Jump to content

कोमिसो विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कोमिसो विमानतळ 
airport located in the town of Comiso in the Province of Ragusa, Sicily, Italy and serves Comiso (5 km [3.1 mi]), Ragusa (15 km [9.3 mi]), Vittoria and Gela
माध्यमे अपभारण करा
प्रकार
याचे नावाने नामकरण
  • Comiso
स्थान
  • Comiso
  • Chiaramonte Gulfi
  • इटली
अधिकृत उद्घाटनाचा दिनांक
  • एप्रिल ३०, इ.स. २००७
समुद्रसपाटीपासूनची उंची
  • २३० m
आय.ए.टी.ए. कोड
  • CIY
आय.सी.ए.ओ. कोड
  • LICB
अधिकृत संकेतस्थळ
Map३६° ५९′ ३०″ N, १४° ३६′ २५″ E
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q1431127
OpenStreetMap way ID: 211454743
विकिडाटावर माहिती संपादित करा

कोमिसो विमानतळ "पिओ ला तोर्रे" (आहसंवि: CIY, आप्रविको: LICB) तथा व्हिन्सेंझो मॅलिओक्को विमानतळ हा इटलीमधील सिचिल्याच्या रागुसा प्रांतातील कोमिसो शहरातील विमानतळ आहे. हा विमानतळ रागुसा (१५ किमी), व्हित्तोरिया आणि गेला या शहरांना विमानसेवा पुरवतो. पूर्वी फक्त लष्करी वापर असलेल्या या विमानतळाचे रुपांतर २००५ ते २००८ दरम्यान नागरी विमानतळात करण्यात आले. ३० मे २०१३ रोजी हा विमानतळ व्यावसायिक आणि खाजगी विमान वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

इतिहास

[संपादन]

१९३५–१९८०

[संपादन]
चित्र:Comiso Airport wiki.jpg
एटीसी मनोरा

या विमानतळाची सुरुवात आग्नेय सिचिल्यामध्ये, हिब्लियन पर्वतरांगेच्या पायथ्याशी आणि कोमिसो शहराजवळ बांधलेल्या एका धावपट्टीपासून झाली. याची आखणी १९३४ मध्ये फाशीवादी राजवटीत करण्यात आली होती, परंतु बांधकामाची सुरुवात १९३५ मध्ये होऊन ते १९३९ मध्ये बांधकाम पूर्ण झाले. १९३६ मध्ये या तळाला इटलीच्या वायुसेनेचे पहिले सिचिल्याई अधिकारी मेजर जनरल व्हिन्सेंझो मॅलिओक्को यांचे मॅलिओक्को विमानतळ असे नाव नाव देण्यात आले. मॅलिओक्को १९३६ मध्ये इथियोपियाच्या युद्धात मारले गेले होते.[]

हा विमानतळदुसऱ्या महायुद्धात दक्षिण सिचिल्यातील महत्त्वाच्या विमानतळांपैकी एक होता. युद्धाच्या सुरुवातीस इटली अक्ष राष्ट्रांचा भाग होते व त्यांच्याशी केल्या गेलेल्या करारानुसार १९४१ मध्ये जर्मन सैन्य येथे तैनात होते. १९४३ मध्ये ट्युनिसियातून माघार घेतल्यावर जर्मन वायुसेनेने येथून मागरेब आणि माल्टामधील दोस्त राष्ट्रांच्या प्रदेशावर हवाई हल्ले केले.

