Jump to content

कृष्णाजी लक्ष्मण पटवर्धन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कृष्णाजी लक्ष्मण पटवर्धन ऊर्फ किशाभाऊ पटवर्धन (जन्म: २५ डिसेंबर १९२०, पुणे) स्व-रूपवर्धिनी संस्थेचे संस्थापक म्हणून ओळखले जातात. हे निवृत्त मुख्याध्यापक व समाजकार्यकर्ते होते. शिक्षण क्षेत्रातील प्रयोगशीलता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची जिद्द यासाठी ते ओळखले जात.[]

अध्ययन व अध्यापन

[संपादन]

प्रारंभी त्यांनी सुमारे दहा वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यात योगदान दिले. त्यानंतर त्यांनी एम.एस्सी. व बी.एड. पदवी प्राप्त करून शासनाच्या शाळांमध्ये शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून कार्य केले. पुण्याच्या पूर्व भागातील राजा धनराज गिरजी विद्यालय येथे शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून ते कार्यरत होते. शालेय कार्यकाळातच त्यांचा विद्यार्थ्यांशी घनिष्ठ संबंध राहिला आणि हुशार असूनही योग्य संधी न मिळालेल्या विद्यार्थ्यांबाबत त्यांना विशेष आस्था होती.[]

समाजकार्य

[संपादन]

१९७९ साली शासनसेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी स्व-रूपवर्धिनी या संस्थेची स्थापना केली. सुरुवातीला, संस्थेचे काही नाव नव्हते, पण त्यांच्या सहकाऱ्यांसह चर्चांमधून आणि सहविचारातून १३ मे १९७९ रोजी स्वरूपवर्धिनी चे कार्य सुरू झाले. या संस्थेमार्फत वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील हुशार मुलांना संधी व आधार देऊन त्यांचे सुप्त गुण विकसित करणे हा त्यांचा हेतू होता. संस्थेची सुरुवात पुण्यातील मंगळवार पेठेतील एका कारखान्याच्या शेडमध्ये काही विद्यार्थ्यांपासून झाली. पुढे या कार्याचा विस्तार विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांतून झाला.[]

प्रेरणास्त्रोत

[संपादन]

किशाभाऊ पटवर्धन यांच्यावर रामकृष्ण परमहंस यांच्या शिकवणीचा, डॉ. हेडगेवारांच्या विचारांचा तसेच दादाराव परमार्थ यांचा प्रभाव होता. त्यांच्या प्रेरणेनेच त्यांनी आयुष्यभर समाज व राष्ट्रसेवा करण्याचे ध्येय जोपासले.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Kishabhau Patvardhan - Not Just A Teacher But A Transformer!". Sewagatha (हिंदी भाषेत). 2025-09-13 रोजी पाहिले.
  2. ^ "चिरयुवा कर्मयोगी- किशाभाऊ पटवर्धन". Sewagatha (हिंदी भाषेत). 2025-09-13 रोजी पाहिले.
  3. ^ https://swaroopwardhinee.org/founder/. Missing or empty |title= (सहाय्य)