कोमिनो
Maltese island | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
प्रकार | बेट | ||
---|---|---|---|
ह्याचा भाग | माल्टा, Maltese Islands | ||
स्थान | सिचिल्या, इटली | ||
पाणीसाठ्याजवळ | भूमध्य समुद्र | ||
Located in/on physical feature | Maltese Islands | ||
रुंदी |
| ||
लांबी |
| ||
लोकसंख्या |
| ||
क्षेत्र |
| ||
समुद्रसपाटीपासूनची उंची |
| ||
![]() | |||
| |||
![]() |
कोमिनो तथा केम्मुना हे भूमध्य समुद्रातील माल्टा आणि गोझो बेटांमधील एक लहान बेट आहे. याचे क्षेत्रफळ ३.५ चौरस किमी (१.४ चौ. मैल) आहे. याला जिऱ्याचे (क्युमिन) नाव देण्यात आले आहे. या बेटावर फक्त दोन कायमस्वरुपी रहिवासी आहेत. यांशिवाय एक धर्मगुरू आणि एक पोलिस कर्मचारी रोज येथे कामासाठी येतात. हे बेट एक पक्षी अभयारण्य आणि नैसर्गिक राखीव जागा आहे.
या बेटाला प्राचीन ग्रीक काळात इफॅस्टिया असे नाव होते, [१] रोमन काळात कोमिनोमध्ये शेतकऱ्यांची वस्ती असल्याच्या नोंदी आहेत. [२] कोमिनोची किनारपट्टी खडकाळ असून मोठ्या भागात चुनखडीचे उंच कडे आहेत. बेटावर अनेक खोल गुहा आहेत. या मध्ययुगात समुद्री चाच्यांचे आणि लुटारूंचे नेहमीचे आसऱ्याचे ठिकाण होते. माल्टा आणि गोझो दरम्यान जाणाऱ्या होड्या आणि जहाजांवर छापे मारण्यासाठी कोमिनोच्या गुहा आणि खाड्यांचा वापर अनेकदा अड्ड्याच्या रूपात केला जात असे. [३] १२८५ पासून १२९० नंतर काही काळापर्यंत, कोमिनो हे निर्वासित यहुदी स्वयंघोषित प्रेषित आणि कबालिस्ट अब्राहम अबुलाफिया याचे घर होते. कोमिनो येथेच अबुलाफियाने त्यांचे सेफर हा-ओट (चिन्हाचे पुस्तक) आणि त्यांचे शेवटचे पुस्तक, इमरे शेफर (सौंदर्याचे शब्द) लिहिले. [२] [४]

वाहतूक
[संपादन]कोमिनोला जाण्यासाठी माल्टा किंवा गोझो येथून फेरीने जावे लागते. या फेऱ्या चिर्केव्वा किंवा म्गार धक्क्यांवरून निघतात. [५]

चित्रपट उद्योग
[संपादन]कोमिनो बेटावर अनेक चित्रपटांचे चित्रण झालेलेआहे. यांत ट्रॉय, द काउंट ऑफ मोंटे क्रिस्टो, स्वेप्ट अवे यांचा समावेश आहे.
संदर्भ
[संपादन]- ^ Ciantar, Giovannantonio (1772). Malta illustrata. 1–2. Stamperia del Palazzo di S.A.S. MDCCLXXII, by Giovanni Mallia. pp. 370–371.
- ^ a b Bartolo, Evarist (2013). "X' taf fuq Kemuna?" (PDF). imperialbandclub.com. 19 July 2016 रोजी पाहिले.
- ^ "Comino". visitmalta.com. Malta Tourism Authority. 2007-01-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ "Hidden traces of Jewish presence in mediaeval Malta". Malta Independent. 10 February 2014. October 11, 2019 रोजी पाहिले.
- ^ "Comino Ferry". cominoferryservice.com. Ebsons Comino Ferries. 14 July 2021 रोजी पाहिले.