काराबाश
human settlement in Karabash Urban Okrug, Chelyabinsk Oblast, Russia | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| प्रकार |
| ||||
|---|---|---|---|---|---|
| स्थान | Karabash Urban Okrug, चेलियाबिन्स्क ओब्लास्त, रशिया | ||||
| स्थापना |
| ||||
| लोकसंख्या |
| ||||
| क्षेत्र |
| ||||
| समुद्रसपाटीपासूनची उंची |
| ||||
| अधिकृत संकेतस्थळ | |||||
![]() | |||||
| |||||
काराबाश (रशियन:Карабаш) हे रशियातील चेलियाबिन्स्क ओब्लास्मतधील एक शहर आहे. हे चेल्याबिन्स्क शहराच्या वायव्येस ९० किलोमीटर (५६ मैल) आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १३,१५२ इतकी होती. २००२मध्ये हा आकडा १५,९४२ तर १९८९ च्या सोवियेत जनगणनेनुसार हा आकडा १७,००६ इतका होता.
नावाची व्युत्पत्ती
[संपादन]काराबाशचा अर्थ अनेक तुर्किक भाषांमध्ये काळे शिखर असा होतो. [१]
इतिहास
[संपादन]काराबाशची स्थापना १८२२ मध्ये सोने खाण कामगारांची वसाहत म्हणून झाली. [२] सोन्याचे खाणकाम हा शहराचा मूळ मुख्य उद्योग होता. कालांतराने येथून जवळ तांब्याचे मोठे साठे सापडले. [३] १८३७ मध्ये शहराचा पहिला तांबे वितळवण्याचा कारखाना बांधण्यात आला परंतु तो पाच वर्षांत बंद पडला. शहराच्या सोने उद्योग आर्थिकदृष्ट्या अधिक फायदेशीर होता. [४] १९०७ मध्ये पुन्हा एकदा तांबे वितळवण्याची कारखाना बांधण्यात आला. हा कारखाना फक्त तीन वर्षे टिकला. [४] १९१० मध्ये, काराबाशमध्ये बांधलेला असा तिसरा कारखाना [१] [४] अद्याप टिकून आहे. [१] १९१० च्या दशकाच्या सुरुवातीला या कारखान्याच्या जोरावर शहराची लक्षणीय वाढ झाली. १९१५ पर्यंत रशियातील सर्व वितळलेल्या तांब्याच्या एक तृतीयांश उत्पादन येथे होत असे. [४]
रशियन यादवी युद्धादरम्यान काराबाशमधील तांब्याचे उत्पादन थांबले आणि येथील तांब्याच्या खाणी पाणी भरून जाउन निकामी झाल्या. [५]
१९२६ ते १९२९ पर्यंत या खाणी हळूहळू पुन्हा कार्यान्वित करण्यात आल्या. त्यानंतरच्या वर्षांत तांब्याचे उत्पादन लक्षणीयरीत्या वाढले. [६] २० जून १९३३ रोजी काराबाशला अधिकृतरीत्या शहराचा दर्जा देण्यात आला. [४] १९३५ पर्यंत येथे १९१७ मध्ये वितळलेल्या तांब्यापेक्षा तिप्पट किंवा अधिक तांबे तयार करीत होते [४] दुसऱ्या महायुद्धापूर्वी काराबाशची लोकसंख्या अंदाजे ५०,००० पर्यंत पोहोचली. [४] युद्धात सुमारे ५,००० काराबाश रहिवासी पूर्व आघाडीवर लढले. [४] १९५० ते १९७० दरम्यान शहरात मोठ्या प्रमाणात विद्युतीकरण नैसर्गिक वायूच्या पाइपलाइन टाकणे आणि पाणी शुद्धीकरण केन्द्रांच्या बांधकामामुळे काराबाशचे आधुनिकीकरण सुरू राहिले. [४] या काळात, गृहनिर्माण बांधकाम देखील तेजीत होते. [४]
१९७० च्या दशकात सोव्हिएत अधिकाऱ्यांनी काराबाशमधील अनेक तांब्याच्या खाणी बंद केल्या आणि त्याऐवजी रेडिओ आणि कपडे उत्पादन करणारे कारखाने बांधले. [७] या कालखंडात काराबाशची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली. [४] नोव्हेंबर १९८९ मध्ये पर्यावरणीय परिणामाचे कारण देत सोव्हिएत अधिकाऱ्यांनी शहरातील तांब्याचे काम बंद केले.[८] [४]
भूगोल
[संपादन]काराबाश शहर साक-एल्गा नदीवर वसलेले आहे. [९] [१०]
अर्थव्यवस्था
