Jump to content

कॉकरोच जनता पार्टी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कॉकरोच जनता पार्टी
online social movement, political movement, frivolous political party
स्थापनामे 2026 संपादन
लघुनामCJP संपादन
याचे नावाने नामकरणcockroach संपादन
संस्थापकअभिजीत दीपके संपादन
देशभारत संपादन
अधिकृत संकेतस्थळhttps://cockroachjantaparty.org/ संपादन

कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी), जी कॉकरोच चळवळ म्हणूनही ओळखली जाते,[][] ही एक भारतीय युवा-आधारित व्यंगात्मक राजकीय चळवळ आहे, जी १६ मे २०२६ रोजी राजकीय संवाद रणनीतिकार आणि कार्यकर्ते अभिजीत दीपके यांनी स्थापन केली.

भारताचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी १५ मे २०२६ रोजी केलेल्या वक्तव्याला प्रतिसाद म्हणून हे तयार केले गेले, ज्यामध्ये त्यांनी काही कार्यकर्त्यांना आणि बेरोजगार तरुणांना "झुरळ" (कॉकरोच) आणि "समाजाचे परजीवी" असे संबोधले होते, ज्यामुळे व्यापक जनक्षोभ उसळला होता.[] कांत यांनी नंतर स्पष्ट केले की त्यांचे वक्तव्य बनावट पदव्या मिळवणाऱ्या लोकांबद्दल होते आणि त्यांनी भारतातील विद्यापीठातील विद्यार्थ्यांना लक्ष्य केले नव्हते, ज्यांना त्यांनी "विकसित भारताचे आधारस्तंभ" म्हटले होते.[] चळवळीचे नाव हे भारतातील सत्ताधारी पक्ष, भारतीय जनता पार्टीची विडंबना करणारा एक शब्दखेळ आहे.[]

मे २०२६ मध्ये स्थापन झाल्यानंतर लगेचच पक्षाने ऑनलाइन लक्षणीय लोकप्रियता मिळवली आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगाने मोठा चाहतावर्ग निर्माण केला.[] त्यांनी संसद सदस्यांचे आणि निवडणूक आयुक्तांचे वर्तन, राजकारणात महिलांसाठी जागांचे आरक्षण आणि माध्यम परवाना यासंबंधी पाच-कलमी जाहीरनामा प्रसिद्ध केला. जून महिन्यापासून, पक्षाने पदवीपूर्व बायोमेडिकल अभ्यासाच्या त्या वर्षीच्या प्रवेश परीक्ष (नीट परीक्षा) मधील अनियमिततेच्या परिणामावरून दिल्लीत आणि देशभरात आंदोलने केली. या आंदोलनांची परिणती केंद्र सरकारसोबत झालेल्या चर्चेत आणि २५ जुलै २०२६ रोजी भारताचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यात झाली.[] शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा हा भारतीय युवा चळवळीचा एक मोठा विजय मानला गेला.[]

आपल्या ऑनलाइन उपस्थितीसोबतच, ह्या चळवळीने संपूर्ण भारतात आंदोलने आणि समाजसेवा उपक्रम आयोजित केले.[][][१०] ही चळवळ भारतीय तरुणांवर परिणाम करणाऱ्या व्यापक सामाजिक, आर्थिक आणि राजकीय मुद्द्यांवर प्रचार करत आहे. भारतीय निवडणूक आयोगाकडे राजकीय पक्ष म्हणून त्याची नोंदणी झालेली नाही.[११]

परराष्ट्र मंत्रालयाने सीजेपीशी संबंधित परदेशी निधीच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले असून ते फेटाळून लावले आहेत. २५ जुलै २०२६ रोजी, परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, भारतीय सरकार किंवा त्याच्या गुप्तचर संस्थांकडे सीजेपी आणि त्यांच्या आंदोलनांशी संबंधित परदेशी निधीबद्दल कोणतीही माहिती नाही.[१२][१३][१४]

आंदोलने

[संपादन]

ऑनलाईन चळवळीच्या उभारणीनंतर, या आंदोलनाने संघटित समाजसेवेच्या माध्यमातून प्रत्यक्ष (ऑफलाईन) मोहिमा राबवण्यास सुरुवात केली. यामध्ये स्वयंसेवकांनी झुरळांचे पोशाख परिधान करून स्वच्छता मोहीम राबवण्यासारख्या उपक्रमांचा समावेश होता, ज्याचा पुढे विस्तार होऊन विविध आंदोलनांचे आयोजन करण्यात आले.[]

२०२६ जंतर मंतर आंदोलन

[संपादन]
२०२६ दिल्ली जंतर मंतर आंदोलनादरम्यान निदर्शने करणारे विद्यार्थी.

