कीर्तिकुमार शिंदे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Imbox content.png
मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाच्या/मजकुराच्या विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रतेबद्दल साशंकता आहे. हा साचा लावलेल्या लेखाबद्दल/विभागाबद्दल/मजकुराच्या विश्वकोशीय उल्लेखनीयतेबाबत साधक बाधक चर्चा होणे अभिप्रेत आहे. जर उचित उल्लेखनीयता स्थापित करण्यात आली नाही, तर हा लेख, दुसऱ्या लेखात विलीन /पुनर्निर्देशित किंवा पान/विभाग/मजकूर न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास संबंधित पान/विभाग/मजकूर वगळला जाऊ शकतो. सुयोग्य आणि विश्वासार्ह संदर्भ उपलब्ध करुन दिल्यास अथवा माहितीस दुजोरा प्राप्त करुन दिल्यास ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेबाबत निर्णय करणे सोपे होऊ शकते.
त्रुटी: कृपया हा साचा मुख्य नामविश्वात/लेखात वापरू नका.
कीर्तिकुमार शिंदे

कीर्तिकुमार शिंदे (जन्म ३ फेब्रुवारी, इ.स. १९८०)[संपादन]

हे एक सामाजिक-राजकीय कार्यकर्ता तसंच पत्रकार, प्रकाशक आणि कम्युनिकेशन एक्स्पर्ट आहेत. त्यांचा जन्म मुंबईत झाला. ९ मार्च २०२० रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीसपदी त्यांची नेमणूक करण्यात आली.

राजकीय वाटचाल[संपादन]

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस म्हणून कीर्तिकुमार शिंदे यांनी विविध समाजघटकांचे प्रश्न व समस्या अभ्यासूपणे राज्यसरकारपुढे मांडल्या आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. आशा स्वयंसेविकांच्या मासिक मानधनाची रक्कम दुप्पट करणे, बंधपत्रित डाॅक्टरांच्या वेतनातील कपात रद्द करून त्यांचे वेतन पूर्ववत करणे, वाहतूक व्यावसायिकांच्या समस्यांना वाचा फोडणे असे अनेक महत्त्वपूर्ण विषय कीर्तिकुमार शिंदे यांनी पक्षाच्या माध्यमातून करोना टाळेबंदीच्या काळात हाताळले.

शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील घोटाळा उघडकीस आणला[संपादन]

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील गोटखिंडी गावात महाविकास आघाडी सरकारच्या महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप मनसे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केला.(१) त्यानंतर चुकीच्या माहितीच्या आधारे कर्जमाफी मिळवल्याबद्दल कर्जदार तसंच सोसायट्यांचे सचिव यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले. ( गोटखिंडी चुकीच्या कर्जमाफीबद्दल गुन्हे दाखल करा, पालकमंत्र्यांचे आदेश )(२) जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी केलेल्या चौकशीनंतर सांगली जिल्ह्यातील १४१ बोगस कर्जदारांनी शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा आर्थिक लाभ लुटल्याचं सिद्ध झालं. या १४१ बोगस कर्जदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले.(३)

रिक्षा आणि दुचाकी कर्जग्राहकांना आर्थिक दिलासा[संपादन]

करोना महासाथीच्या काळात रिक्षावर उपजीविका अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळलं. अशा कुटुंबांना दिलासा मिळावा, यासाठी कीर्तिकुमार शिंदे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले. कर्ज ग्राहकांना दमदाटी करणा-या बजाज फायनान्सविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केल्यामुळे बजाज कंपनीला मनसेच्या मागण्यांची गंभीर दखल घ्यावी लागली.(४) ) मनसेच्या इशा-यानंतर बजाज फायनान्सने १,१९,७४३ रिक्षा कर्ज ग्राहकांना प्रत्येकी सुमारे ३,२०० ते ४,००० रुपये इतका आर्थिक दिलासा दिला. त्यानंतर, मनबा फायनान्स या दुचाकी खरेदीसाठी कर्ज देणा-या वित्तीय संस्थेने मनसेच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन सुमारे १२ हजार ग्राहकांचे सहा महिन्यांसाठीचे बाऊन्सिंग चार्जेस प्रत्येकी रु ४,९५६ माफ केले.(५)

पत्रकार[संपादन]

कीर्तिकुमार शिंदे ह्यांनी मुंबई विद्यापीठातून इतिहास विषयात पदवी संपादन केली. महाविद्यालयात असतानाच त्यांनी सामाजिक विषयांवर लिखाणास सुरुवात केली. फ्री प्रेस जर्नल (Free Press Journal) आणि द इंडियन एक्स्प्रेस (The Indian Express) ह्या दैनिकांमध्ये अल्पकाळ स्ट्रिंजर म्हणून पत्रकारिता केल्यानंतर सकाळ, आपलं महानगर, सामना, मी मराठी लाइव्ह ही दैनिकं तसंच चित्रलेखा आणि लोकप्रभा ह्या साप्ताहिकांमध्येही त्यांनी संपादकीय विभागात महत्त्वाच्या पदांवर काम केलं.(६)

