Jump to content

कृष्णा चक्रवर्ती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कृष्णा चक्रवर्ती (जन्म - ७ डिसेंबर १९४३, हावडा, प.बंगाल, मृत्यू - १३ सप्टेंबर २०२२)[] इंग्लिश व बंगाली भाषेत लेखन करणाऱ्या लेखिका

जीवन

[संपादन]

कृष्णा चक्रवर्ती या न्यायमूर्ती संतोष कुमार चक्रवर्ती आणि बोकुल राणी यांच्या द्वितीय कन्या. कृष्णा यांचे प्राथमिक शिक्षण महाकाली बालिका विद्यालयात झाले. मोठी बहिण रत्ना, धाकटी बहिण रिना आणि भाऊ सुबीर असा यांचा परिवार होता. १९५७ साली बोकुल राणी आणि सुबीर हे दोघे आश्रमवासी झाले आणि न्यायमूर्ती चक्रवर्ती त्यांच्या निवृत्तीनंतर १९७२ मध्ये आश्रमवासी झाले.

कृष्णा चक्रवर्ती १९५६ मध्ये, आपल्या दोन बहिणींबरोबर पाँडिचेरी येथील श्रीअरविंद आश्रमात राहू लागल्या. त्यांचे शिक्षण श्रीअरविंद इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन मध्ये झाले. १९६६ मध्ये त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्या आश्रमाच्या मध्यवर्ती कार्यालयात रुजू झाल्या. १९९२ नंतर कालांतराने त्या मध्यवर्ती कार्यालयाच्या प्रमुख झाल्या आणि शेवटपर्यंत त्या तेथे कार्यरत होत्या.

२०१० मध्ये ओवरमॅन फाउंडेशनची स्थापना झाली. कृष्णा त्याच्या संस्थापक-सदस्यांपैकी एक होत्या.[]

प्रकाशित लेखन

[संपादन]
  • श्री अरबिंदो लोहो प्रोनाम (बंगाली) - २००५ साली प्रकाशित
  • अ गारलँड ऑफ अ‍ॅडोरेशन (इंग्रजी) - २००७ साली प्रकाशित
  • न्यायाधीश साहेब ओ महाराणीर वन-थर्ड डझन एर कहिनी (बंगाली) - २००९ साली प्रकाशित []

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b "Krishna Chakravarti: In Memoriam by Anurag Banerjee – Overman Foundation" (इंग्रजी भाषेत). 2024-02-16. 2025-02-27 रोजी पाहिले.
  2. ^ "Remembering Mona Pinto on her 107th Birth Anniversary – Overman Foundation" (इंग्रजी भाषेत). 2018-11-11. 2025-02-27 रोजी पाहिले.