काळ्या डोक्याचा भारीट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
काळ्या डोक्याची रेडवा

काळ्या डोक्याचा भारीट किंवा काळ्या डोक्याची रेडवा (इंग्लिश:Black-headed Bunting; हिंदी:गंदम) हा एम्बेरिझिडे या भारीट कुळातील एक पक्षी आहे.

हा पक्षी चिमणीसारखा सडपातळ दिसतो. याची शेपटी लांब आणि दुभागालेली असते. नराचा रंग खालून गव्हाळी पिवळा आणि वरचा रंग लाल-भुरा असतो. डोक्यावर काळी टोपी असते. मादा नरांसारख्या पण फिकट रंगाच्या असतात. हे पक्षी थव्यात आढळतात आणि गवताळ प्रदेशात जमिनीवरील बिया खातात.

वितरण[संपादन]

हे पश्चिम आणि मध्य भारतात राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र (नागपूर व नांदेड), तसेच कर्नाटक या भागांत हिवाळी पाहुणे असतात.

निवासस्थाने[संपादन]

ते शेतीच्या प्रदेशात राहतात.