कैलाश चंद्र जोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कैलाश जोशी या पानावरून पुनर्निर्देशित)

कैलाश जोशी (जन्म: जुलै १४, इ.स. १९२९, देवास) हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत.ते जून इ.स. १९७७ ते जानेवारी इ.स. १९७८ या काळात मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री होते. ते इ.स. २००४ आणि इ.स. २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील भोपाळ लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.