काशवी गौतम
भारतीय क्रिकेट खेळाडू | |||
| माध्यमे अपभारण करा | |||
| जन्म तारीख | एप्रिल १८, इ.स. २००३ | ||
|---|---|---|---|
| नागरिकत्व | |||
| व्यवसाय |
| ||
| |||
काशवी सुदेश गौतम (१८ एप्रिल, २००३:चंडीगढ, भारत - ) ही
भारतकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. ती महिला प्रीमियर लीगमध्ये गुजरात जायंट्सकडून आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये चंडीगढकडून खेळते.
देशांतर्गत कारकीर्द
[संपादन]डिसेंबर २०२३ मध्ये झालेल्या दुसऱ्या महिला प्रीमयर लीग लिलावात गौतमला गुजरात जायंट्सने ₹२ कोटींना खरेदी केले. परंतु नंतर दुखापतीमुळे तिला २०२४ च्या हंगामाच्या स्पर्धेतून बाहेर ठेवण्या आले. दुखापतीतून सावरल्यानंतर, ती २०२५ स्पर्धा खेळू शकली.
गौतम चंदीगड महिला क्रिकेट संघासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळते. २४ नोव्हेंबर २०२३ रोजी महिला आंतर-झोनल ट्वेंटी२० स्पर्धा २०२३/२४ मध्ये नॉर्थ ईस्ट झोन विरुद्ध नॉर्थ झोनसाठी तिने पहिले पाच बळी घेतले आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी इंडिया अ संघात स्थान मिळवले.
आंतरराष्ट्रीय कारकीर्द
[संपादन]एप्रिल २०२५ मध्ये तिला श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय तिरंगी मालिकेसाठी भारताच्या राष्ट्रीय संघात स्थान देण्यात आले. २७ एप्रिल २०२५ तिने रोजी श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले. [१] ६ मे २०२५ रोजी, दुखापतीमुळे तिला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. [२][३]
संदर्भ
[संपादन]- ^ "Kashvee Gautam, Kanika Ahuja ruled out of WPL with injuries". ESPNcricinfo. 9 April 2025 रोजी पाहिले.
- ^ "WPL 2025 - How Kashvee Gautam returned to Women's Premier League from injury". Sportstar (इंग्रजी भाषेत). 2025-02-24. 2025-04-08 रोजी पाहिले.
- ^ "Kashvee Gautam". WPL. 19 May 2025 रोजी पाहिले.