काशीबाई साखाजी मिन्धर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

काशीबाई साखाजी मिन्धर (देशमुख) माहेरचे नाव काशीबाई नागुजी बदनापूरकर या साखाजी मिन्धर यांच्या पत्नी होत्या . त्यांचा विवाह काशीबाई नागुजींचे आत्येभाऊ गंगाधरपंत सूर्याजी ठोसर यांनी साखाजी मिन्धर (सोमवाडी, ता. अंबड , जि. जालना) यांच्याशी करून दिला. [१]

मृत्यू[संपादन]

इ.स. १६२० मध्ये काशीबाई नागुजी बदनापूरकर यांचा विवाह वस्तुतः वय वर्षे १२ असलेल्या नारायण सूर्याजी ठोसर या मुलाशी ठरला होता पण व्यक्तिगत संन्यस्त विचारांना अनुसरून नारायण सूर्याजी ठोसर ऐन लग्नाच्यावेळी लग्नमंडप सोडून पळून गेले. नारायण सूर्याजी ठोसर यांनाच लोक पुढे समर्थ रामदास म्हणून ओळखू लागले.

तत्कालीन परिस्थितीतील ब्राह्मण समाजातील श्रद्धांनुसार अल्पवयीन काशीबाई नागुजी बदनापूरकर एक अपशकुनी स्त्री ठरल्यामुळे ब्राह्मण समाजात तीचे लग्न होणे शक्य नव्हते म्हणून ब्राह्मणेतर समाजातील साखाजी मिन्धर यांच्याशी विवाह केला गेला. अर्थात ब्राह्मण स्त्रीने ब्राह्मणेतराशी विवाह करणेही तत्कालीन अधर्मग्रंथांच्या प्रभावाखालील ब्राह्मण समाजास मान्य होण्या सारखे नव्हते त्यामुळे अल्पवयीन काशीबाई नागुजी बदनापूरकर यांच्यावर मानसिक दबाव/छळ होऊन त्यांचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला ज्यास हितसंबंधी लोकांनी बहुधा आत्महत्या म्हणून जाहीर केले. [२]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ अनंत गोपाळ कुडाळकरांची वाकेनिशी
  2. ^ अनंत गोपाळ कुडाळकरांची वाकेनिशी