कर्नाटक हिजाब वाद, २०२२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हिजाब घालण्यास बंदी घातल्याने हा वाद सुरू झाला

फेब्रुवारी २०२२ च्या पहिल्या आठवड्यात कर्नाटक राज्यात हिजाब वाद भडकला. हिजाब परिधान केलेल्या मुस्लिम विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश नाकारण्यात आल्यानंतर हा वाद सुरू झाला.[१][२][३] ५ फेब्रुवारी २०२२ रोजी कर्नाटक सरकारने महाविद्यालयांमध्ये हिजाब परिधान करण्यावर बंदी घालणारा आदेश जारी केला होता. कर्नाटकातील काही महाविद्यालयांमध्ये मुस्लिम मुलींना हिजाब घालण्यास मनाई केल्यानंतर उच्च न्यायालयात दोन याचिकाही दाखल करण्यात आल्या.[४][५]

८ फेब्रुवारी २०२२ रोजी कर्नाटक राज्यात मुस्लिम विद्यार्थ्यांनी हिजाब परिधान केल्याबद्दलचा वाद अधिक तीव्र झाला, त्यानंतर राज्य सरकारने पुढील तीन दिवस शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याची घोषणा केली.[६]

पार्श्वभूमी[संपादन]

डिसेंबर २०२१ च्या शेवटी आणि जानेवारी २०२२ च्या सुरुवातीस राज्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये हिजाब संदर्भात विद्यार्थी आणि प्रशासन यांच्यात वाद झाला होता. परंतु फेब्रुवारी २०२२ च्या सुरुवातीला हा वाद अधिक तीव्र झाला आहे.[७]

कोलकाता येथील मुस्लिम विद्यार्थिनी

उच्च न्यायालयात सुनावणी[संपादन]

उडुपीच्या गव्हर्नमेंट पीयू कॉलेज फॉर वुमनमधील अनेक विद्यार्थिनींनी याचिका केली होती की हिजाब घालणे हा त्यांचा घटनात्मक अधिकार आहे.[८]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "मुस्लिम तरुणी आणि महिला मोठ्या प्रमाणात सह्यांच्या मोहिमेत सहभागी". TV9 Marathi. 2022-02-08. 2022-02-10 रोजी पाहिले.
  2. ^ Marathi, Lokmat (2022). "हिजाब वाद चिघळला, कर्नाटकात ३ दिवस शाळा-कॉलेज बंद ..."
  3. ^ "हिजाब घातलेल्या मुलीविरोधात जमावाच्या 'जय श्रीराम'च्या घोषणा, मुलीचं प्रत्युत्तर-'अल्लाहू अकबर'". BBC News मराठी. 2022-02-08. 2022-02-10 रोजी पाहिले.
  4. ^ "Hijab row: Maintain peace, says Karnataka high court as tempers flare". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2022-02-09. 2022-02-10 रोजी पाहिले.
  5. ^ Chowdhuri, Rupak De (2022-02-09). "Indian students block roads as row over hijab in schools mounts" (इंग्रजी भाषेत).
  6. ^ Feb 9, TNN / Updated:; 2022; Ist, 07:46. "Karnataka Hijab News: Karnataka colleges shut for 3 days as hijab row turns violent | India News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2022-02-10 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
  7. ^ "Hijab Row Highlights: 2-Week Ban On Gatherings, Protests Near Educational Institutions In Bengaluru". NDTV.com. 2022-02-10 रोजी पाहिले.
  8. ^ Desk, India com News. "Hijab Row Karnataka High Court To Hear Students". www.india.com (इंग्रजी भाषेत). 2022-02-10 रोजी पाहिले.