Jump to content

कुकू कोहली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कुकू कोहली
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
जन्म तारीख४ जून 1949 संपादन
जन्मस्थानपेशावर संपादन
मृत्यू तारीख२५ ऑगस्ट 2026 संपादन
वैवाहिक जोडीदारअरुणा इराणी संपादन
नातेवाईकShwethkumar, इंद्र कुमार, Adi Irani, Firoz Irani संपादन
व्यवसायलेखक, चित्रपट-दिग्दर्शक संपादन
Related categoryCategory:Films directed by Kuku Kohli संपादन

अवतार कोहली उर्फ संदेश कोहली उर्फ कुकू कोहली (४ जून, १९४९ – २५ ऑगस्ट, २०२६)[] हे एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, पटकथा लेखक आणि संकलक (एडिटर) होते.[] त्यांचा जन्म पेशावर येथे झाला होता. त्यांनी १९९१ मधील फूल और काटे या बॉलिवूड चित्रपटातून अजय देवगण यांना चित्रपटसृष्टीत पहिली संधी दिली होती.[][]

कार्रकीर्द

[संपादन]

आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला, त्यांनी अनेक वर्षे राज कपूर यांच्या हाताखाली काम केले, जिथे त्यांनी चित्रपट निर्मितीची कौशल्ये आत्मसात केली.[] कुक्कू कोहली ३० पेक्षा जास्त वर्षे चित्रपटसृष्टीत कार्यरत होते.

ते सनी देओल आणि अमृता सिंग यांच्या पदार्पण करणाऱ्या आणि त्यांना स्टारडम मिळवून देणाऱ्या सुवर्ण महोत्सवी (गोल्डन जुबली) बेताब या चित्रपटाचे सेकंड युनिट दिग्दर्शक होते. सनी देओल आणि डिंपल कापडिया यांच्या प्रमुख भूमिका असलेला अर्जुन हा त्यांचा आणखी एक चित्रपट रौप्य महोत्सवी (सिल्वर जुबली) ठरला. त्यानंतर त्यांनी फूल और कांटे या चित्रपटाचे दिग्दर्शन केले, ज्याने डायमंड जुबली टप्पा गाठला आणि अजय देवगण यांच्या प्रसिद्धीला मोठी झेप मिळवून दिली. यानंतर त्यांनी धर्मेंद्र यांच्या प्रमुख भूमिका असलेला कोहराम आणि अजय देवगण, अक्षय कुमार, करिश्मा कपूर, नगमा यांच्या भूमिका असलेला सुहाग दिग्दर्शित केला, जो पुन्हा एकदा सुवर्ण महोत्सवी ठरला. हकिकत चित्रपटात अजय देवगण आणि तबू यांनी काम केले होते. या चित्रपटाला फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासह ७ श्रेणींमध्ये नामांकने मिळाली होती. याच चित्रपटासाठी कोहली यांना स्क्रीन पुरस्कार सोहळ्यात वर्षातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचे नामांकनही मिळाले होते. त्यांचे पुढील दिग्दर्शन जुल्मी होते, ज्यामध्ये अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांनी भूमिका केल्या होत्या. हा चित्रपटही सर्वत्र यशस्वी ठरला होता.

त्यांचा पुढचा चित्रपट गोविंदा यांच्या दुहेरी भूमिका असलेला अनाडी नं. १ हा होता. त्यानंतर त्यांनी ये दिल आशिकाना हा चित्रपट बनवला. या चित्रपटाद्वारे संगीतकार जोडी नदीम-श्रवण यांनी चित्रपटसृष्टीत पुनरागमन केले. अर्जन बाजवा आणि 'कांची कौल' यांच्या प्रमुख भूमिका असलेला वो तेरा नाम था हा त्यांचा अखेरचा दिग्दर्शित चित्रपट होता.

वैयक्तिक जीवन आणि मृत्यू

[संपादन]

कोहली यांनी १९९० मध्ये अभिनेत्री अरुणा इराणी यांच्याशी विवाह केला. हा त्यांचा दुसरा विवाह असून इराणी यांना अपत्य नाही.[] रीता कोहली या त्यांच्या पहिल्या पत्नी पासून त्यांना पूजा कोहली आणि करिश्मा कोहली अशी दोन अपत्ये झाली. पूजा कोहली या चित्रपट निर्माती आहेत. तर करिश्मा कोहली या चित्रपट निर्माती, सहाय्यक दिग्दर्शक आणि सह-दिग्दर्शक म्हणून काम करतात. करिश्मा यांनी कबीर खान यांच्या एक था टायगर (२०१२) आणि बजरंगी भाईजान (२०१५) सारख्या चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. तसेच नेटफ्लिक्स मालिका द फेम गेम (२०२२) चे सह-दिग्दर्शनही केले आहे. करिश्माने २०२५ मध्ये अभिनेता मिखाईल यावलकर याच्याशी विवाह केला.[]

२५ ऑगस्ट २०२६ रोजी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई येथे वयाच्या ७७ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने कोहली यांचे निधन झाले.[]

संदर्भ

[संपादन]
  1. "Director Kuku Kohli passes away at 77". रोजी मूळ पानापासून संग्रहित2026-08-26. 2026-08-26 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. "Kuku Kohli". Bollywood Hungama. 19 February 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 16 December 2012 रोजी पाहिले.
  3. "Tuesday Trivia: When Ajay Devgn replaced Akshay Kumar in his debut film Phool Aur Kaante". India Today (इंग्रजी भाषेत). 7 November 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 November 2023 रोजी पाहिले.
  4. "Ajay Devgn's 30-year-old Phool Aur Kaante split entry will always be iconic. On Monday Masala". India Today (इंग्रजी भाषेत). 7 November 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 November 2023 रोजी पाहिले.
  5. "New Talent, Old Virture". The Hindu. 2004-02-05. 1 May 2004 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 16 December 2012 रोजी पाहिले.
  6. "Aruna Irani on husband Kuku: 'He didn't tell me that he was married'". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 20 February 2022. 16 August 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 November 2023 रोजी पाहिले.
  7. "Who Is Karishma Kohli? Know About Filmmaker & Katrina Kaif's Friend Who Married Actor Mikhail Yawalkar". MSN. MSN Entertainment. April 2025. 30 July 2025 रोजी पाहिले.
  8. Filmmaker Kuku Kohli, who introduced Ajay Devgn in films, passes away at 77; friend Ashoke Pandit reveals reason