कालिनिनग्राद स्टेडियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कालिनिनग्राद मैदान तथा अरेना बाल्टिकी हे रशियाच्या कालिनिनग्राद शहरातील फुटबॉलचे मैदान आहे. याची रचना जर्मनीमधील अलायंझ अरेनाच्या धर्तीवर केलेली आहे. या मैदानाची प्रेक्षकक्षमता ३३,९७३ आहे.

येथील पहिला सामना ११ एप्रिल, २०१८ रोजी एफसी बाल्टिका आणि पीएफसी क्रिलिया सोवेतोव समारा या संघांमध्ये झाला. २०१८ फिफा विश्वचषकातील काही सामने येथे खेळले गेले होते.