Jump to content

कवळी (रानभाजी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कवळी (रानभाजी)ही रानात उगवणारी एक खाण्यायोग्य भाजी आहे.

महत्त्व

[संपादन]

कवळी भाजी ही आदिवासी समाजात बलवर्धक, रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी, मेंदू सतेज ठेवणारी आणि स्त्रियांच्या गर्भाशयाच्या विकारात उपयुक्त मानली जाते.

आदिवासी सण

[संपादन]

पावसाळ्यात पहिल्यांदा आदिवासी भागातील समाजात कवळी भाजी सण साजरा केला जातो. आदिवासी बांधव पावसाळा सुरू झाला की पिकांची पेरणी करतात. काही दिवसांतच रानात नवनव्या वनस्पती उगवायला सुरुवात होते. आदिवासी समाजातील जाणते लोक रानात उगवणाऱ्या कवळी भाजीचा शोध घेतात आणि आपापसात ठरवून एक दिवस ठरविण्यात येतो. त्यादिवशी कवळी भाजीचा सण साजरा केला जातो.कवळी भाजी सणाच्या दिवशी गावातील पुजारी गावदेवतानिसर्गदेवता ह्यांना शेंदूर लावतात आणि देवाला चांगल्या पाऊसपाण्यासाठी साकडे घालतात.कवळी भाजीचा सण हा तारखेनुसार होत नाही. पाऊस पडल्यानंतर एक दिवस ठरवून त्या दिवशी सण साजरा केला जातो. दिवसा जंगलातील कवळी भाजी आणली जाते आणि गावदेवी जवळ की भाजी ठेवली जाते. संध्याकाळी प्रत्येक घरी कवळी भाजी शिजवली जाते. कुलदैवतेसाठी नैवेद्य दाखवून घरातील सगळे लोक जेवतात. ह्या सणाला नवीन लग्न होऊन गेलेल्या मुलींना माहेरी बोलावले जाते. कवळी भाजी सणाच्या दिवशी आदिवासी पाडा हा आनंदाने न्हाऊन निघतो. आदिवासी बांधव संध्याकाळी तारपा नाच, कांबड नाच, ढोल नाच, करतात.लहान-मोठे,पोरे-पोरी, बाई-पुरुष सर्वजण तालासुरात नाच करतात. अश्या प्रकारे आदिवासी भागातील बांधव आपली आदिवासीसंस्कृतीपरंपरा जपतात. []

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. महाराष्ट्र टाईम्स, मंगळवार,१ जुलै २०२५