केन-उपनिषद (श्रीअरविंद भाष्य)
केन उपनिषद | |
लेखक | श्रीअरविंद |
मूळ शीर्षक (अन्य भाषेतील असल्यास) | Kena Upshinad |
अनुवादक | सेनापती पां.म.बापट |
भाषा | मराठी |
देश | भारत |
साहित्य प्रकार | वैचारिक ग्रंथ |
प्रकाशन संस्था | श्रीअरविंद आश्रम, प्रकाशन विभाग |
प्रथमावृत्ती | १९६६ |
चालू आवृत्ती | २०२० |
विषय | श्रीअरविंद आणि त्यांचे तत्त्वज्ञान |
पृष्ठसंख्या | १३३ |
आय.एस.बी.एन. | 978-81-7058-417-9 |
केन उपनिषद् हा श्रीअरविंदकृत भाष्य-ग्रंथ आहे. यामध्ये केवळ केनोपनिषदाचा अनुवाद (संस्कृतमधून इंग्रजीमध्ये केलेला) नाही. तर त्यामध्ये अनुवादाबरोबरच श्रीअरविंद यांनी त्यावर केलेले भाष्य समाविष्ट करण्यात आलेले आहे. त्याचे मराठी भाषांतर सेनापती बापट यांनी केले आहे. [१]
प्रकाशनाचा इतिहास
[संपादन]केन उपनिषदाचा अनुवाद प्रथम कर्मयोगिनमध्ये १९०९ साली प्रकाशित झाला. नंतर त्यावरील भाष्य आर्य या नियतकालिकात १९१५-१६मध्ये प्रकाशित झाले. १९५२ मध्ये प्रथम ते पुस्तकरूपात प्रकाशित झाले. [२]
ग्रंथाची मांडणी
[संपादन]क्र. | प्रकरणे | आशय |
---|---|---|
०१ | विभाग: मूळ मंत्र व अनुवाद | |
०१.०१ | भाग पहिला | ब्रह्म म्हणजे जिच्यापर्यंत मन,वाचा,चक्षू पोहोचू शकत नाही अशी शक्ती होय. ज्या शक्तीची उपासना सगुण रूपात केली जात नाही अशी शक्ती म्हणजे ब्रह्म होय असे विवेचन या भागात केले आहे. |
०१.०२ | भाग दुसरा | व्यक्तीला ब्रह्मज्ञान झाले की नाही हे ओळखण्याचे निकष सांगितले आहेत. |
०१.०३ | भाग तिसरा | ब्रह्माचे सामर्थ्य विशद करण्यासाठी उमा हैमवतीची आख्यायिका सांगितलेली आहे. देवांचे गर्वहरण करण्यासाठी ब्रह्मशक्ती उमाहैमवतीचे रूप घेऊन अवतरते व देवांना ब्रह्मतत्त्व सर्वश्रेष्ठ आहे याची जाणीव करून देते, असे या भागात सांगितले आहे. |
०१.०४ | भाग चौथा | या भागामध्ये, उमाहैमवती देवांना ब्रह्मतत्त्वाचे श्रेष्ठत्व विशद करून सांगते. [३] |
०२ | विभाग: उपनिषद्-वृत्ति (भाष्य) | |
०२.०१ | प्रकरण पहिले | उपनिषदाचा विषय |
०२.०२ | प्रकरण दुसरे | प्रश्न - को देव:? असा प्रश्न येथे उपस्थित करण्यात आला आहे.
