Jump to content

कुरडू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कुर्डू उर्फ कोंबडा
कुरडू
टॅक्सॉन
लघुनामC. argentea संपादन
वर्गाचे नावCelosia argentea संपादन
वर्गिकरणातील प्रतवारीspecies संपादन
पालक वर्गCelosia संपादन
Taxon synonymCelosia cristata, Celosia argentea var. cristata संपादन
IUCN conservation statusमुबलक प्रजाती संपादन
External data available at URLhttps://www.gbif.org/dataset/93725bf2-6ada-47f9-bd5e-0e679e3d245e, https://www.gbif.org/dataset/31dc1507-a6e1-4233-a8df-c7a78596a7e4 संपादन
Invasive toइंडोनेशिया संपादन
Taxon author citationL. संपादन
GRIN URLhttps://npgsweb.ars-grin.gov/gringlobal/taxonomydetail.aspx?id=9743 संपादन
Flora of the Hawaiian Islands URLhttps://naturalhistory2.si.edu/botany/hawaiianflora/speciesdescr.cfm?genus=Celosia&species=argentea संपादन

कुरडू किंवा कुर्डू (हि. सफेद मुर्धा गु. लांबडी क. गोरंजि सं. वितुन्न भुरूंडी लॅ. सेलोशिया अर्जेन्शिया कुल-ॲमरँटेसी). ही लहान वर्षायू (एक वर्ष जगणारी) ओषधी तणाप्रमाणे पावसाळ्याच्या शेवटी भारतात आणि उष्णकटिबंधात शेतात व इतरत्र आढळते. हिला बोलीभाषेत कोंबडा देखील म्हणतात. खोड व फांद्या पन्हाळीदार पाने साधी, विविध, एकाआड एक अग्रस्थ कणिशावर लहान, सच्छद, प्रथम गुलाबी नंतर पांढरी फुले सप्टेंबर–डिसेंबरमध्ये येतात. परिदले १–५, केसरदले ५ केसरतंतु तळाशी परस्परांशी जुळून पेल्यासारखा व पातळ भाग बनतो किंजपुट ऊर्ध्वस्थ, बीजके ४–८ फळ करंडरूप बिया चापट, काळ्या, चकचकीत असून त्यांचा उपयोग अतिसार, रक्तदोष, मुखव्रण, नेत्ररोग, दृष्टीदोष, मूत्ररोग इत्यादींवर करतात. कुरडूच्या काही शोभिवंत जाती (से. प्ल्युमोजा व से. क्रिस्टॅटा-मोरशिखा) बागेत लावतात.[]

संदर्भ

[संपादन]
  1. "कुरडू". मराठी विश्वकोश. १४ जून २०२५ रोजी पाहिले.