Jump to content

कल्याण सिंह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कल्याण सिंग ( जानेवारी ५, इ.स. १९३२ - ऑगस्ट २१, इ.स. २०२१) हे भारतीय जनता पक्षाचे माजी नेते आणि राजस्थानचे माजी राज्यपाल होते. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री होते. त्यांनी जून १९९१ ते डिसेंबर १९९२ आणि सप्टेंबर १९९७ ते नोव्हेंबर १९९९ दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून काम बघितले. ते इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश राज्यातील बुलंदशहर लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश राज्यातील एटा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. आपल्या हयातीत त्यांनी भारतीय जनसंघ, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय क्रांती पार्टी, समाजवादी पार्टी आणि जनक्रांती पार्टी अशा विविध पक्षांसोबत काम केले. आठवेळा आमदार, तीन वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्व नेत्यांसह ते भाजपच्या सर्वोच्च नेत्यांचे 'आदरणीय' होते. त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांसह इतरांनी शोक व्यक्त केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'भारताच्या सांस्कृतिक उन्नतीमध्ये योगदान दिल्याबद्दल येणाऱ्या पिढ्या कल्याण सिंहजी यांचे सदैव ऋणी राहतील.' २०२२ साली त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला.[]

जीवन

[संपादन]

कल्याण सिंह यांचा जन्म ५ जानेवारी १९३२ रोजी उत्तर प्रदेशातील अलीगढ जिल्ह्यात झाला. त्यांचा तालुका लोधी समाजातील होता. त्यांच्या वडिलांचे नाव तेजपाल सिंह लोधी आणि आईचे नाव सीता देवी होते. यांनी रामवती देवीशी लग्न केले. या जोडप्याने एक मुलगा (राजवीर सिंह) आणि एक मुलगी (प्रभा वर्मा) यांना जन्म दिला.

राम मंदिर

[संपादन]

ते राम मंदिर चळवळीत सामील होते. राम मंदिर उभारणीमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती. कल्याण सिंह सरकारने रामजन्मभूमी चळवळीशी संबंधित लोकांवरील सर्व खटले रद्द केले होते. त्यांनी कार सेवकांवर गोळीबार न करण्याचे आदेश दिले होते. त्यांनी राममंदिराच्या पायाभरणीचा मार्ग मोकळा केला म्हणून त्यांना 'हिंदू हृदयसम्राट' म्हणले जाते. कल्याण सिंह हे भाजपमधील मागास आणि दलितांचे पहिले नेते म्हणून ओळखले जातात. यामुळे त्यांच्या मृत्यु नंतर अयोध्या, लखनौ, प्रयागराज, अलीगढ, बुलंदशहर आणि एटा येथे रस्ता नामकरण कल्याण सिंह यांच्या नावे केले गेले आहे.

राजकारण

[संपादन]

वर्ष १९६७ मध्ये प्रथमच कल्याण सिंह उत्तर प्रदेशातील विधानसभा पदावर निवडून आले आणि त्यांनी सुमारे १३ वर्षे विधानसभेची जागा सांभाळली. कल्याण सिंहसोबत एक रोचक घटना घडली होती. फेब्रुवारी १९९८ मध्ये रोमेश भंडारी उत्तर प्रदेशचे राज्यपाल होते. रोमेश भंडारीने कल्याण सिंहना एका रात्रीत बडतर्फ केले आणि जगदंबिका पाल यांना मुख्यमंत्री म्हणून शपथ दिली. तेव्हा जगदंबिका पाल हे कल्याण सिंह यांच्या सरकारमध्येच परिवहन मंत्री होते. असे म्हणले जाते की, जगदंबिका पाल यांनी खुर्ची बळकावण्यासाठी विरोधी नेत्यांशी संपर्क साधला होता. या कामात रोमेश भंडारीने त्याला खुलेपणाने 'मदत' केली. हायकोर्टाने दुसऱ्या दिवशी सुनावणी केली आणि राज्यपाल रोमेश भंडारी यांच्या आदेशाला स्थगिती दिली आणि कल्याण सिंह यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद बहाल केले. रोमेश भंडारी यांच्या या 'कृतीने' त्यांच्या राज्यपाल या घटनात्मक जबाबदाऱ्यांवर कायमचा कलंक लावला आहे.देशभक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी सर्व प्राथमिक शाळांच्या वर्गांना भारत माता आरतीनंतरच अभ्यास सुरू करण्यास सांगितले होते.

मागील
'राष्ट्रपती राजवट'
'उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री'
जून २४, इ.स. १९९१डिसेंबर ६, इ.स. १९९२
पुढील
'राष्ट्रपती राजवट'
मागील
'मायावती'
'उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री'
सप्टेंबर २१, इ.स. १९९७फेब्रुवारी २१, इ.स. १९९८
पुढील
'जगदंबिका पाल'
मागील
'जगदंबिका पाल'
'उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री'
फेब्रुवारी २३, इ.स. १९९८नोव्हेंबर १२, इ.स. १९९९
पुढील
'रामप्रकाश गुप्ता'
मागील
'राम नाईक'
'राजस्थानचे राज्यपाल' पुढील
'पदस्थ'

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ Bureau, The Hindu (2022-01-25). "Full list of Padma Awards 2022" (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X.