के. करुणाकरन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

के.करुणाकरन (मल्याळम: കെ. കരൂണാകരന ; रोमन लिपी: Kannoth Karunakaran ;) (जुलै ५, इ.स. १९१८ - डिसेंबर २३, इ.स. २०१०) हे भारतातील केरळ राज्यातील राजकारणी होते. त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील बहुतांश काळ ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात होते आणि सध्याही ते काँग्रेस पक्षातच आहेत. काही काळ ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते.

ते इ.स. १९७१ ते इ.स. १९७७ या काळात सी.अच्युतानंदन यांच्या मंत्रिमंडळात केरळाचे गृहमंत्री होते. त्यानंतर ते इ.स. १९७७, इ.स. १९८२ ते इ.स. १९८७ आणि इ.स. १९९१ ते इ.स. १९९५ या काळात केरळाचे मुख्यमंत्री होते. ते इ.स. १९९५ ते इ.स. १९९८ आणि इ.स. २००४ ते इ.स. २००५ या काळात राज्यसभेचे सदस्य होते. तसेच ते इ.स. १९९८ सालातील लोकसभा निवडणुकीत केरळातील तिरूवनंतपुरम मतदारसंघातून तर इ.स. १९९९ सालातील लोकसभा निवडणुकीत ते राज्यातील मुकुंदपुरम मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

बाह्य दुवे[संपादन]