कोची मेट्रो रेल लिमिटेड
![]() कोची मेट्रो रेल लिमिटेड चे प्रतीकचिन्ह | |
स्थानिक नाव | കൊച്ചി മെട്രോ റെയിൽ ലിമിറ്റഡ് |
---|---|
उद्योग क्षेत्र | जलद परिवहन |
स्थापना | ०२ ऑगस्ट २०११ |
मुख्यालय | कोची, केरळ, भारत |
सेवांतर्गत प्रदेश | कोची, केरळ |
सेवा |
कोची मेट्रो कोची जल मेट्रो |
मालक |
भारत सरकार (५०%) केरळ शासन (५०%) |
संकेतस्थळ |
www |
कोची मेट्रो रेल लिमिटेड, कोची, केरळ येथे भारतातील एक केंद्र-राज्य सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे, जी कोची मेट्रो आणि कोची जल मेट्रो चालवते. २ ऑगस्ट २०११ रोजी कंपनीची या स्थापना झाली
योजना आयोग आणि केंद्र सरकारच्या आदेशानुसार कोची मेट्रो रेल प्रकल्प आणि कोची वॉटर मेट्रो प्रकल्पाच्या अंमलबजावणी, संचालन आणि देखभालीसाठी कोची मेट्रो रेल लिमिटेड जबाबदार आहे. कोची मेट्रो रेल लिमिटेड ही भारत सरकार आणि केरळ सरकारच्या समान इक्विटी योगदानासह संयुक्त उद्यम कंपनी आहे.
प्रकल्प
[संपादन]कोची मेट्रो
[संपादन]सुरुवातीला हा प्रकल्प, अलुवा ते पेट्टा (पहिला टप्पा) आणि जे. एल. एन. स्टेडियम ते इन्फो पार्क (दुसरा टप्पा) असा होता. पहिल्या टप्प्यात अलुवा ते पेट्टा दरम्यानच्या २५ किमी मार्गावर २२ स्थानके ठेवण्याचा प्रस्ताव मांडला गेला. कोची मेट्रो रेल लिमिटेडने ३ अतिरिक्त स्थानकांसह पहिल्या टप्प्याचा विस्तार पूर्ण केला. कोची मेट्रो रेल लिमिटेडकडे आता अलुवा ते तृप्पुणित्तुर टर्मिनल पर्यंत २८.८ किमी लांबीचे २५ स्थानक असलेले मार्ग आहे. तिसऱ्या टप्प्यातील अलुवा ते अंगमाली मार्ग मंजुरीसाठी प्रलंबित आहे.
कोची जल मेट्रो
[संपादन]कोची जल मेट्रो हा भारतातील पहिला वॉटर मेट्रो प्रकल्प आहे. ३८ स्थानकांचा समावेश असलेल्या १६ मार्गांच्या नेटवर्कद्वारे एर्नाकुलम शहराच्या मुख्य भूभागाला १० बेटांना जोडणारी ही ७६ किमी लांबीची एकात्मिक वाहतूक व्यवस्था आहे.