या प्रकरणात अधिभूत, अधिदैव आणि अध्यात्म म्हणजे काय हे स्पष्ट करण्यात आले आहे. |
०२.०३ | प्रकरण तिसरे | अतिमानसिक देवता - आपले विभक्त अस्तित्त्व, विभक्त सुख सोडून दिल्याने ज्याची प्राप्ती होते तो सर्वस्वामी, सर्वभोक्ता ईश्वरच आहे, असा या उपनिषदाचा सिद्धांत आहे. |
०२.०४ | प्रकरण चौथे | मनाच्या अतीत असणारे शाश्वत तत्त्व - मन, प्राण, शरीर, अहंकार, स्मृती, नैतिक व्यक्तित्व म्हणजे खरा आत्मा नव्हे, असे प्रतिपादन येथे केले आहे. ब्रह्म म्हणजे काय याचा तपशिलात विचार येथे केला आहे. |
०२.०५ | प्रकरण पाचवे | दिव्य शब्द - ब्रह्माचे वर्णन येथे 'वाचेची वाचा' असे येते. मानवी भाषेचा विचार येथे करण्यात आला आहे. मंत्र म्हणजे काय आणि मंत्रसामर्थ्य म्हणजे काय हा विचार या प्रकरणात आला आहे. |
०२.०६ | प्रकरण सहावे | अतिमानसाची आवश्यकता - मन हे जाणिवेचे अंतिम तत्त्व नाही, मनामध्ये अतिमानसाचे बीज आहे, हा विचार येथे आला आहे. अतिमानस या संकल्पनेचे सुतोवाच येथे श्रीअरविंद यांनी केले आहे. |
०२.०७ | प्रकरण सातवे | मन आणि अतिमानस - मनाच्या पलीकडे असणाऱ्या मनाचा विचार येथे केला आहे. मन आणि अतिमानस यांच्या स्वरूपातील, त्यांच्या ज्ञानामधील भेद येथे स्पष्ट केला आहे. मन अस्तित्त्वात येण्याचे कारण व त्याची पद्धत येथे सांगितली आहे. |
०२.०८ | प्रकरण आठवे | परम जाणीव (ब्रह्म जाणीव) - इंद्रियसंवेदना म्हणजे काय, इंद्रियजन्य ज्ञान कोणत्या तीन टप्प्यांतून (अन्नमय, प्राणमय व मनोमय कोश) होते हे येथे आधी सांगितले आहे. विज्ञान, प्रज्ञान, संज्ञान, आज्ञान या मनाच्या चार कार्याचे स्पष्टीकरण येथे येते. |
०२.०९ | प्रकरण नववे | आपल्या इंद्रिय-जाणिवा - या प्रकरणामध्ये श्रीअरविंद इंद्रिय, पृष्ठवर्ती मन व अवचेतन मन, अंतर्वर्ती जाणीव, संज्ञान यांचा तपशीलवार विचार करण्यात आला आहे. |
०२.१० | प्रकरण दहावे | परमजीवन - प्राणाचा प्राण या प्रकरणात प्राण, पंचप्राण, प्राणशक्ती, तिचे कार्य येथे स्पष्ट करण्यात आले आहे. |
०२.११ | प्रकरण अकरावे | एक महान संक्रमण - आपले प्रस्तुतचे अस्तित्त्व अपूर्ण आहे आणि आपण अतिचेतन अस्तित्त्वात (ईशोपानिषदात वर्णिलेला ईश) चढून जावे व तिथे वस्ती करावी असे या उपनिषदाचे सांगणे असल्याचे श्रीअरविंद नमूद करतात. मन व इंद्रिय यांच्या प्रांतापलीकडे अमृतत्व आहे, पण ते इथेच, मर्त्य जीवनात राहून प्राप्त करून घ्यायचे आहे. उपनिषदातील लोक (इहलोक व परलोक इ.) ही संकल्पना येथे स्पष्ट केली आहे. मुक्ताम्यांचे कार्यही येथे स्पष्ट होते. |
०२.१२ | प्रकरण बारावे | मन आणि ब्रह्म - आपल्या सामान्य जाणिवेतून ब्रह्मापर्यंत पोहोचायचे कसे? हा प्रश्न येथे विचारात घेतला आहे. उपनिषदातील 'मानवाचा आत्मा'आणि 'देव' या संकल्पना येथे स्पष्ट होतात. |
