किरण करमरकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
किरण करमरकर
किरण करमरकर
जन्म किरण करमरकर
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट निष्पाप
पत्नी रिंकू धवन

किरण करमरकर (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हे भारतीय दूरचित्रवाणी, चित्रपट व नाटकांत काम करणारे अभिनेते आहे. स्टार प्लस वरील हिंदी धारावाहिक कहानी घर घर की मधील ओम अगरवाल ह्या व्यक्तिरेखेसाठी ते प्रसिद्ध आहेत.

कारकीर्द[संपादन]

करमरकरांची कारकीर्द मराठी रंगभूमी व व्यावसायिक जाहिरातींमधून झाली. एकता कपूर यांनी दिग्दर्शित केलेल्या घर एक मंदिर या हिंदी दूरचित्रवाणी मालिकेमधून त्यांना प्रसिद्धी मिळाली. इ.स. २००० मध्ये सुरू झालेल्या कहानी घर घर की या मालिकेत अभिनेत्री साक्षी तन्वरच्या पार्वती ह्या व्यक्तिरेखेचा पती असलेल्या ओम आगरवालच्या भूमिकेमध्ये किरण करमरकरांना प्रेक्षकांचा भरपूर आणि चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर त्यांनी अनेक दूरचित्रवाणी मालिकांमध्ये विविध भूमिका साकारल्या. कलर्स टीव्ही वरील उतरन ह्या मालिकेत त्यांनी तेजसिंग बुंदेलाची खलनायकी भूमिका केली आहे.

करमरकरांनी काही बॉलीवूड चित्रपटांमध्ये सुद्धा छोट्या भूमिका केल्या. त्याच बरोबर हिंदी व मराठी नाटकांत पण काम केले. २००६ मध्ये भावना बलसावर ह्यांच्या समवेत मेरा नाम जोकर ह्या विनोदी नाटकात ते प्रमुख भूमिकेत दिसले. नाटकाचे दिग्दर्शन बलसावर ह्यांच्या आई व प्रसिद्ध अभिनेत्री शुभा खोटे ह्यांचे होते. २०१० मध्ये चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित बस इतनासा ख्वाब है नाटकात शेफाली शाह सोबत ते दिसले.

त्यांच्या क्षणोक्षणी ह्या चित्रपटासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

खाजगी जीवन[संपादन]

आपल्या खाजगी जीवनात करमरकर हे अभिनेत्री रिंकू धवन ह्यांच्याशी विवाहबद्ध आहेत. रिंकू धवन ह्यांनी कहानी घर घर की मालिकेत करमरकरांच्या बहिणीची भूमिका बजावली होती.

चित्रपट कारकीर्द[संपादन]

इ . स. शीर्षक भूमिका माध्यम टिपणी
घर एक मंदिर दूरचित्रवाणी मालिका
पडोसन दूरचित्रवाणी मालिका
इतिहास दूरचित्रवाणी मालिका दूरदर्शनवर प्रदर्शित
२००० कहानी घर घर की ओम अगरवाल दूरचित्रवाणी मालिका स्टार प्लस या दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रदर्शित
२००४ थोडा तुम बदलो थोडा हम चित्रपट
२००४ केहना ही मुझको निश्चय कपूर दूरचित्रवाणी मालिका
२००६ सारथी भुजंग आहुजा दूरचित्रवाणी मालिका स्टार प्लस या दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रदर्शित
पाहुणे कलाकार
२००६ थोडीसी जमीन थोडासा आसमान सुधांशू दूरचित्रवाणी मालिका स्टार प्लसवर प्रदर्शित
२००६ कच्चे धागे नाटक
२००६ मेरा नाम जोकर नाटक
२००७ कॉमेडी सरकस स्पर्धक दूरचित्रवाणी मालिका सोनी टीव्हीवर प्रदर्शित
२००७ जस्ट मॅरेज चित्रपट
२००८ कहानी हमारे महाभारत की शंतनू दूरचित्रवाणी मालिका 9X वाहिनीवर प्रदर्शित
२००९ क्षणोक्षणी मुख्यमंत्री चित्रपट मराठी भाषा
२०१० राजनीती एसपी शर्मा चित्रपट
२०१० आघात डॉक्टर देशपांडे चित्रपट मराठी भाषा
२०१० पंख चित्रपट
२०१० बस इत्नासा ख्वाब है नाटक
सलीम आरिफ नाटक
हमसफर नाटक
शादी की होम डिलीवरी नाटक
२०११ जिंदगी कहे - स्माईल प्लीज दूरचित्रवाणी मालिका लाईफ ओके वर प्रदर्शित
२०१२ चक्रव्यू गृहमंत्री चित्रपट
२०१२ शांघाई चित्रपट
२०१२ आरोही गोष्ट तीघांची चित्रपट मराठी भाषा
२०१२ उतरन तेजसिंग बुंदेला दूरचित्रवाणी मालिका कलर्स टीव्हीवर प्रदर्शित
२०१३ पुणे ५२ चित्रपट मराठी भाषा