[संपादन]काराबाशचा तांबे उद्योग शहराच्या स्थानिक अर्थव्यवस्थेचा भक्कम पाया आहे-. [११] २०१८ मधीलओपनडेमोक्रसीच्या एका लेखात काराबाशमधील १०% रहिवासी स्थानिक तांब्याच्या कारखान्यात काम करीत असल्याची नोंद आहे. [१] तांबे कारखान्यामध्ये स्थानिक खाजगी क्षेत्रातील इतर नोकऱ्यांपेक्षा बराच मोठा पगार मिळतो. [१]
पर्यावरण
[संपादन]
शहरातील कारखान्यामुळे तेथील रहिवाशांसाठी मोठ्या प्रमाणात प्रदूषण आणि गंभीर आरोग्य समस्या निर्माण झाल्या आहेत. [९] काराबाशचे रहिवाशांमध्ये या कारखान्याशी संबंधित कर्करोग आणि श्वसन रोगांमुळे असामान्यपणे उच्च मृत्युदर आढळतो. [१] २०११ मध्ये केलेल्या संशोधनात स्थानिक हवा, जमीन आणि पाण्यात जड धातू आणि आर्सेनिकचे प्रमाण प्रचंड प्रमाणात जास्त असल्याचे दिसून आले. [१] असंख्य अभ्यासातून असे दिसून आले आहे की काराबाशचा मृत्युदर चेल्याबिन्स्क ओब्लास्तमध्ये सर्वाधिक आहे. यातही तरुणांचा मृत्युदर ओब्लास्तमध्ये सर्वाधिक आहे. काराबाश संपूर्ण रशियामध्ये सर्वाधिक एकूण मृत्युदर असलेल्या शहरांपैकी एक आहे. [१]
संदर्भ
[संपादन]- 1 2 3 4 5 6 7 8 Chesnokov, Ivan (2018-01-18). "No future in Karabash, one of Russia's most polluted towns". openDemocracy (इंग्रजी भाषेत). 2025-01-30 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2025-02-21 रोजी पाहिले.
- ↑ Mallonee, Laura (2015-09-01). "The Russian Town Where Startling Pollution Is a Way of Life". Wired (इंग्रजी भाषेत). ISSN 1059-1028. 2024-07-29 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2025-02-21 रोजी पाहिले.
- ↑ Chesnokov, Ivan (2018-01-18). "No future in Karabash, one of Russia's most polluted towns". openDemocracy (इंग्रजी भाषेत). 2025-01-30 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2025-02-21 रोजी पाहिले.Chesnokov, Ivan (January 18, 2018).
- 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 О муниципалитете [About the Municipality]. karabash-go.ru (रशियन भाषेत). 2019-04-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2025-02-21 रोजी पाहिले.
- ↑ О муниципалитете [About the Municipality]. karabash-go.ru (रशियन भाषेत). 2019-04-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2025-02-21 रोजी पाहिले.О муниципалитете [About the Municipality].
- ↑ О муниципалитете [About the Municipality]. karabash-go.ru (रशियन भाषेत). 2019-04-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2025-02-21 रोजी पाहिले.О муниципалитете [About the Municipality].
- ↑ О муниципалитете [About the Municipality]. karabash-go.ru (रशियन भाषेत). 2019-04-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2025-02-21 रोजी पाहिले.О муниципалитете [About the Municipality].
- ↑ Chesnokov, Ivan (2018-01-18). "No future in Karabash, one of Russia's most polluted towns". openDemocracy (इंग्रजी भाषेत). 2025-01-30 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2025-02-21 रोजी पाहिले.Chesnokov, Ivan (January 18, 2018).
- 1 2 Chesnokov, Ivan (2018-01-18). "No future in Karabash, one of Russia's most polluted towns". openDemocracy (इंग्रजी भाषेत). 2025-01-30 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2025-02-21 रोजी पाहिले.Chesnokov, Ivan (January 18, 2018).