केवलराम तुळशीराम काळे
केवलराम काळे हे एक पारंपारिक राजकारणी आहेत. हे महाराष्ट्राच्या १५व्या विधानसभेवर भाजपतर्फे मेळघाटमधून निवडून गेले होते.[१][२][३][४][५][६] तत्पूर्वी, २००९मध्ये ते विधानसभेत मेळघाटचे भाजपतर्फेच प्रतिनिधित्व केले होते.
- त्यांचे वडील श्री. तुळशीराम रुपन काळे हे सुद्धा मेळघाटचे प्रतिनिधित्व केलेले आहे.
राजकीय कारकीर्द
[संपादन]- २००९: आमदार
काळे यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात स्थानिक पातळीवरून केली. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट या दुर्गम आणि आदिवासी बहुल भागाच्या विकासासाठी त्यांनी कार्य केले.
त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मेळघाटातील कुपोषण, आरोग्य सुविधा आणि रस्ते विकासाचे प्रश्न विधिमंडळात मांडले. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीतही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील विस्थापित गावांचे पुनर्वसन आणि स्थानिकांचे हक्क या विषयांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे [७]
सामाजिक कार्य
[संपादन]राजकारणाव्यतिरिक्त काळे यांनी आदिवासी समाजातील शिक्षण आणि रोजगारासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. मेळघाटातील आदिवासी संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी त्यांनी सामाजिक स्तरावर मोठे योगदान दिले आहे.
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ↑ "Melghat, Maharashtra Assembly Election Results 2024 Highlights: BJP's Kewalram Tulsiram Kale with 75114 defeats INC's Dr. Hemant Nanda Chimote". India Today (इंग्रजी भाषेत). 2024-11-23. 2024-11-23 रोजी पाहिले.
- ↑ "Melghat (Maharashtra) Assembly Election Results 2024 Live: Winner, Runner-up, Candidates List". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2024-11-23. 2024-11-23 रोजी पाहिले.
- ↑ "Melghat Election Result 2024 LIVE: Kewalram Tulsiram Kale of BJP Wins". News18 (इंग्रजी भाषेत). 2024-11-23 रोजी पाहिले.
- ↑ Hindustantimes (23 November 2024). "Maharashtra election results: These candidates have won by biggest margins so far". 24 November 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 24 November 2024 रोजी पाहिले.
- ↑ CNBCTV18 (23 November 2024). "Maharashtra Elections 2024: 14 candidates win by over 1 lakh votes, all from Mahayuti" (इंग्रजी भाषेत). 4 December 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 4 December 2024 रोजी पाहिले.
- ↑ Election Commission of India (23 November 2024). "Maharastra Assembly Election Results 2024 - Melghat". 4 December 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 4 December 2024 रोजी पाहिले.
- ↑ "मेळघाट विधानसभेसाठी केवलराम काळे सज्ज". लोकमत. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.