कोल्ह्याची अक्कलहुशारी (लोककथा)
परिस्थितीचे निरीक्षण करून योग्य तो निष्कर्ष कसा काढावा हे कोल्ह्याची अक्कलहुशारी या लोककथेतील कोल्हयाकडून शिकायला मिळते.
कथेचा आशय
[संपादन]एक सिंह, एक लांडगा आणि एक कोल्हा एकत्रितपणे शिकार करण्यासाठी निघाले. त्यांनी एक गाढव, हरिण मारले आणि एक ससा मारला.
ही शिकार करून झाल्यावर सिंह लांडग्याला म्हणाला, “मित्रा लांडग्या, ही शिकार आपण कशी वाटून घ्यायची?”
लांडगा म्हणाला, “तीन प्राण्यांचे तुकडे करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही गाढव घ्या, कोल्ह्याला ससा घेऊ दे आणि माझ्या वाट्याबाबत म्हणाल तर मी हरिणावर समाधानी राहीन.” रागाने केलेली गर्जना हेच सिंहाचे त्यावरील उत्तर होते. पंजाच्या एका फटकाऱ्यानिशी त्याने त्या लांडग्याचे मुंडके चिरडून टाकले, जणू ती लांडग्याने दिलेल्या सल्ल्याची बक्षिसी होती.
मग कोल्ह्याकडे वळून सिंह म्हणाला, “प्रिय मित्रा, तू काय सुचवशील ?” “महाराज, ” कोल्हा आदबीने झुकून म्हणाला, “अगदीच साधीशी गोष्ट आहे ही. तुम्ही तुमच्या न्याहारीला गाढव खावे, हरिण तुमच्या संध्याकाळच्या भोजनासाठी होईल आणि ससा ह्या दोन्ही भोजनांच्या दरम्यान हलका आहार म्हणून खा.”
“फारच छान,” सिंह म्हणाला; सर्व शिकार एकट्यालाच मिळणार म्हणून खुषीत आलेल्या सिंहाने विचारले,“तुला इतके हुशारीने आणि न्यायाने बोलायला कोणी शिकविले ?”
“लांडग्याने,” कोल्ह्याने धूर्तपणाने उत्तर दिले.
तात्पर्य
[संपादन]कोल्हा अशा रितीने का बोलला ? त्याचे हे शब्द सत्याला धरून नव्हते, ती केवळ चलाखी होती. [१]
संदर्भ
[संपादन]- ↑ The Mother (2004). Words of Long Ago. COLLECTED WORKS OF THE MOTHER. 02 (2nd ed.). Pondicherry: Sri Aurobindo Ashram. ISBN 81-7058-670-4.