कलहट्टी धबधबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कलहट्टी धबधबा किंवा कलहस्ती धबध बा हा चिकमगलूर जिल्ह्याच्या कल्लट्टीपूरा येथे आहे.केम्मनगुंडी या थंड हवेच्या ठिकाणापासून तो फक्त १० कि.मी. दूर आहे.१२२ मीटर (४०० फूट उंचीवरून पडणारा हा धबधबा हा उत्तम दिसतो.हा विरभद्रेश्वर या देवळाचे समोर स्थित आहे.

आख्यायिका[संपादन]

असा समज आहे कि, अगस्त्य यांनी येथे बरीच वर्षे तप केले.विजयनगर साम्राज्याचे वेळेस हे विरभद्राचे मंदिर बांधल्या गेले.या मंदिराचे प्रवेशाचे ठिकाणी दगडात कोरलेले तीन हत्ती आहेत.पाणी या तीन हत्तींवरून पडते. भक्तांत अशी समजूत आहे कि या पाण्याने रोग दूर होतात.