कवितेचा अंत:स्वर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कवितेचा अंत:स्वर हा डॉ. देवानंद सोनटक्के यांचा समीक्षाग्रंथ असून पद्मगंधा प्रकाशन, पुणे यांनी तो प्रसिद्ध केला आहे.

कवी, कविता, कवीचे व्यक्तिमत्त्व, निर्मितिप्रक्रिया, संहिता आणि वाचनप्रक्रिया, कवितेचे पर्यावरण, सामाजिक संदर्भ , सांस्कृतिक व सर्जनशील चिन्हव्यवस्था , कवितेचे भाषिक विश्व यांच्या संबंधांचा शोध

संस्कृती, साहित्यशास्त्र, समाजशास्त्र , सौंदर्यशास्त्र, मानसशास्र, आदिबंध, भाषाविज्ञान, आधुनिकता, उत्तरआधुनिकता या ज्ञानशाखा, स्त्रीवादी, दलित, आदिवासी, महानगरी, अस्तित्ववादी अशा सर्व साहित्यप्रवाहांचे भान , विविध साहित्यप्रकार व कविता यांचा अनुबंध , कवितेतील संप्रेषण, कथनात्मकता, दृश्यात्मकता, संवेदना आणि भावनाविश्व यांचा अवकाश, ग्रेस, भालचंद्र नेमाडे, नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ, अरुण कोलटकर, वसंत आबाजी डहाके, अरुण काळे , निर्मला पुतुल, अजय कांडर, कल्पना दुधाळ, संतोष पद्माकर पवार, श्रीधर नांदेडकर , अशा विभिन्न प्रवृत्तींच्या कवींची, साठोत्तरी, नव्वदोत्तरी कवितांची

समीक्षा आहे[१].  

  1. ^ कवितेचा अंत:स्वर , पद्मगंधा प्रकाशन, पुणे, २०१८.