कैलास झवेरी
कैलास झवेरी (जन्म: ११ जून १९२६, सुरत, गुजराथ - मृत्यु: १० मे २०२१) [१][२] ऑरोविलच्या युनेस्को विभागाच्या सेक्रेटरी-इन-चार्ज म्हणून श्रीमाताजींनी कैलास यांची १९६६ साली नेमणूक केली.[३] ऑरोविल या वैश्विक नगरीस जगन्मान्यता मिळवून देण्यात श्रीमती कैलास झवेरी यांचा सहभाग होता. श्रीमाताजींच्या मार्गदर्शनाखाली १९६५ ते १९७२ या कालावधीत त्यांनी हे कार्य पार पाडले. [४]
जीवन व शिक्षण
[संपादन]छोटालाल आणि मणीबेन यांची धाकटी मुलगी म्हणजे कैलास. जैन धर्माचे, तीर्थांकरांचे संस्कार तिच्यावर व्हावेत असा वडिलांचा प्रयत्न असे. कैलासला ज्ञानाची ओढ होती. त्यांनी तत्त्वज्ञान विषय घेऊन मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून बी.ए ही पदवी संपादन केली. तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाच्या निमित्ताने त्यांचा श्रीअरविंद यांच्याशी परिचय झाला. ज्या आध्यात्मिक गुरूंच्या शोधात आपण आहोत ते गुरू म्हणजे श्रीअरविंद आहेत याची त्यांना जाणीव श्रीअरविंद लिखित 'लाईफ डिव्हाईन' हा ग्रंथ वाचताना झाली. एम.ए करत असताना, त्या पुडुचेरीला गेल्या आणि १२ डिसेंबर १९५० साली त्यांना माताजींचे दर्शन झाले. [१]
करिअर करण्यासाठी म्हणून कैलास त्यांच्या पतीसमवेत १८ फेब्रुवारी १९५४ रोजी अमेरिकेस गेल्या. त्यांना युनायटेड नेशन्समध्ये सेवेची संधी मिळाली. पीएच.डी साठी त्यांनी आंतरराष्ट्रीय संबंध व आंतरराष्ट्रीय संघटना असा विषय निवडला.[१]
कार्य
[संपादन]- १९६४ साली त्या श्रीअरविंद आश्रमाच्या सदस्य झाल्या.[५] आणि ऑरोविलच्या प्रकल्पात त्या सहभागी झाल्या.
- ऑरोविलच्या युनेस्को विभागाच्या सेक्रेटरी-इन-चार्ज म्हणून श्रीमाताजींनी कैलास यांची १९६६ साली नेमणूक केली. ऑरोविलला युनेस्कोचे प्रायोजकत्व मिळण्यामध्ये त्यांचा सहभाग होता.[६]
- १९७४ पर्यंत त्या ऑरोविलच्या कार्यात सहभागी होत्या.
- त्या 'फ्लॉवर्स अँड देअर मेसेजेस' या पुस्तकासाठी त्या रिचर्ड पिअरसन यांच्यासोबत काम करत होत्या.
- १९८३ ते १९९५ या कालावधीत या कालावधीत कैलास व रिचर्ड पिअरसन दोघांनी मिळून युरोप व अमेरिकेत श्रीअरविंद व श्रीमाताजी यांचे विचार पोहोचविण्याचे कार्य केले.[७]
प्रकाशित लेखन
[संपादन]'आय एम विथ यू' हे श्रीमती कैलास झवेरी लिखित आत्मचरित्र आहे. [२]
संकलित लिखाण
[संपादन]- द रिशेपिंग ऑफ ह्युमॅनिटी
- द एम अँड ऍक्शन ऑफ अ ट्रु स्पिरीटयुअल कल्चर
- रिलीजन अँड स्पिरीटयुअलिटी
- ऑरोविल अँड द आयडियल ऑफ ह्युमन युनिटी
- श्रीअरबिंदो अँड द फ्युचर
- ऑरोविल अँड एज्युकेशन [१]
पुस्तक वाचनासाठी उपलब्ध
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ a b c d "Kailas Jhaveri: The Mother's dear child who knew "how to be generous" by Anurag Banerjee – Overman Foundation" (इंग्रजी भाषेत). 2021-06-11. 2025-02-11 रोजी पाहिले.
- ^ a b Kailas Jhaveri (2004). I am with you. KOLKATA: OVERMAN FOUNDATION. ISBN 978-81-967004-0-9.
- ^ "Interacting with UNESCO during the Mother's Years | Auroville". auroville.org. 2025-02-11 रोजी पाहिले.
- ^ Interacting with UNESCO during the Mother's Years Compiled by Paulette Hadnagy
- ^ "About authors". Collaboration. vol. 33, no. 2. Fall 2008.
- ^ Larry Seidlitz (Fall 2008). "I am with you, Parts II and III, by Kailas Jhaveri". Collaboration. vol. 33, no. 2.
- ^ e-Books, Auro (2024-10-17). "I am with you by Kailas Jhaveri". Auro e-Books (इंग्रजी भाषेत). 2025-02-12 रोजी पाहिले.