Jump to content

केयी पान्योर जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
केयी पान्योर जिल्हा
भारतीय जिल्हे
स्थापना१ मार्च 2024 संपादन
देशभारत संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानअरुणाचल प्रदेश संपादन

केयी पान्योर जिल्हा हा ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश राज्यातील २८ जिल्ह्यांपैकी एक आहे. याचुली हे त्याचे मुख्यालय आहे.[]

इतिहास

[संपादन]

डिसेंबर २०२२ मध्ये, ऑल याचुली स्टुडंट युनियन (AYSU) ने तत्कालीन लोअर सुबांसिरी जिल्ह्याचे विभाजन करून केयी पान्योर जिल्हा तयार करण्याची मागणी केली.[] सप्टेंबर २०२३ मध्ये, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी जिल्हा निर्मितीची घोषणा केली.[] फेब्रुवारी २०२४ मध्ये, मंत्रिमंडळाने जिल्हा निर्मितीच्या विधेयकाला मंजुरी दिली. लोअर सुबांसिरी जिल्ह्यातून १९५ गावे वेगळी करून हा जिल्हा तयार करण्यात आला आहे.[] १ मार्च २०२४ रोजी जिल्ह्याचे अधिकृत उद्घाटन झाले.[]

लोकसंख्य

[संपादन]

या जिल्ह्यात प्रामुख्याने न्यिशी लोक राहतात. येथील लोकसंख्या ३०,००० पेक्षा जास्त असून त्यात १९५ गावांचा समावेश आहे.[]

विभाग

[संपादन]

या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व अरुणाचल प्रदेश विधानसभेत याचुली विधानसभा मतदारसंघाद्वारे केले जाते.[] हा जिल्हा अरुणाचल पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.[]

संदर्भ

[संपादन]
  1. "Arunachal Assembly passes bill for two new districts". India Today NE (हिंदी भाषेत). 2024-02-08. 2024-02-25 रोजी पाहिले.
  2. "Create Keyi Panyor district by bifurcating Lower Subansiri: AYSU". Arunachal Observer (इंग्रजी भाषेत). 2022-12-05. 2024-02-25 रोजी पाहिले.[permanent dead link]
  3. PTI. "Arunachal CM announces creation of 'Keyi Panyor' district". Deccan Herald (इंग्रजी भाषेत). 2024-02-25 रोजी पाहिले.
  4. "Arunachal assembly passes bill to create two new districts". The Week (इंग्रजी भाषेत). 2024-02-25 रोजी पाहिले.
  5. Today, North East (2024-03-01). "Arunachal: New District Keyi Panyor Officially Inaugurated Today". Northeast Today (इंग्रजी भाषेत). 2024-03-03 रोजी पाहिले.
  6. "Arunachal government inaugurates 27th district, Keyi Panyor, amid grand celebrations". India Today NE (हिंदी भाषेत). 2024-03-01. 2024-03-03 रोजी पाहिले.
  7. "Arunachal: Pema Khandu inaugurates new district 'Keyi Panyor'" (इंग्रजी भाषेत). 2024-03-01. 2024-03-03 रोजी पाहिले.
  8. "Assembly Constituencies allocation w.r.t District and Parliamentary Constituencies". Chief Electoral Officer, Arunachal Pradesh website. 13 August 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 21 March 2011 रोजी पाहिले.