सिचिल्यावरील दोस्त राष्ट्रांच्या आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर २६ मे आणि १७ जून १९४३ रोजी दोस्त वायुसेने केलेल्या बाँबफेकीत हा विमानतळ निकामी झाला. दोस्त राष्ट्रांचे सैन्य येथून जवळील किनाऱ्यावर उतरल्यानंतर, दोन जेयू ८७ स्टुका बाँबफेकी विमानांनी कोमिसोवरून उड्डाण केले, परंतु इंधन भरण्यासाठी परतल्यावर त्यांना तेथे अमेरिकन सैनिकांनी गाठले. लेफ्टनंट जनरल ओमर ब्रॅडली यांच्या नेतृत्वाखालील सैन्य दलाने ११ जुलै १९४३ रोजी हा तळ ताब्यात घेतला. विमानतळाच्या जलद दुरुस्तीनंतर १७ जुलैपासून दोस्त राष्ट्रांच्या वायुसेनेने येथून कारवाया सुरू केल्या. दोस्त राष्ट्रांनी याला कोमिसो एरफील्ड असे नाव दिले आणि ते अमेरिकन वायुसेनेच्या १२व्या डिव्हिजनच्या नियंत्रणाखाली आले. याचा मुख्य वापर हवाई छत्रीधारी आणि ग्लायडर मोहिमांसाठी केला गेला.

युद्ध संपल्यानंतर १९४५ मध्ये दोस्त राष्ट्रांनी हा तळ सोडला. युद्धोत्तर काळात या विमानतळाचा वापर कमी झाला. १९५४ मध्ये अलिटालिया या इटलीच्या राष्ट्रीय विमान कंपनीने येथून व्यावसायिक उड्डाणे सुरू केली. नागरी विमान वाहतुकीसाठी धावपट्टीची लांबी १७४० मीटरपर्यंत वाढवण्यात आली. १९७३ पर्यंत मर्यादित प्रमाणात हा विमानतळ इटलीच्या वायुसेना तळ होता.

१९८१–१९९१

[संपादन]

शीतयुद्धाच्या काळात ७ ऑगस्ट १९८१ रोजी सोव्हिएत युनियनने तैनात केलेल्या नवीन क्षेपणास्त्रांना उत्तर म्हणून नाटोने या तळाची निवड बीजीएम-१०९जी या जमिनीवरून डागल्या जाणाऱ्या क्रूझ क्षेपणास्त्रांच्या मुख्य युरोपीय केंद्र म्हणून करण्यात आली.

त्यासुमारास कोमिसोमध्ये नवीन पायाभूत सुविधांचे बांधकाम करण्यासाठी अमेरिकन नौदलाचे अधिकारी मार्च १९८२ मध्ये दाखल झाले. त्या वेळी तळावरील जुन्या इमारतींची पडझड झाली होती आणि धावपट्टीवर झाडे उगवली होती. जुन्या इमारती पाडून नवीन तळ उभारण्याचे काम १३ ऑगस्ट १९८२ रोजी पूर्ण झाले. दुसऱ्या महायुद्धातील न फुटलेले बाँब मोठ्या प्रमाणात असल्याने हे काम अत्यंत सावधगिरीने करण्यात आले. मे १९८३ मध्ये ४८७व्या टॅक्टिकल मिसाईल विंगची स्थापना करण्यात आली. १९८३ च्या अखेरीस निवासी इमारती आणि इतर सुविधांचे बांधकाम पूर्ण झाले.

१९८३ च्या उन्हाळ्यात तळाच्या परिसरात जुलै ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अण्वस्त्रविरोधी निदर्शनांमध्ये सुमारे ५,००० आंदोलक सहभागी झाले होते. या आंदोलनांनंतर पुढील काही वर्षांत फारशा घटना घडल्या नाहीत. १९८३ ते १९९१ या काळात कोमिसो हवाई तळ हा दक्षिण युरोपमधील सर्वात मोठा नाटो तळ होता आणि तिथे ११२ अण्वस्त्रवाहू क्रूझ क्षेपणास्त्रे तैनात होती. १९८७ च्या अण्वस्त्र निर्मूलन करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर, ३० जून १९९१ रोजी हा तळ अधिकृतपणे बंद करण्यात आला.

१९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात भूतपूर्व युगोस्लाव्हियामधील युद्धामुळे विस्थापित झालेल्या ५,००० कोसोव्हन निर्वासितांना तात्पुरता आश्रय देण्यासाठी या तळाचा वापर करण्यात आला.

