कोंबडी पळाली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कोंबडी पळाली हे २००६ सालच्या जत्रा या चित्रपटातील एक सुप्रसिद्ध मराठी गीत आहे. हे गाणे आनंद शिंदेवैशाली सामंत यांच्या आवाजात आहे.

गाण्याचे बोल[संपादन]

हा भार सोसंना जड झालाय पिकावानी

अंगात ज्वार भरलं तुझ्या पिरतिचं पाज पाणी

हे, घुमुजी राव माझा, सांगा होणार का धनी

रातीला झोप नाही, दावी लावतीया पापणी

चांद तो पुनवाचा, तू गं रूपानं गोजिर वाणी

जीव माझा जळतोया, होत काळजाचं पाणी-पाणी

आ-गं, कोंबडी पळाली, तंगडी धरून, लंगडी घालाय लागली

आ-गं, कोंबडी पळाली, तंगडी धरून, लंगडी घालाय लागली

आ-गं, कोंबडी पळाली, तंगडी धरून, लंगडी घालाय लागली

आ-गं, कोंबडी पळाली, तंगडी धरून, लंगडी घालाय लागली

पोरं होते मी जवान झाले, ऐन ज्वानीत बहरून आले

ही सुगंधी, धुंद काया भेट देते तुला

मावळा मी मर्द गडी गं, ही मिठीची हीच घडी गं

दे इशारा, इश्क़ सारा येना माझ्या फुला

ए, तुरु-तुरू, तुरु-तुरू चालू नको

गुलु-गुलू, गुलु-गुलू बोलू नको

टक-मक, टक-मक पाहू नको

सोडून साथ कधी जाऊ नको

पिरमाची स्टोरी, चल शेतात जाऊ राणी

अन् वाटात सूर भिडलं, चल गाऊ या गावरान गाणी

ए, कोंबडी पळाली, इथ भर उडाली, फड-फड व्हयाला लागली

आ-गं, कोंबडी पळाली, तंगडी धरून, लंगडी घालाय लागली

आ-हा, कोंबडी पळाली, तंगडी धरून, लंगडी घालाय लागली

आ-रं, कोंबडी पळाली, तंगडी धरून, लंगडी घालाय लागली

जीव माझा तुझ्यात जडला, श्वासो श्वासात रुतून पडला

साथ देते सात जन्मी, प्रीती देईन तुला

या जीवाची झाली दैना, रातीला मला झोपच येईना

मी तुझा गं झालो मजनू, इश्क़ झाला मला

ए, दिला सबूत आता मोडू नको

मन माझं भोळ सखे तोडू नको

बोकडी मागं फिरू नको

घराची कौलं फोडू नको

तुझी-माझी जोडी जमली सुरू झालिया नवी कहाणी

तु माझा फुलराजा, मी तुझी सखी फुलराणी

आ-गं, कोंबडी, कोंबडी, कोंबडी, कोंबडी..., —लागली

आ-गं, कोंबडी, कोंबडी, कोंबडी, कोंबडी..., —लागली

आ-हा, कोंबडी पळाली, तंगडी धरून, लंगडी घालाय लागली

आ-गं, कोंबडी पळाली, तंगडी धरून, लंगडी घालाय लागली