ग्रंथप्रकाशक:[संपादन]

२०१०मध्ये कीर्तिकुमार शिंदे ह्यांनी ‘नवता’/‘नवता बुक वर्ल्ड’ ह्या प्रकाशन संस्थेची स्थापना केली. ह्या प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून त्यांनी कथा, कविता, कादंबरी, वैचारिक असे विविध साहित्य प्रकार हाताळणारी अनेक दर्जेदार पुस्तकं प्रकाशित केली. अनेक वर्षांपासून मराठी वाचकांना अनुपलब्ध असलेली प्रबोधनकार ठाकरे ह्यांची ग्रंथसंपदा (माझी जीवनगाथा, जुन्या आठवणी, देवळांचा धर्म धर्माची देवळे, दगलबाज शिवाजी, वक्तृत्व कला आणि साधना) कीर्तिकुमार शिंदे ह्यांनी ‘नवता’च्या माध्यमातून प्रकाशित केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ह्यांच्या भाषणांचा संग्रह ‘ही राजभाषा असे’ ह्यापुस्तकाची निर्मिती आणि प्रकाशनही कीर्तिकुमार शिंदे ह्यांनी केले. वाचन संस्कृतीच्या प्रसारासाठी कीर्तिकुमार शिंदे ह्यांनी अनेक ठिकाणी पुस्तक प्रदर्शनांचे आयोजन करण्यात पुढाकार घेतला.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून भांडूपमध्ये ‘पुस्तकांचं गाव’ (२०१०), कल्याणमध्ये ‘वाचेल त्याचे कल्याण’ (२०११), ठाण्यामध्ये ‘महाराष्ट्र धर्म’ (२०११) आणि ‘पुस्तकप्रेमींचे ठाणे’ (२०१६), सायन तसंच चारकोपमध्ये ‘राजभाषा ग्रंथमहोत्सव’अशी अनेक पुस्तक प्रदर्शनं भरवण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.ठाण्यातील ‘महाराष्ट्र धर्म’ पुस्तक महोत्सवात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ह्यांच्या हस्ते ‘ही राजभाषा असे’ ह्या राज ठाकरे ह्यांच्या भाषण-संग्रह पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.(७)

सामाजिक-राजकीय भाष्यकार[संपादन]

द वायर (thewire.in), फर्स्टपोस्ट.काॅम (firstpost.com), लोकसत्ता.काॅम (loksatta.com), अक्षरनामा.काॅम (aksharnama.com) ह्यांसारख्या अनेक नावाजलेल्या पोर्टल्सवर कीर्तिकुमार शिंदे ह्यांनी आपले सामाजिक आणि राजकीय विचार ठामपणे मांडलेले आहेत.पण महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात कीर्तिकुमार शिंदे ह्यांची ओळख आहे ती मनसेचे भाष्यकार म्हणूनच. राज ठाकरे ह्यांच्या राजकीय भूमिकांविषयीच्या किंवा त्यांच्या दौ-यांविषयीच्या कीर्तिकुमार शिंदे ह्यांच्या फेसबुक पोस्ट नेहमीच व्हायरल होत असतात. अनेकदा तर कीर्तिकुमार शिंदे ह्यांची फेसबुक पोस्ट हीच प्रसारमाध्यमांसाठी बातमीचा विषय बनते.(८) द हिंदू, बीबीसी न्यूज मराठी ह्यांसारख्या अग्रगण्य प्रसारमाध्यमांमध्येही कीर्तिकुमार शिंदे ह्यांची राजकीय निरिक्षणं तसंच मतं अनेकदा प्रसिद्ध झालेली आहेत.

लेखक:[संपादन]

‘दगलबाज (Diplomat) राज’

२०१८मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे ह्यांच्या ५०व्या वाढदिवसाचे औचित्य साधून पत्रकार आणि लेखक कीर्तिकुमार शिंदे यांनी लिहिलेल्या ‘दगलबाज राज’ या पुस्तकाचे प्रकाशन कांदिवली येथील तेरापंथ भवनात ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक अंबरीश मिश्र यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तकात कीर्तिकुमार शिंदे यांनी फेसबुक, ब्लॉग्ज आणि पोर्टल्स या ऑनलाइन माध्यमांमध्ये वेळोवेळी लिहिलेल्या लेखांचे संकलन करण्यात आले आहे. विविध प्रश्नांवर राज यांनी घेतलेल्या भूमिका, मनसेने केलेली आंदोलने यांच्यामागची सैद्धांतिक बाजू समजावून सांगणारे हे लेख आहेत. संपादक व लेखक मुकेश माचकर यांनी आपल्या भाषणात “शिंदे यांचं 'दगलबाज राज' हे पुस्तक म्हणजे गेल्या चार वर्षांतल्या राजकीय घडामोडींचा इतिहासच आहे. हे पुस्तक वाचनीय तर आहेच, पण त्याचबरोबर त्याला एक संदर्भमूल्य आहे”असं मत व्यक्त केलं.(९)

