Jump to content

महमूद गझन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कॅसानस या पानावरून पुनर्निर्देशित)
महमूदच्या कारकीर्दीतील शिराझ, इराण येथे सापडलेले हिजरी ७००, इ.स. १३०१ च्या सुमारासचे सोन्याचे नाणे.

महमूद गझन [a], गझन खान तथा कॅसानस (५ नोव्हेंबर, १२७१ - ११ मे, १३०४) हा १२९५ ते १३०४ या काळात सध्याच्या इराणमधील मंगोल साम्राज्याच्या इल्खानेत प्रदेशाचा सातवा शासक होता. हा आर्घुनचा मुलगा, अबका खानाचा नातू आणि हुलागु खानाचा पणतू होता. महमूद चंगीझ खानच्या थेट वंशावळीतील एक होता. हा ख्रिश्चन होता परंतु नंतर त्याने इस्लाम स्वीकारला.

महमूदचा जन्म ५ नोव्हेंबर १२७१ रोजी अबासकुन (आताचे बंदर तोरकमान जवळ) येथे झाला. [] [] त्याला बुलुखान खातून या त्याच्या आजोबा अबका खानच्या आवडत्या पत्नीने वाढविले महमूद आणि त्याचा भाऊ ओल्जैतु हे पौर्वात्य ख्रिश्चन धर्मात वाढले होते महमूदच्या तरुणपणी, त्याला एका चिनी बौद्ध भिक्षूने शिक्षण दिले आणि त्याला जुनी मँडेरिन भाषा आणि बौद्ध धर्माची ओळख करुन दिल तसेच मंगोली आणि उइघुर लिप्या शिकवल्या.

महमूदने सीरियाच्या नियंत्रणासाठी मामलुक सल्तनतीशी युद्ध केले तसेच तुर्क-मंगोल वंशीय चुगताई खानेतशी लढाई केली. गझानने युरोपशी राजनैतिक संपर्क साधून त्याच्या आधीच्या मोंगोल शासकांनी करू पाहिलेली फ्रँको-मंगोल युती प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न केले. महमूद उच्चशिक्षित होता आणी अनेक भाषा बोलू शकत होता. त्याला अनेक छंद होते. त्याने इल्खानेत शासनाच्या अनेक भागांमध्ये सुधारणा केल्या. यांत चलन आणि स्थिर आर्थिक धोरण अवलंबिणे हे महत्चेवाचे होते.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Magill, Frank Northen; Aves, Alison (1998). "Mahmud Ghazan". Dictionary of World Biography: The Middle Ages (इंग्रजी भाषेत). Routledge. p. 381. ISBN 978-1-57958-041-4.
  2. ^ Aigle, Denise (2024). Iran under the Mongols: Ilkhanid Administrators and Persian Notables in Fars (इंग्रजी भाषेत). Bloomsbury Publishing. ISBN 978-0-7556-4575-6.


चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/> खूण मिळाली नाही.