Jump to content

कालीघाट काली मंदिर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Kalighat (es); কালীঘাট মন্দির (bn); temple de Kalighat (fr); Kalin hram u Kalighatu (hr); Temple Kaligat (ca); कालीघाट शक्तिपीट (mr); कालीघाट काली मन्दिर (mai); कालीघाट काली मन्दिर (ne); カーリーガート・カーリー寺院 (ja); معبد كاليجات كالى (arz); കാളിഘട്ട് കാളി ക്ഷേത്രം (ml); කාලිඝාට් කාලි දේවාලය (si); Kalighat-Tempel (de); कालीघाट शक्तिपीठ (hi); ಕಾಳಿಘಾಟ್ ಕಾಳಿ ದೇವಸ್ಥಾನ (kn); Калигхат (ru); Kalighat Kali Temple (en); กาลีฆาฏมนเทียร (th); ᱠᱟᱞᱤᱜᱷᱟᱴ ᱠᱟᱞᱤ ᱢᱚᱸᱫᱤᱨ (sat); காளிகாட் காளி கோவில் (ta) храм богини Кали в Калигхате (ru); কলকাতার একটি প্রসিদ্ধ কালীমন্দির (bn); bâtiment en Inde (fr); Hindu temple in Kolkata, West Bengal, India (en); hinduistischer Tempel in Kalighat, Kalkutta (de); ᱠᱚᱞᱠᱟᱛᱟ ᱨᱮᱱᱟᱜ ᱢᱤᱫ ᱧᱩᱛᱩᱢᱟᱱ ᱢᱚᱸᱫᱤᱨ (sat); Hindu temple in Kolkata, West Bengal, India (en) Dakshina Kali remple (en); দক্ষিণাকালী মন্দির (bn)
कालीघाट शक्तिपीट 
Hindu temple in Kolkata, West Bengal, India
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारमंदिर
ला समर्पित
  • Dakshina Kali
स्थान कालिघाट, Ward No. 83, Kolkata Municipal Corporation, Borough No. 8, Kolkata Municipal Corporation, कोलकाता, कोलकाता जिल्हा, Presidency division, पश्चिम बंगाल, भारत
Street address
  • Kalighat road (278)
स्थापत्यशास्त्रातील शैली
  • At-chala
वारसा अभिधान
  • KMC Heritage Building Grade I
स्थापना
  • इ.स. १८०९
अधिकृत संकेतस्थळ
Map२२° ३१′ १३″ N, ८८° २०′ ३१.५″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

कालीघाट काली मंदिर हे कोलकाताच्या कालिघाट भागातील हिंदू मंदिर आहे जे काली देवीला समर्पित आहे.[१] हे शक्तीपीठांपैकी एक आहे. कोलकाता शहरातील हुगली नदीच्या जुन्या मार्गावर कालीघाट हा घाट होता. कलकत्ता हे नाव कालिघाट या शब्दापासून पडले असे म्हणतात. काही काळापासून नदी मंदिरापासून दूर गेली आहे. मंदिर आता हुगळीला जोडणाऱ्या आदि गंगा नावाच्या छोट्या कालव्याच्या काठावर आहे.

दंतकथा[संपादन]

कालिघाट हे भारतातल्या शक्तीपीठांपैकी एक म्हणून ओळखला जातो, जिथे शिवच्या रुद्र तांडवाच्या वेळी सतीच्या शरीराचे विविध भाग पडले असे म्हणतात. सतीच्या उजव्या पायाच्या बोटं पडलेल्या त्या जागेचे प्रतिनिधित्व कालिघाट करते अशी दंतकथा आहे.

इतिहास[संपादन]

१५व्या शतकातील मानसर भसन आणि १७व्या शतकातील कवि कंकण चंडी येथे या मंदिराचा उल्लेख आहे. असे असले तरी सध्याच्या स्वरूपातले कालिघाट मंदिर सुमारे २०० वर्षांपूर्वीचे आहे. १८०९ मध्ये सबर्ना रॉय चौधरी कुटुंबाच्या मदतीने मंदिराची सध्याची रचना पूर्ण झाली होती. काली मंदिराचा उल्लेख लालमोहन बिद्यानिधींच्या संबंद निर्नोय मध्येही आढळतो. गुप्त साम्राज्यच्या चंद्रगुप्त प्रथमच्या काळातले दोन लोकप्रिय नाणे बंगालमधले आहेत. असे नाणे कालिघाटात सापडले आहेत.

या मंदिरात कालीची प्रतिमा अनन्य आहे. ते बंगालमधील इतर काली प्रतिमांचे नमुना पाळत नाही. आत्माराम ब्रह्मचारी आणि ब्रह्मानंद गिरी या दोन संतांनी दगडाची सध्याची मूर्ती तयार केली होती. सध्या, तीन प्रचंड डोळे, लांब जीभ व चार हात, जी सर्व सोन्याने बनविली आहे अशी ही प्रतिमा आहे. यातील एका हातत कटयार आणि एका असुर राजा 'शुंभा'चे मुंडके आहे. इतर दोन हात अभय आणि वरद मुद्रा दाखवतात.

मंदिराचा तपशील[संपादन]

शोष्टी ताला

ही एक आयताकृती वेदी असून तीन फूट उंच आहे. झाडाच्या खाली, वेदीवर तीन दगड आहेत जी - शोष्टी देवी, शितला देवी आणि मंगल चंडी देवीचे प्रतिनिधित्व करतात. या पवित्र जागेला शोष्टी ताला किंवा मोनोशा ताला म्हणून ओळखले जाते. १८८० मध्ये गोबिंदा दास मोंडलने ही वेदी बनविली होती. वेदीचे स्थान ब्राह्मानंद गिरी यांची समाधी आहे. येथे सर्व याजक महिला आहेत. येथे दररोज कोणतीही पूजा किंवा भोग (अन्नार्पण) केले जात नाही.

नटमंदिर

मुख्य मंदिराला लागूनच नटमंदिर नावाचा एक मोठा आयताकृती झाकलेला मंच तयार केला आहे, तेथून प्रतिमेचा चेहरा दिसू शकतो. हे मूळचे जमींदर काशीनाथ रॉय यांनी १८३५ मध्ये बनवले होते. त्यानंतर अनेकदा नूतनीकरण केले गेले आहे.

जोर बांगला

प्रतिमेसमोरील मुख्य मंदिराच्या प्रशस्त व्हरांडा आहे जो जोर बांगला म्हणून ओळखाअ जातो. गर्भगृहात ज्या विधी घडतात त्या नाटमंदिरातून जोर बांगला मार्गे दिसतात.


जवळच एक राधा-कृष्ण मंदिर आणि नकुलेश्वर भैरव मंदिर देखील आहे. आवारात एक तलाव देखील आहे जी पवित्र मानली जाते.

चित्र[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Balakrishnan, S (May 9, 2003). "Kali Mandir of Kolkata". The Hindu. 2003-06-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-11-10 रोजी पाहिले.