कलवारी वर्गाच्या पाणबुड्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Disambig-dark.svg
कलवारी वर्गाची पहिली पाणबुडी आयएनएस कलवारी
कलवारी तथा टायगर शार्क

कलवारी वर्गाच्या पाणबुड्या भारतीय आरमाराच्या डीझेल-विद्युच्चलित पाणबुड्या आहेत. या पाणबुड्यांची रचना फ्रांसच्या स्कॉर्पीन वर्गाच्या पाणबुड्यांवर आधारित असून मुंबईतील माझगांव डॉक्समध्ये या बांधल्या जात आहेत.

या प्रकारच्या एकूण सहा पाणबुड्या बांधल्या जातील. त्यांपैकी आयएनएस कलवारी १४ डिसेंबर, २०१७ रोजी भारतीय आरमाराच्या सेवेत रुजू झाली तर इतर पाच पाणबुड्या भविष्यात येतील.

या पाणबुड्यांना पूर्वीच्या कलवारी वर्गाच्या पाणबुड्यांचीच नावे दिली आहेत.

पाणबुड्या[संपादन]

या प्रकारच्या सहाही पाणबुड्यांचे कवच बांधून झाले आहे. २०१७च्या अखेरीस आयएनएस कलवारी आरमारी सेवेत आहे तर आयएनएस खांदेरीच्या समुद्री चाचण्या सुरू आहेत. उरलेल्या चार पाणबुड्या २०२०पर्यंत आरमारात दाखल होतील..[१]

नाव ध्वज गोदी उत्पादक बांधणी सुरी जलावतरण सेवादाखल ठाणे नोंदी
Flight I (Without AIP)[२]
कलवारी S50 ११८७५ माझगांव डॉक लिमिटेड १४ डिसेंबर, २००६ २८ ऑक्टोबर, २०१५ १४ डिसेंबर, २०१७[३][४] सेवारत
खांदेरी S51 १२ जानेवारी, २०१७[५] १२ जानेवारी, २०१८ (अंदाजे)[६][७][८] समुद्री चाचण्या[९]
करंज S52 ऑक्टोबर २०१७ (अंदाजे)[१०][११] डिसेंबर, २०१८ (अंदाजे)[६] बांधणी सुरू
S53 S53 बांधणी सुरू
S54 S54 बांधणी सुरू
S55 S55 बांधणी सुरू
 1. ^ "'We see a bright future for defence ship construction'". २०१६-०१-०२ रोजी पाहिले.
 2. ^ "India to make additional Scorpene subs: Parrikar". Tribuneindia.com. 2016-03-12. 2017-01-02 रोजी पाहिले.
 3. ^ "Curtain Raiser : Kalvari to be Commissioned Tomorrow at Mumbai". pib.nic.in. 2017-12-13 रोजी पाहिले.
 4. ^ "कलवारी आरमारात दाखल". २०१७-१२-१४ रोजी पाहिले.
 5. ^ "Second Scorpene class submarine Khanderi to be launched on Jan 12". २०१७-०१-०९ रोजी पाहिले.
 6. a b "Second Scorpene class submarine Khanderi to be launched on Jan 12". २०१७-०१-०९ रोजी पाहिले.
 7. ^ "First Scorpene Submarine, INS Kalvari, Likely To Be Commissioned By Prime Minister Modi Next Month". २०१७-०९-१८ रोजी पाहिले.
 8. ^ "Scorpenes no more". २०१७-०३-२० रोजी पाहिले.
 9. ^ http://timesofindia.indiatimes.com/india/first-new-conventional-submarine-to-be-commissioned-in-july-august/articleshow/58930934.cms
 10. ^ http://timesofindia.indiatimes.com/india/first-new-conventional-submarine-to-be-commissioned-in-july-august/articleshow/58930934.cms
 11. ^ "Karanj prepared for launch". MDL Twitter (इंग्लिश भाषेत). २०१७-०९-२२ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)