जून २०२६ मध्ये, सीजेपीने (CJP) स्पर्धा परीक्षांच्या आयोजनातील पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि तांत्रिक त्रुटींबाबत चिंता व्यक्त करत विविध आंदोलनांची मालिका आयोजित करण्यास सुरुवात केली.[१५] राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेच्या (NEET) प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी आणि सीबीएसई ऑन-स्क्रीन मार्किंग वादाप्रकरणी या पक्षाने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली.[१६][१७] दीपके यांनी प्रश्नपत्रिका फुटी रोखण्यासाठी आणि निकालांमधील विलंब कमी करण्यासाठी सुधारणांची मागणी करणारा "शिक्षण/परीक्षा जाहीरनामा" प्रसिद्ध केला.[१८] यावर उत्तर देताना प्रधान यांनी सीजेपीवर लोकशाही प्रक्रियांना बाधा पोहोचवल्याचा आरोप केला, तसेच "पेपर माफियांवर" कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले.[१९][२०]

दिल्लीतील आंदोलनात हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते.

मागण्या मान्य न झाल्यामुळे, सीजेपीने २० जूनपासून दिल्लीतील जंतर मंतर येथे बेमुदत आंदोलन सुरू केले.[२१] दीपके यांनी परवानगी दिलेल्या वेळेपेक्षा जास्त काळ आंदोलन चालू ठेवल्याने प्रशासनाने ते बेकायदेशीर घोषित केले. दिल्ली पोलिसांनी सुरुवातीला जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला, परंतु नंतर ते मागे हटले.[२२][२३] २८ जून रोजी, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या काही विद्यार्थ्यांसह आंदोलनाला पाठिंबा दर्शवत उपोषण सुरू केले.[२४][२५] १८ जुलै रोजी दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून बळजबरीने हटवून सफदरजंग रुग्णालयात दाखल केले,[२६] आणि नंतर सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात हलवण्यात आले.[२७]

वांगचुक यांना हटवण्याच्या विरोधात दीपके आणि इतर आयोजकांनी स्वतःचे बेमुदत उपोषण सुरू केले.[२८] तथापि, एका मृत विद्यार्थ्याच्या वडिलांनी केलेल्या आवाहनानंतर दीपके यांनी २० जुलै रोजी आपले उपोषण मागे घेतले आणि 'संसद चलो' मार्चची घोषणा केली.[२९] त्या दिवशी जमावबंदीचे आदेश जारी केलेले असतानाही आंदोलकांनी संसदेच्या दिशेने मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांनी बॅरिकेड्स ओढून पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्यामुळे गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी दिल्ली पोलिसांना लाठीहल्ला आणि अश्रुधुराचा वापर करावा लागला.[३०][३१] या मार्चमध्ये १०,००० ते ५०,००० आंदोलक सहभागी झाल्याचे वृत्त आहे. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, यात किमान १७८ जण जखमी झाले, ज्यामध्ये ६० आंदोलक आणि ११८ सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश होता; तसेच ७० आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले होते.[३२][३३] पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आंदोलकांनी दगडफेक आणि मालमत्तेचे नुकसान करण्यासारख्या हिंसक मार्गांचा अवलंब केला, परंतु सीजेपीने हे आरोप फेटाळून लावत पोलिसांवरच हिंसाचार घडवून आणल्याचा आरोप केला.[३४][३२][३५][३६] पोलीस अत्याचाराच्या अहवालांवरून अनेक सार्वजनिक व्यक्ती, विरोधी पक्षांचे नेते आणि संघटनांनी या घटनेवर टीका केली.[३७][३८][३९][४०] दिल्ली पोलिसांनी केलेल्या अतिरिक्त बळाच्या वापराचा आरोप करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असून त्यावर ११ सप्टेंबर रोजी सुनावणी निश्चित करण्यात आली आहे.[४१][४२] यानंतर सीजेपीने २४ जुलै रोजी पोलीस अत्याचाराविरोधात शांततापूर्ण आंदोलनाचे आवाहन केले.[४३]

