काशीनाथ बाबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.

काशिनाथ बाबा यांनी १७ जानेवारी १९६६ (शटतीला एकादशी ) रोजी समाधी घेतल्यानंतर त्यांचे तत्व समाजापर्यंत पोहोचावे या उद्देश्याने ७ जुलै १९७२ रोजी तपस्वी काशिनाथ बाबा संस्थान, अमरगड वाईगौळ ता. मनोरा जी. वाशीम हे व्यास मुंबई सार्वजनिक विश्वस्थव्यवस्था अधिनियम १९५० अन्वये स्थापन करण्यात आले. संस्थानद्वारा दरवर्षी बाबाजींचा जन्मोत्सव, संजीवन समाधीसोहळा, तसेच इतर धार्मिक उत्सव साजरे केले जातात. काशिनाथ बाबा यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९१२ रोजी रत्री ११ वाजता श्री चोखला नाईक व लाडकी माता यांच्या उदरी झाला. बालपणीच परमार्थाची आवड असल्यामुळे १६ वर्षांपर्यंत पायी देवदर्शन घेऊन १७ व्या वर्षी अन्नाचा त्याग करून धुनी प्रज्वलित करून तपश्चर्येला सुरवात केली. वाईगौळ गावाच्या बाहेर वनात त्यांनी ३ ठिकाणी ३६ वर्षे तपश्चर्या केली. वयाच्या ५७ व्या वर्षी १७ जानेवारी १९६६ (शटतीला एकादशी ) रोजी रात्री १२.२५ मिनिटांनी सर्व भक्तांसमक्ष संजीवन समाधी घेतली. त्यानंतर दरवर्षी समाधी सोहळा साजरा केला जातो.[ संदर्भ हवा ]