मनसेच्या राजकारणाचा भाष्यकार[संपादन]

“कीर्तिकुमार शिंदे नव्या युगाचे पायरव ओळखण्यात तरबेज आहे. सोशल मीडियाची ताकद ओळखून त्याने एकांड्या शिलेदाराप्रमाणे राज यांच्या वेळोवेळीच्या निर्णयांची, मनसेच्या कामांची आणि धोरणांची बाजू फेसबुकवर जोरदार लढवली आहे. डिजिटल माध्यमांमध्ये आज मनसेच्या राजकारणाचा तरुण भाष्यकार अशी त्याची ओळख निर्माण झाली आहे. राज यांचे मुद्दे त्यांच्या बेधडक शैलीत मांडताना शाब्दिक ‘खळ्ळ फट्यॅक’ करण्यात तो मागे पडत नाही, हे या पुस्तकातले त्याचे दणकेबाज पोस्ट-लेख वाचताना लक्षात येईल.”(मुकेश माचकर, ‘दगलबाज राज’ पुस्तकाच्या प्रस्तावनेतून साभार.)(१०)

झेंडा बदलला म्हणजे...[संपादन]

"झेंडा बदलणं हे मनसेत भविष्यात मूलगामी बदल होतील, ह्याचे संकेत आहेत. हे बदल मनसेला अधिक सक्रिय आणि परिणामकारक करतील, अशी आशा वाटते...झेंडा बदलला म्हणजे मनसे भाजपसोबत जाईल, असं समजणं भाबडेपणाचं ठरेल. राज ठाकरेंसारखं नेतृत्व भाजपच काय, कोणत्याही पक्षासोबत कधीही घरंगळत जाणार नाही. ते काहीही करतील, पण स्वतःच्या अटी-शर्तीवरच" असं मत कीर्तिकुमार शिंदे ह्यांनी बीबीसी न्यूज मराठीशी बोलताना व्यक्त केलं होतं.(११)

मनसेच्या हिंसक कारवायांचे समर्थन...[संपादन]

सर्व प्रसारमाध्यमं मनसेच्या हिंसक आंदोलनांवर टीका करत असताना कीर्तिकुमार शिंदे ह्यांनी मात्र मनसेचं समर्थन केलं. ‘राज्य सरकार आणि सरकार राज’ ह्या आपल्या लेखात कीर्तिकुमार शिंदे ह्यांनी स्पष्ट लिहिलंय की, “आपल्याकडे कायदे असतात. कायद्यानुसार न्यायनिवाडा करायला न्याय व्यवस्था असते. पण तीआंधळीअसते. जनहिताची धोरणं आखण्यासाठी, कायदे करण्यासाठी तसंच न्याय व्यवस्थेच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठीराज्य सरकारनावाची एक प्रचंड शक्तिशाली यंत्रणा असते. पण ती निर्ढावलेली असते. न्यायालयाच्या आदेशांचं पालन करताना आणि जनतेच्या गरजांची-आकांक्षांची पूर्ती करण्यासाठीची प्रत्यक्ष कृती करताना ही सरकारी यंत्रणा फक्ततारीख पे तारीखदेत राहते! अशा स्थितीत जिथे लोकशाही व्यवस्थेद्वारे लोकांनी निवडून दिलेले सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी तसंच राज्य सरकार मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थ, अनधिकृत फेरीवाले किंवा अगदी टोल यांसारख्या असंख्य विषयांवर आपले कोणतेही अधिकृत धोरण लोकांसमोर ठेवत नाहीत, लोकांना भेडसावणा-या मूलभूत प्रश्नांवर विधिमंडळाच्या सभागृहांमध्ये सकस चर्चा घडवून आणत नाहीत, त्यांवर प्रभावी उपाययोजना सुचविणा-या कायद्यांची निर्मिती करत नाहीत, आणि जिथली न्याय व्यवस्था जनहित याचिकांचीही दखल प्रस्थापित-सत्ताधारी राजकीय पक्षांच्या हितसंबंधांना अनुसरूनचतारीख पे तारीखदेत म्हणजे टप्प्याटप्प्याने घेते, तिथल्या जनतेलामनगटशाहीचा आसरा घेण्यावाचून दुसरा पर्यायच उपलब्ध राहत नाही. ही आपली शोकांतिका असली, तरी वास्तव आहे! मानो, याना मानो!!(१२)

कीर्तिकुमार शिंदे ह्यांचे लेखन[संपादन]

लोकसत्ता (१५ लेख)

मुंबई लाईव्ह (४ लेख)

द हिंदू

बीबीसी न्यूज मराठी