शासनासोबत झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर २४ जुलै रोजी वांगचुक यांनी आपले २६ दिवसांचे उपोषण सोडत असल्याची घोषणा केली. हिंसाचारमुक्त आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे आणि नीट प्रश्नपत्रिका फुटीनंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना भरपाई देणे यासह विविध अटींवर आणि "देशातील संभाव्य हिंसाचाराची शक्यता लक्षात घेऊन" हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.[४४][४५] त्याच दिवशी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी सीजेपीच्या प्रतिनिधींशी भेट घेऊन त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या आणि प्रधानांकडून राजीनामा घेण्याबाबत विचार करण्यासाठी वेळ मागितला.[४६]

प्रधान यांनी २५ जुलै रोजी केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिला.[][४७] अनेक आंदोलकांनी या घटनेला या चळवळीचा मोठा विजय मानला आणि पुढील आंदोलने स्थगित केली.[] २६ जुलै रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील सार्वजनिक परीक्षा प्रणालीत सुधारणा करण्यासाठी तंत्रज्ञान उद्योजक नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली एका कार्यदलाची (टास्क फोर्स) घोषणा केली.[४८] २७ जुलै रोजी, सरकारने लोकसभेत सार्वजनिक परीक्षा (अन्याय्य मार्गांना प्रतिबंध) कायदा, २०२४ सुधारणा विधेयक सादर केले.[४९] केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सादर केलेल्या या विधेयकात कायद्याच्या कलम १० अंतर्गत असणाऱ्या ५ वर्षांच्या कारावासाची व १० लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची शिक्षा वाढवून, संस्था/कंपन्यांसाठी १० वर्षांचा कारावास व १० कोटी रुपयांपर्यंतचा दंड, आणि व्यक्तींसाठी ५० लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद सुचवण्यात आली आहे.[५०]

पश्चिम बंगाल विशेष कृती दल (STF) जंतर मंतर येथील आंदोलनात अडथळा आणण्याच्या कथित पाकिस्तान-संबंधित जैश-ए-मोहम्मद कटाचा तपास करत आहे. या तपासात पोलिसांचे गणवेश मिळवणे, निदर्शनादरम्यान अशांतता भडकावणे आणि पाकिस्तानमधील हँडलर्सशी संपर्क ठेवण्याच्या योजनेच्या आरोपांचा समावेश आहे. हे आरोप अद्याप तपासाधीन असून न्यायालयात सिद्ध झालेले नाहीत.[५१][५२]

