कापालिक
Appearance
कापालिक हा पंथ शैव (पाशुपत) संप्रदायापैकी आहे. माणसाची कवटी ते जवळ बाळगतात व तीतूनच अन्न, मद्य-मांस इत्यादींचे सेवन करतात म्हणून ते कापालिक. शिवाच्या पौराणिक वर्णनाप्रमाणे ते स्मशानवास, चिताभस्माचे लेपन, खट्वांगधारण इ. गोष्टी करत असल्याचे कूर्मादी पुराणांत सांगितले आहे. कापालिकांत पंचमकारात्मक तंत्रसाधना, नरबळी इत्यादींचे प्रस्थ खूप माजल्यामुळे तो पंथ घृणास्पद ठरला. ह्या पंथाचे आकारग्रंथ किंवा प्रकरणग्रंथ फारसे उपलब्ध नाहीत; तथापि बृहत्संहिता, कथासरित्सागर, गाथासप्तशती, शांकरदिग्विजय व पुराणग्रंथ तसेच मालतीमाधव, प्रबोधचंद्रोदय इ. नाटके यांतून त्यांच्याबद्दल विस्तृत माहिती मिळते.
महाभैरव, चामुंडा इ. उग्र देवतांचे ते उपासाक असल्यामुळे त्यांच्या देवतांना मद्य-मांसाचाच नैवेद्य लागतो. [१]
काश्मीर शैवपंथ
कौलाचार
महासिद्धा
पाशुपत शैवपंथ
संदर्भ यादी
[संपादन]- ^ "कापालिक". मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती. 2020-01-05 रोजी पाहिले.
- ^ "Kapalika". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-10-03.