Jump to content

कॅपिटल वन अरीना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कॅपिटल वन अरीना
arena, ice hockey rink
स्थापना२ डिसेंबर 1997 संपादन
खेळबास्केटबॉल, आइस हॉकी संपादन
याचे नावाने नामकरणकॅपिटल वन संपादन
देशअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानवॉशिंग्टन संपादन
भौगोलिक गुणक३८°५३′५३″N ७७°१′१५″W संपादन
मालक संस्थाTed Leonsis, वॉशिंग्टन संपादन
वास्तुविशारदEllerbe Becket संपादन
अधिकृत उद्घाटनाचा दिनांक२ डिसेंबर 1997 संपादन
मुख्य इमारत ठेकेदारA. James Clark संपादन
वास्तव्य करणारावॉशिंग्टन विझार्ड्स, Washington Capitals, Washington Mystics, Georgetown Hoyas men's basketball संपादन
अधिकृत संकेतस्थळhttp://CapitalOneArena.com संपादन
Category for the interior of the itemCategory:Interior of Capital One Arena संपादन
Map

कॅपिटल वन अरीना हे अमेरिकेच्या वॉशिंग्टन, डीसी मधील एक बंदिस्त रिंगण (इनडोर अरीना) आहे. पेन क्वार्टर परिसरातील चायनाटाउन विभागात असलेले हे रिंगण वॉशिंग्टन मेट्रोच्या गॅलरी प्लेस स्थानकावर आहे. याचे उद्घाटन २ डिसेंबर १९९७ रोजी एमसीआय सेंटर म्हणून झाले. २००६ मध्ये व्हेरायझन कम्युनिकेशन्सने एमसीआय विकत घेतल्यावर त्याचे नाव व्हेरायझन सेंटर असे ठेवण्यात आले. २०१७ मध्ये कॅपिटल वन बँकेने नामकरण अधिकार खरेदी करून याचे कॅपिटल वन अरीना असे पुनर्नामकरण केले.

या रिंगणाची मालकी मोन्युमेंटल स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंटकडे असून हे नॅशनल हॉकी लीगच्या वॉशिंग्टन कॅपिटल्स, नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या वॉशिंग्टन विझार्ड्स आणि जॉर्जटाउन युनिव्हर्सिटी पुरुष बास्केटबॉल संघाचे घरचे मैदान आहे. १९९८ ते २०१८ पर्यंत ते विमेन्स नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या वॉशिंग्टन मिस्टिक्सचेही घरचे मैदान होते होते.

या रिंगणाच्या विकासामुळे आजूबाजूच्या परिसराचे रूप बदलले आहे. हे रिंगण बांधल्यानंतर पूर्वी येथे असलेली चिनी-अमेरिकन लोकांची वस्ती ३,०००ची ३०० झाली आहे. या परिसराचे सौम्यीकरण किंवा प्रमाणीकरण झाल्याने आशियाई-अमेरिकन समुदायाला सेवा देणाऱ्या बहुतेक लहान व्यवसाय आणि रेस्टॉरंट्सची जागा राष्ट्रीय साखळ्यांनी घेतली आहे. [] [] [] []

जानेवारी २००६ मध्ये, त्यावेळी एमसीआय सेंटर म्हणून ओळखले जाणारे रिंगण
ऑगस्ट २००८ मध्ये तेव्हा व्हेरायझन सेंटर
ब्लॅक फ्रायडे २०२५ रोजी वॉशिंग्टन कॅपिटल्स आणि टोराँटो मेपल लीफ्स यांच्यातील सामन्यापूर्वी रिंगणाचे दृष्य.
२००६ मध्ये विझार्ड्स आणि डेट्रॉईट पिस्टन्स यांच्यातील तेव्हाच्या एमसीआय सेंटरमधील सामन्याचे तिकीट.

चित्रदालन

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. "Name Change: MCI Center to be Verizon Center". ईएसपीएन. Associated Press. January 7, 2006. September 5, 2023 रोजी पाहिले.
  2. Kaplan, Seth (March 23, 2023). "After the arena came, the Asian population of Washington's Chinatown shrank". cbsnews.com (इंग्रजी भाषेत). September 5, 2023 रोजी पाहिले.
  3. Xiao, Jessica (February 1, 2023). "Incredibly shrinking DC Chinatown struggles to survive". AsAmNews (इंग्रजी भाषेत). April 13, 2023 रोजी पाहिले.
  4. Hunt, Kristin (January 12, 2023). "With 76ers new stadium, is Philly's Chinatown destined for same fate as Washington, D.C. neighborhood?". PhillyVoice (इंग्रजी भाषेत). April 13, 2023 रोजी पाहिले.