमन्सवर Coast Starlight शी संबंधित संचिका आहेत.