संदर्भ

[संपादन]
  1. Saaliq, Sheikh; Ganguly, Shonal (21 July 2026). "India's youth-led Cockroach movement vows to keep demanding reforms after police crackdown". Associated Press. 22 July 2026 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 23 July 2026 रोजी पाहिले.
  2. Greene, Connor (23 July 2026). "What Is the Youth-Led 'Cockroach Movement' Staging Mass Protests in India?". Time. 24 July 2026 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 23 July 2026 रोजी पाहिले.
  3. "'Cockroach Comment For Those With Fake Degrees,' Clarifies CJI Surya Kant". The Quint. 17 May 2026. 6 June 2026 रोजी पाहिले.
  4. Sharma, Yashraj. "'Cockroach Janta Party': Top Indian judge's comment sparks satire, protest". Al Jazeera (इंग्रजी भाषेत). 20 May 2026 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 July 2026 रोजी पाहिले.
  5. 1 2 3 Mateen, Zoya (21 May 2026). "Indian politics has acquired an unusual mascot: the cockroach". BBC News. 21 May 2026 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 21 May 2026 रोजी पाहिले.
  6. "'Asli kaam ka waqt aagya': Cockroach Janta Party launches new campaign after crossing BJP's Instagram follower count, hits 20 million". The Economic Times. 22 May 2026. 22 May 2026 रोजी पाहिले.
  7. 1 2 3 "India's 'Cockroach' youth call off protests after education minister quits". Al Jazeera (इंग्रजी भाषेत). 25 July 2026 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 25 July 2026 रोजी पाहिले.
  8. Nanda, Showkat; Das, Anupreeta (26 July 2026). "The Accidental Hero Who Faced Down India's Government". The New York Times. 27 July 2026 रोजी पाहिले.
  9. Sharma, Yashraj (20 May 2026). "Cockroach Janata Party: Top Indian judge's comment sparks satire, protest". Al Jazeera. 20 May 2026 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 May 2026 रोजी पाहिले.
  10. Mogul, Rhea; Mitra, Esha (22 May 2026). "India's Gen Z have flipped the lowly cockroach into a symbol of defiance". CNN. 23 May 2026 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 May 2026 रोजी पाहिले.
  11. Sharma, Saurabh; Das, Krishna N. (22 May 2026). "India's 'Cockroach' group goes viral, spotlights Gen Z worries". Reuters. 25 May 2026 रोजी पाहिले.
  12. "No information on foreign funding: MEA claims as CJP protest intensifies nationwide". The Times of India. 25 July 2026. 25 July 2026 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 25 July 2026 रोजी पाहिले.
  13. "CJP protest at Jantar Mantar: Foreign funding linked to Cockroach Janta Party protests? What Centre said". NDTV. 25 July 2026. 25 July 2026 रोजी पाहिले.
  14. "No information: MEA on claims of foreign funding behind CJP protest at Jantar Mantar". Mint. 25 July 2026. 25 July 2026 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 25 July 2026 रोजी पाहिले.
  15. "'Govt should talk about our issues, not religion': Students at Lucknow protest on exam lapses". द इंडियन एक्सप्रेस. 12 June 2026. 13 June 2026 रोजी पाहिले.
  16. "CJP Demands Education Minister's Resignation in Bengaluru Protest Over National Exam Irregularities". ईटीव्ही भारत. 15 June 2026. 15 June 2026 रोजी पाहिले.
  17. "India's viral Cockroach Party launches nationwide youth protests". एपी न्यूज. 11 June 2026. 11 June 2026 रोजी पाहिले.
  18. Mutha, Snehal (11 June 2026). "Cockroach Janta Party releases manifesto on exam reforms at Pune protest". द हिंदू. ISSN 0971-751X. 15 June 2026 रोजी पाहिले.
  19. Sharma, Akhilesh (23 June 2026). ""B Team Of Disruptive Elements": Education Minister Dharmendra Pradhan To NDTV on CJP". एनडीटीव्ही. 1 July 2026 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 23 June 2026 रोजी पाहिले.
  20. Chakrabarty, Roshni (23 June 2026). "Rahul is fear-mongering, 'tukde tukde' forces at Jantar Mantar: Pradhan on NEET". इंडिया टुडे. 24 June 2026 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 June 2026 रोजी पाहिले.
  21. "CJP Stages Second Protest At Jantar Mantar". आउटलुक. 20 June 2026. 27 June 2026 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 June 2026 रोजी पाहिले.
  22. Eshwar (21 June 2026). "A Night at Jantar Mantar: Cockroaches Refused to Leave, Govt Refused to Escalate". द क्विंट. 22 June 2026 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 June 2026 रोजी पाहिले.
  23. "CJP protest in Delhi highlights: Team Dipke says will spend night at Jantar Mantar despite no nod for protest". हिंदुस्तान टाइम्स. 20 June 2026. 20 June 2026 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 4 July 2026 रोजी पाहिले.
  24. Butani, Ashna (28 June 2026). "Sonam Wangchuk begins hunger strike at Jantar Mantar, six students join". द हिंदू. ISSN 0971-751X. 9 July 2026 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 8 July 2026 रोजी पाहिले.
  25. Sinha, Deeksha (6 June 2026). ""What Use is Education Without Justice?": Sonam Wangchuk Joins CJP Protest". द क्विंट. 7 June 2026 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 8 June 2026 रोजी पाहिले.
  26. Pandey, Geeta (18 July 2026). "Indian activist on hunger strike for 20 days forcibly taken to hospital". बीबीसी न्यूज. 18 July 2026 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 July 2026 रोजी पाहिले.
  27. "Delhi High Court orders immediate shift of Sonam Wangchuk to Medanta Hospital". द हिंदू. 21 July 2026. ISSN 0971-751X. 21 July 2026 रोजी पाहिले.