१९९२–वर्तमान

[संपादन]
कोमिसो विमानतळाचा नवीन २,५३८ मीटर लांबीच्या धावपट्टीसह नकाशा

२००४ मध्ये विमानतळाचे पुनरुत्थान सुरू झाले २००८ च्या हिवाळ्यात हे पूर्ण झाले. नवीन धावपट्टी २,५३८ मीटर लांब आणि ६० मीटर रुंद बांधण्यात आली. विमानांच्या अचूक लँडिंगसाठी आयएलएस प्रणाली बसवण्यात आली आणि १९ मीटर उंच नवीन नियंत्रण मनोरा (एटीसी टॉवर) बांधण्यात आला.

३० एप्रिल २००७ रोजी नवीन धावपट्टीवर पहिले नागरी उड्डाण झाले आणि ३० मे २०१३ रोजी विमानतळ अधिकृतपणे वाहतुकीसाठी खुले झाले. १९८२ मध्ये सिसिलियन माफियाकडून हत्या झालेले पालेर्मोचे राजकारणी पिओ ला तोर्रे यांच्या सन्मानार्थ २०१४ मध्ये या विमानतळाचे नामकरण करण्यात आले.[]

विमान कंपन्या आणि गंतव्यस्थाने

[संपादन]

खालील विमान कंपन्या कोमिसो विमानतळावरून नियमित नियोजित आणि भाड्याने घेतलेली (charter) उड्डाणे चालवतात:

विमान कंपनीगंतव्य स्थान .
एरोइतालियातोरिनो[]


मोसमी: काग्लियारी[]

निओसमोसमी: व्हेरोना[]
स्काय व्हिजनमोसमी भाड्याने (charters): शर्म अल शेख[]
स्मार्टविंग्समोसमी भाड्याने : प्राग[]
ट्रान्सएव्हियामोसमी: पॅरिस–ओर्ली
व्होलोटियामोसमी: लील,[] व्हेरोना[]
व्हुएलिंगमोसमी: बार्सिलोना[१०]
विझ्झ एरमोसमी: तिराना,[११] कातोवित्सा (४ जुलै २०२६ पासून)[१२]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "Comiso Airfield | American Air Museum in Britain". www.americanairmuseum.com. २०२२-०२-१६ रोजी पाहिले.
  2. Italia, Redazione (2014-06-07). "Finally the Comiso Airport will be renamed after Pio La Torre". Pressenza (इंग्रजी भाषेत). २०२५-०७-११ रोजी पाहिले.
  3. "Comiso decolla con la continuità territoriale". insiemeragusa.it (Italian भाषेत). ८ जानेवारी २०२६.CS1 maint: unrecognized language (link)
  4. https://italiavola.com/2026/01/24/aeroitalia-apre-quattro-nuove-rotte-da-cagliari/
  5. "Neos volerà da Comiso anche nel 2024". italiavola.com (Italian भाषेत). ५ जानेवारी २०२४.CS1 maint: unrecognized language (link)
  6. "Sky Vision Airlines opera il primo Comiso-Sharm el Sheikh". aitaliavola.com (Italian भाषेत). २० एप्रिल २०२५.CS1 maint: unrecognized language (link)
  7. "Orario Voli". aeroportodicomiso.eu (Italian भाषेत). २० एप्रिल २०२५.CS1 maint: unrecognized language (link)
  8. "VOLOTEA ANNUNCIA LA NUOVA ROTTA COMISO – LILLE". italiavola.com (Italian भाषेत). १७ डिसेंबर २०२४.CS1 maint: unrecognized language (link)
  9. "Volotea rilancia su Verona: dal 2026 torna il volo per Comiso". १८ डिसेंबर २०२५.
  10. "Vueling riapre su Comiso". १३ मे २०२४.
  11. "News for Airlines, Airports and the Aviation Industry". Text " CAPA " ignored (सहाय्य)
  12. "Wizz Air apre la rotta stagionale Comiso – Katowice". १८ फेब्रुवारी २०२६.