कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय (पंढरपूर)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर या पानावरून पुनर्निर्देशित)



  प्रस्तावना

'कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय हे रयत शिक्षण संस्थेचे पंढरपूर शहरातील महाविद्यालय आहे. संत गाडगे बाबा यांच्या विनंतीवरून या महाविद्यालयाची स्थापना झाली. या महाविद्यालयाची स्थापना १९६० साली झाली.

या महाविद्यालयाची विद्यार्थ्यांना जात, पंथ, धर्म, सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती यांचा विचार न करता शैक्षणिक सुविधा पुरविण्यासाठी केली गेली होती. महाविदयालयामध्ये  कनिष्ठ विभाग असून यात किमान कौशल्यावर आधारित विविध विषयांवर पदवी अभ्यासक्रम आहे. हे पुणे पंढरपूर राज्य महामार्गावर सुमारे १२ एकर प्रांगणात आहे. महाविदयालयामध्ये सभागृह, वेगवेगळ्या व्यायामशाळा , प्रशासकीय क्षेत्र, प्रयोगशाळा, महिला आणि पुरुष वसतिगृहे, संगणक प्रयोगशाळा, ग्रंथालय, वाचन खोल्या, संगणक कृतीय ग्रंथालय आहे. या महाविद्यालयात  जवळजवळ सर्व पायाभूत सुविधा स्थापन केल्या आहेत . महाविद्यालयाला १६ सप्टेबर, २००४ रोजी नॅक बंगळुरू ब ++ सह अधिकृत करण्यात आले आहे.

पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना १९१९ साली सातारा येथे केली . केली. पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे पूर्ण नाव भाऊराव पायगोंडा पाटील असे आहे.

महाविद्यालयातील वैशिष्टे[संपादन]

महाविद्यालयाच्या एका बाजूला ग्रंथालय आहे .त्याची इमारत ९५८०चाै.फु.  आहे .या ग्रंथालयात संधर्भ पुस्तके व अभ्यासिका वर्ग उपलब्ध आहेत . ग्रंथालयात रोज सर्व प्रकारचे वर्तमानपत्रके उपलब्ध असतात .[संपादन]

वसतिगृह:[संपादन]

यामध्ये विविध जाती धर्माच्या  व वर्गाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो .मुले आणि मुलीन साठी वेगवेगळली दोन वसतिगृहे आहेत. वसतिगृहाची प्रवेश प्रकिया प्रथम तत्त्वावर  अशी आहे .[संपादन]

बाग :[संपादन]

महाविद्यालामध्ये वनस्पती शास्त्राची बाग आहे .यामध्ये वेगवेळ्या प्रजाती व जाती उपलब्ध आहेत . बागेच्या सुधारणेसाठी वन्य आणि पर्यावरण मंत्रालय, भारत सरकार कडून १२ लाख निधी दिला गेला आहे .[संपादन]

अभ्यासिका:[संपादन]

महाविद्यालामध्ये दिवसा व रात्री या दोन सत्रांध्ये अभ्यासिका चालू असते.रात्रीची वेळ ७.०० ते ११:०० पर्यंत सुरू असते.रात्र अभ्येसिकेसाठी पूर्व नोंदणी करणे गरजेचे आहे .अतिदक्षते साठी दोन पर्यवेक्षक नेमले आहेत[संपादन]

अंतरंग : INSIGHTS[संपादन]

Students who shortlisted this college also shortlisted[संपादन]

·        

संकेतस्थळ[संपादन]

www.kbpmpandharpur.in

रयत गीत रयतेमधुनी नव्या युगाचा माणुस् आता घडतो आहे

वटवृक्षाच्या विशलतेचा मोह नभाला पडतो आहे

कर्मविरांचे ज्ञानपिठ हे,शक्तिपीठही ठरते आहे

शाहुफुल्यांचे समानतेचे तत्त्व मानसि पुरते आहे

धर्मजातिच्या पार गांधींचे मुल्य मानवी जपतो आहे

गरिबांसाठी लेणी मोडुन लक्ष्मी वहिनी झाली आई

कमवा आणि शिका मंत्र हा,तरुणाईला प्रेरक होई

स्वावलंबी वृत्ती ठेवून ज्ञानसाधना करतो आहे

दीन दलितांसाठी अण्णा,तुमची झिजली चंदनकाया

अनाथ जीवा सदा लाभलि मातृह्रदयी तुमची माया

शुन्यामधल्या नवसृष्टीचा निर्मिक् तोही ठरतो आहे

जीवनतला तिमिर जावा प्रबोधनावची पहाट व्हावि

इथे लाभले पंख लेऊनी उंच भरारी नभात घ्यावी

प्रतिभाशली बहुजनांचा वेलु गगनी चढतो आहे.