०२.१३ | प्रकरण तेरावे | देवांची आख्यायिका - ब्रह्मप्राप्तीची जी आकांक्षा आत्मा बाळगतो ती समर्थनीय आहे, हे सांगून झाल्यावर त्या प्राप्तीसाठी त्याला उपलब्ध असणारी साधने कोणती याचा विचार येथे केला गेला आहे. येथे देव-दानव संघर्ष, त्यात झालेला देवांचा विजय, त्यातून आलेला अभिमान, ब्रह्माचे त्यांना झालेले विस्मरण या सर्व गोष्टी येथे कथारूपाने येतात. (येथे श्रीअरविंद वेदांमधील देव संकल्पना व उपनिषदांतील देव संकल्पना यातील फरक स्पष्ट करतात.) येथे उमा-हेमवती ऊर्फ पराशक्ती इंद्राला ज्ञान देते. |
०२.१४ | प्रकरण चौदावे | आत्म्याचे आणि देवांचे रूपांतरण - आत्म्याला साक्षात्कार झाला तर जीवन कसे पालटून जाईल याचे वर्णन येथे येते. ज्याला ईश्वरप्राप्ती झाली आहे तो आनंदनिधान बनतो असे यामध्ये नमूद करण्यात आले आहे. उपनिषदांची स्वर्गलोकाची संकल्पना येथे स्पष्ट होते. |
०२.१५ | प्रकरण पंधरावे | अखेरचा शब्द[४].[५] - आपली जीव म्हणून अवस्था, ईश्वराची अवस्था, या अवस्थांचा विचार येथे येतो. चराचरात भरून असणाऱ्या ब्र्हमाचा शोध यासंबंधी येथे निर्देश केला आहे. तसेच अमृतत्व या संकल्पनेचा अर्थ येथे श्रीअरविंद उलगडवून दाखवितात. व्यक्तिगत मुक्ती हे विश्वनिर्मितीचे प्रयोजन नसणार असा विचार श्रीअरविंद येथे मांडतात. 'विश्वकल्याणाचे कार्य करणारा मुक्तात्मा' यामध्ये श्रीअरविंद यांना त्याच्या तत्त्वज्ञानाचा आधार सापडतो.[१] |
ग्रंथाचा आशय
[संपादन]अमृतत्व कसें मिळवावयाचें, दिव्य ब्रह्माचे जगाशीं आणि मानवी जाणिवेशी असलेले संबंध कोणते, अज्ञान, दुःख ही जी आमची आज स्थिती आहे त्यातून बाहेर पडून एकता, सत्य आणि दिव्य सुख या स्थितींत आपण कोणत्या मार्गाने जाऊ शकतो हा प्रश्न या उपनिषदाने हाताळला आहे.
'ब्रह्म म्हणजे परम सुख' अशी व्याख्या हे उपनिषद करते. ब्रह्माची परम सुख म्हणून उपासना करावी व परम सुख म्हणून प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करावा असा आदेश देऊन, केन उपनिषद् समाप्त होते, असे श्रीअरविंद म्हणतात.[१]
केन उपनिषद बाह्य जीवनाची ओढ असलेल्या जीवासाठी लिहिले आहे, ते पूर्ण जागृत साधकासाठी लिहिलेले नाही असे श्रीअरविंद म्हणतात. [१]
मूळ इंग्रजी ग्रंथ
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ a b c d केन-उपनिषद, अनुवाद सेनापती बापट, प्रथम आवृत्ती १९६६
- ^ Sri Aurobindo (1972). The Upanishads. 12 (Sri Aurobindo Birth Centenary Library ed.). Pondicherry: Sri Aurobindo Ashram.
- ^ "केनोपनिषद". विकिपीडिया. 2024-09-10.
- ^ "Kena and Other Upanishads (CWSA) - Read Book by Sri Aurobindo". The Mother & Sri Aurobindo : e-library (इंग्रजी भाषेत). 2025-01-09 रोजी पाहिले.
- ^ Sri Aurobindo (2001). THE COMPLETE WORKS OF SRI AUROBINDO - Kena and other Upnishads. 18. Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication Department.