  28. "Woman hurls ink-like liquid at CJP founder Dipke as he begins indefinite hunger strike; July 20 march on". द न्यू इंडियन एक्सप्रेस. 18 July 2026. 18 July 2026 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 19 July 2026 रोजी पाहिले.
  29. "Abhijeet Dipke ends hunger strike to lead Sansad Chalo march". इंडिया टुडे. 20 July 2026. 22 July 2026 रोजी पाहिले.[permanent dead link]
  30. "Security Footage".
  31. Vijaita Singh; Ashna Butani (21 July 2026). "Pellet guns, shock batons used against protesters in Delhi; police deny". द हिंदू. ISSN 0971-751X. 22 July 2026 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 22 July 2026 रोजी पाहिले.
  32. 1 2 "Inside Delhi's day of chaos: Lathi-charge, tear gas, stone-pelting, Metro shutdowns mark CJP's Parliament march". द टाइम्स ऑफ इंडिया. 20 July 2026. ISSN 0971-8257. 20 July 2026 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 July 2026 रोजी पाहिले.
  33. "India's 'cockroach' protest movement halts marches after police violence". अल जझीरा. 23 July 2026 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 22 July 2026 रोजी पाहिले.
  34. "CJP's parliament march from Jantar Mantar: India's 'cockroach' protest continues a day after police crackdown". www.bbc.com. 21 July 2026. 21 July 2026 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 July 2026 रोजी पाहिले.
  35. "CJP protest: Over 50 security personnel injured in stone pelting by protesters". इंडिया टुडे. 20 July 2026. 20 July 2026 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 July 2026 रोजी पाहिले.
  36. "India: Excessive Force Used Against Student Protesters | Human Rights Watch". ह्युमन राईट्स वॉच. 23 July 2026. 24 July 2026 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 July 2026 रोजी पाहिले.
  37. Kaur, Sehaj (21 July 2026). "Celebrities Rally Behind Students After Police Crackdown at CJP Protest". द क्विंट. 23 July 2026 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 July 2026 रोजी पाहिले.
  38. "CJP protest: Left parties condemn police action against students, demand Pradhan's resignation". theprint.in. 24 July 2026 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 July 2026 रोजी पाहिले.
  39. "AISA and AIDSO condemn police lathi charge on students in New Delhi". द हिंदू. 20 July 2026. ISSN 0971-751X. 24 July 2026 रोजी पाहिले.
  40. "'Unacceptable in a democratic society': SC bar bodies condemn police action against protesters, lawyers during CJP march". द टाइम्स ऑफ इंडिया. 22 July 2026. ISSN 0971-8257. 23 July 2026 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 July 2026 रोजी पाहिले.
  41. Singh, Soibam Rocky (22 July 2026). "Delhi HC seeks Centre's reply to claims of police brutality, excess force during Parliament march". द हिंदू. ISSN 0971-751X. 24 July 2026 रोजी पाहिले.
  42. Thapliyal, Nupur (22 July 2026). "Delhi High Court Seeks Police Response On PILs Alleging Excessive Force On Student Protesters, Directs Preservation Of Videos". लाइव्ह लॉ. 22 July 2026 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 22 July 2026 रोजी पाहिले.
  43. Deshpande, Anagha (23 July 2026). "CJP calls nationwide protest tomorrow against 'police brutality' on students, shares guidelines". हिंदुस्तान टाइम्स. 24 July 2026 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 July 2026 रोजी पाहिले.
  44. "Sonam Wangchuk ends hunger strike; PM Modi assures more stricter actions on paper leaks- top developments". द टाइम्स ऑफ इंडिया. 24 July 2026. ISSN 0971-8257. 23 July 2026 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 July 2026 रोजी पाहिले.
  45. "Jantar Mantar protest updates: Wangchuk breaks 26-day fast; relieved, says CJP founder Dipke, but vows to continue protest till Pradhan resigns". द हिंदू. 23 July 2026. ISSN 0971-751X. 23 July 2026 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 July 2026 रोजी पाहिले.
  46. "CJP Nationwide Protest Live: Heard protesters' demands, we'll meet again tomorrow, say govt after meeting CJP". इंडिया टुडे. 24 July 2026. 24 July 2026 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 July 2026 रोजी पाहिले.
  47. Pandey, Vikas; Limaye, Yogita; Delhi, Azadeh Moshiri from Jantar Mantar in (25 July 2026). "Dharmendra Pradhan: India's 'cockroach' protesters call off strike as education minister resigns". बीबीसी न्यूज. 25 July 2026 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 25 July 2026 रोजी पाहिले.
  48. "India's youth protests force exam reforms after education minister quits". रॉयटर्स. 27 July 2026. 29 July 2026 रोजी पाहिले.
  49. "Govt introduces anti-paper leak Bill in Lok Sabha amid Opposition protests". द इकॉनॉमिक टाइम्स. 27 July 2026. ISSN 0013-0389. 27 July 2026 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 27 July 2026 रोजी पाहिले.
  50. "Public Examinations Amendment Bill 2026: What does the proposed anti-cheating law promise?". द हिंदू. 27 July 2026. ISSN 0971-751X. 27 July 2026 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 27 July 2026 रोजी पाहिले.
  51. Nag, Jayatri (1 August 2026). "JeM operative arrested in West Bengal, planned to target CM Suvendu Adhikari and minister". द इकॉनॉमिक टाइम्स. ISSN 0013-0389. 2 August 2026 रोजी पाहिले.
  52. "Just a moment…". theprint.in. 2 August 2026 रोजी पाहिले.