कारंज वृक्ष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कारंज वृक्ष मूळचा पश्चिम आफ्रिकेतील असून उष्णकटिबंधात सर्वत्र, शोभेसाठी व सावलीकरिता रस्त्यांच्या दुतर्फा व उद्यानांतून लावलेला आढळतो.

वर्णन[संपादन]

याची पाने संयुक्त, पिसासारखी, विषमदली दले ९—१९, संमुख (समोरासमोर), इंडाकृती व टोकदार असतात तर फुले नारिंगी शेंदरी, मोठी, अग्रस्थ (शेंडयावरील) मंजऱ्यांवर डिसेंबरमार्चमध्ये येतात. संवर्त हिरवट तपकिरी, सच्छद, नावेसारखा व कलिकावस्थेत इतर भागांस पूर्णपणे झाकतो पुष्पमुकुट घंटेसारखा केसरदले पिवळी, चार, बहिरागत व लोंबते परागकोश बिंब वाटीसारखे, किंजपुटात अनेक बीजके [→फूल] फळे (बोंडे) पिंगट, भाल्यासारखी, कठीण व अनेकबीजी बीजे सपक्ष व लंबगोल. कळी दाबली असता पाणी पिचकारीप्रमाणे बाहेर येते म्हणून त्या अर्थाचे इंग्रजी आणि मराठी नाव पडले आहे. शास्त्रीय नाव संवर्त वा पुष्पमुकुट यांच्या स्वरूपावरून दिले आहे.[१]

उपयोग[संपादन]

यांचे लाकूड पांढरे, नरम व सुतारकामास चांगले असते नवीन लागवड बी किंवा मुळापासून येणाऱ्या अधश्चरांनी (जोरदार वाढणाऱ्या कोंबांनी) करतात.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "कारंज – वृक्ष". मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती. 2019-07-04. 2022-01-05 रोजी पाहिले.