Jump to content

कॅपिटल वन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कॅपिटल वन
व्यवसाय, उद्यम, पत संस्था, सार्वजनिक कंपनी
ह्याचा भागS&P 500, S&P 100 संपादन
उद्योगआर्थिक सेवा संपादन
स्थापना२१ जुलै 1994, 1994 संपादन
संस्थापकRichard Fairbank संपादन
मुख्य कार्यकारी अधिकारीRichard Fairbank संपादन
देशअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
सदस्यताLinux Foundation, World Wide Web Consortium संपादन
Legal formCommercial Bank, private limited company, Delaware corporation संपादन
मुख्यालयाचे स्थानMcLean संपादन
स्टॉक एक्स्चेंजन्यू यॉर्क रोखे बाजार संपादन
मागील.Chevy Chase Bank, North Fork Bank संपादन
महत्वाची घटनाCapital One 2019 data breach संपादन
पुरस्कारSilver Anvil Award, Silver Anvil Award संपादन
उत्पादनेretail banking संपादन
Reward programCapital One Rewards संपादन
अधिकृत संकेतस्थळhttps://www.capitalone.com/ संपादन
Location information URLhttps://locations.capitalone.com/ संपादन
Contact page URLhttps://www.capitalone.com/help-center/contact-us/ संपादन

कॅपिटल वन फायनान्शियल कॉर्पोरेशन ही एक अमेरिकन बँकमालक कंपनी आहे. याची २१ जुलै १९९४ रोजी स्थापना झालेली ही कंपनी मुख्यत्वे क्रेडिट कार्ड, वाहन कर्ज, बँकसेवा आणि बचत खात्यांच्या व्यवसाय करते. या कंपनीचे मुख्यालय व्हर्जिनिया राज्यातील टायसन्स येथे आहे व अनेक शहरांतून कार्यालये आहेत. कॅपिटल वनचा बहुतांश धंदा अमेरिकेत आहे.[] आणि कॅनडा आणि युनायटेड किंग्डममध्ये ही कंपनी आपला व्यवसाय करते. १९९० च्या दशकात अमेरिकेत क्रेडिट कार्डच्या व्यापक विपणनामध्ये या कंपनीने मोलाची भूमिका बजावली होती.[] ३० जून २०२५ पर्यंतच्या आकडेवारीप्रमाणे एकूण मालमत्तेनुसार ही अमेरिकेतील सहाव्या क्रमांकाची मोठी बँक आहे.[] कॅपिटल वन व्हिसा आणि मास्टरकार्ड यांच्या जालावर चालणारी क्रेडिट कार्ड देणारी तिसरी सर्वात मोठी संस्था आणि अमेरिकेतील सर्वात मोठ्या वाहन वित्तपुरवठा करणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे.[]

या बँकेच्या अमेरिकेत अंदाजे ७५० शाखा आहेत. यांपैकी ३० कॅफे आहेत, जेथे गिऱ्हाइक किंवा इतरही लोक चहा-कॉफी किंवा नाश्ता करू शकतात आणि त्याचबरोबर बँक आणि इतर व्यवहार सुद्धा करू शकतात.[] अमेरिकेत कॅपिटल वनची ७,००० हून अधिक एटीएम आहेत. फॉर्च्युन ५००च्या यादीत ही कंपनी ८२ व्या क्रमांकावर आहे आणि काम करण्यासाठी सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या १०० कंपन्यांच्या यादीत ती १५ व्या स्थानावर आहे.[]

या कंपनीचे क्रेडिट कार्ड, ग्राहक बँकिंग आणि व्यावसायिक बँकिंग असे तीन मुख्य विभाग आहेत. ३१ डिसेंबर २०२२ च्या आकडेवारीनुसार कंपनीने क्रेडिट कार्डमधून ११४ अब्ज डॉलर्स, वाहन कर्जातून ७५ अब्ज डॉलर्स आणि व्यावसायिक कर्जातून ८५ अब्ज डॉलर्सचेा धंदा केला होता.[] मनी लाँडरिंगमध्ये (बेकायदेशीर पैसा वैध करणे) सहभाग असल्याच्या कारणावरून नियामकांनी या कंपनीला विविध प्रसंगी दंड ठोठावला आहे. याव्यतिरिक्त, ग्राहकांशी केलेल्या वागणुकीबद्दल या कंपनीला अनेक खटले आणि सरकारी चौकशीला सामोरे जावे लागले आहे.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. 1 2 "Corporate Information". Capital One. मार्च ११, २०२६ रोजी पाहिले.
  2. "Capital One Bowl News". The New York Times. जानेवारी १, २०१०.
  3. "Large Commercial Banks". FederalReserve.gov. Federal Reserve Bank. १ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
  4. "Capital One Financial Profile". Forbes. मार्च ११, २०२६ रोजी पाहिले.
  5. "Fortune 500: Capital One". Fortune. मार्च ११, २०२६ रोजी पाहिले.
  6. "Capital One: 100 Best Companies to Work For". Fortune. मार्च ११, २०२६ रोजी पाहिले.
  7. "U.S. fines Capital One for anti-money laundering failures". Reuters. मार्च ११, २०२६ रोजी पाहिले.