Jump to content

उंचाल्ली धबधबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(केप्पा धबधबा या पानावरून पुनर्निर्देशित)

उंचाल्ली धबधबा हा सुमारे ११६ मीटर (३८१ फूट) उंचीवरून कोसळणारा धबधबा आहे. हा अघनाशिनी नदीवर असून, कर्नाटकच्या उत्तर कन्नडा जिल्ह्याच्या सिद्दपूर तालुक्यात आहे. याला लशिंग्टन धबधबा असेही म्हणतात. सन १८४५ मध्ये जे.डी. लशिंग्टन नावाच्या जिल्हाधिकाऱ्याचे नाव या धबधब्यास देण्यात आले होते.

हेग्गर्णे हे तेथील एक गाव आहे. ते सिद्दपूरपासून सुमारे ३५ कि.मी. अंतरावर आहे. या धबधब्यापर्यंत पोहोचण्यास हेग्गर्णे गावापासून ५ कि.मी. पायी जावे लागते. यास 'केप्पा जोगा' असेही नाव आहे.[ चित्र हवे ]